लेटेस्ट चालू घडामोडी

Tuesday, December 31, 2013

महत्वाच्या घटना दुरुस्त्या [Important Constitution Corrections]

 • ४२वी [१९७६] - स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.
  1. मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले
  2. सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट
  3. ५१अ भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट
  4. मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक
 • १ली [१९५०] - ९वे परिशिष्ट समाविष्ट [विविक्षित नियम विधिग्रह्य करणे]
 • २१वी [१९६७] - सिंधी भाषा समाविष्ट
 • २४वी [१९७१] - कलम ३६८ मध्ये इंदिरा गांधींनी दुरुस्ती केली. [वादग्रस्त]
 • २५वी [१९७१] - बँकाच्या राष्ट्रीयीकरनाबाबत
 • २६वी [१९७१] - संस्थानिकांचे तनखे रद्द
 • ३६वी [१९७५] - सिक्किमला राज्याचा दर्जा
 • ४४वी [१९७८] - संपत्तीचा अधिकार मूलभूत हककांमधून वगळण्यात आला.
 • ५२वी [१९८५] - १०वे परिशिष्ट समाविष्ट [पक्षांतर बंदी]
 • ५५वी [१९८६] - अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा
 • ५६वी [१९८७] - गोव्याला राज्याचा दर्जा
 • ६१वी [१९८९] - मतदाराचे वय २१ वरुन १८ वर्षे करण्यात आले.
 • ७१वी [१९९२] - कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा समाविष्ट
 • ७३वी [१९९३] - ११वे परिशिष्ट समाविष्ट [ग्राम प्रशासन]
 • ७४वी [१९९३] - १२वे परिशिष्ट समाविष्ट [नागरी प्रशासन]
 • ८६वी [२००२] - ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि पालकांचे कर्तव्य समाविष्ट
 • ८९वी [२००३] - अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जाती आयोगापासून वेगळा करण्यात आला. (कलम ३३९)
 • ९१वी [२००३] - मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभा व विधानसभा सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही.
 • ९२वी [२००३] - बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी भाषा समाविष्ट
 • ९३वी [२००६] - खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासावर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद
 • ९६वी [२०१२] - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले
 • ९७वी [२०१२] - सहकारी संस्था [१४व्या लोकसभेत हे १०४वे तर १५व्या लोकसभेत १११वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आले होते]
 • १०३वी - राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना
 • १०८वी - स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये १/३ आरक्षणासंबंधी [सर्वप्रथम १९९६ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ५ वेळा लोकसभेत मांडले गेले]
 • ११०वी - स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षणासंबंधी
 • ११५वी - गूड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संबंधी
 • ११६वी - लोकपाल [सर्वप्रथम १९६७ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ११ वेळा संसदेत मांडले गेले.

भारतीय राज्यघटना [Indian Constitution]

एकूण 22 भाग आणि 12 परिशिष्टे
 1. भाग I (कलम 1-4): संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
 2. भाग II (कलम 5-11): नागरिकत्व
 3. भाग III (कलम 12-35): मूलभूत अधिकार
 4. भाग IV (कलम 36-51): मार्गदर्शक तत्वे
 5. भाग IV (A) (कलम 51A): मूलभूत कर्तव्ये
 6. भाग V (कलम 52-151) - केंद्र सरकार (संघराज्य)
 7. भाग VI (कलम 152-237) - राज्य सरकार
 8. भाग VII (कलम 238) - अनुसूचित राज्य सूची (ब)
 9. भाग VIII (कलम 239-241) - केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
 10. भाग IX (कलम 242-243) - पंचायतराज
 11. भाग X (कलम 244-244A) - अनुसूचित जाती व जमाती प्रदेश/क्षेत्र
 12. भाग XI (कलम 245-263) - केंद्र - राज्य संबंध भाग XII (कलम 264-300A) - महसुल - वित्त
 1. भाग XIII (कलम 301-307) - व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
 2. भाग XIV (कलम 308-323) - प्रशासकीय लोकसेवा आयोग
 3. भाग XV (कलम 323A, 323B) - न्यायाधिकरण
 4. भाग XVI (कलम 330-342) - अनुसूचित जाती, जमाती साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
 5. भाग XVII (कलम 343-351) - कार्यालयीन भाषा
 6. भाग XVIII (कलम 352-360) - आणीबाणी विषयक माहिती
 7. भाग XIX (कलम 361-367) - मिश्र कलमे (काश्मीर, इत्यादी)
 8. भाग XX (कलम 368) - संविधान दुरुस्ती बाबत
 9. भाग XXI (कलम 369-392) - अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष उपबंध
 10. भाग XXII (कलम 393-395) - संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि निरसने
 1. परिशिष्ट I - राज्य व केंद्र शासित प्रदेश
 2. परिशिष्ट II - वेतन आणि मानधन
 3. परिशिष्ट III - पद ग्रहण शपथा
 4. परिशिष्ट IV - राज्यसभा जागांचे विवरण
 5. परिशिष्ट V - भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
 6. परिशिष्ट VI - ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
 7. परिशिष्ट VII - केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची
 8. परिशिष्ट VIII - भाषा
 9. परिशिष्ट IX - कायद्यांचे अंमलीकरण
 10. परिशिष्ट X - पक्षांतरच्या कारणाहून राजकीय पक्षांच्या किंवा सभागृह सदस्यांना अपात्र घोषित
 11. परिशिष्ट XI - पंचायत राज (राज्याकडे सोपवायची 29 विषयांची यादी)
 12. परिशिष्ट XII - नगरपालिका व महानगर पालिका
समाप्त

मराठी साहित्यिक व त्यांची टोपण नावे [Marathi Litterateur and their Pet Names]

 • कृष्णाजी केशव दामले – केशवसुत
 • गोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर
 • प्रल्हाद केशव अत्रे – केशवकुमार
 • राम गणेश गडकरी – गोविंदाग्रज
 • विष्णू वामन शिरवाडकर – कुसुमाग्रज
 • निवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम
 • माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन
 • चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
 • आत्माराम रावजी देशपांडे – अनिल

Monday, December 30, 2013

महाराष्ट्रातील अभयारण्ये [Sanctuaries in Maharashtra]

जिल्हाचे नाव अभयारण्याचे नाव जिल्हाचे नाव अभयारण्याचे नाव
सांगली सागरेश्वर भंडारा नवेगांव
अहमदनगर रेहेकुरी अहमदनगर देऊळगांव रेहेकुरी
कोल्हापूर राधानगरी ठाणे तानसा
जळगांव यावल चंद्रपूर ताडोबा
अमरावती मेळघाट अमरावती ढाकणा कोळकाज
पुणे मुळा-मुठा औरंगाबाद जायकवाडी
मुंबई माहीम गडचिरोली चापराला
सोलापूर माळढोक कोल्हापूर चांदोली
अहमदनगर माळढोक सांगली चांदोली
सिंधुदुर्ग मालवण जळगांव गौताळा औट्रमघाट
चंद्रपूर मधमेश्वर औरंगाबाद गौताळा औट्रमघाट
ठाणे भिमाशंकर अमरावती कोळकाज
पुणे भिमाशंकर सातारा कोयना
मुंबई बोरीवली(संजय गांधी) यवतमाळ किनवट
वर्धा बोर अकोला काटेपूर्णा
रायगड फणसाड अहमदनगर कळसूबाई
नांदेड पैनगंगा रायगड कर्नाळा
यवतमाळ पैनगंगा जळगांव औट्रमघाट
नागपूर पेंच चंद्रपूर अंधेरी
सोलापूर नान्नज धुळे अनेर
चंद्रपूर नांदूर मध्यमेश्वर भंडारा नागझिरा

भारताचे जनक / शिल्पकार [Indians Author / Architect]

 • आधुनिक भारताचे जनक - राजा राममोहन रॉय
 • आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.
 • भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.
 • भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी
 • भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.
 • भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
 • मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
 • भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.
 • भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.
 • आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.
 • आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.
 • स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.
 • भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
 • भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.
 • भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.
 • भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.
 • भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

Sunday, December 29, 2013

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे [Hill Station in Maharashtra]

 •     आंबोली (सिंधुदुर्ग)
 •     खंडाळा (पुणे)
 •     चिखलदरा-गाविलगड (अमरावती)
 •     जव्हार (ठाणे)
 •     तोरणमाळ (नंदुरबार)
 •     पन्हाळा (कोल्हापूर)
 •     पाचगणी (सातारा)
 •     भिमाशंकर (पुणे)
 •     महाबळेश्वर (सातारा)
 •     माथेरान (रायगड)
 •     मोखाडा (ठाणे)
 •     म्हैसमाळ (औरंगाबाद)
 •     येडशी (उस्मानाबाद)
 •     रामटेक (नागपूर)
 •     लोणावळा (पुणे)
 •     सूर्यामाळ (ठाणे)

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा [National Sports Awards announced]

पुरस्कार विजेते
 • राजीव गांधी खेलरत्न :- साईना नेहवाल (बॅडमिंटन)
 • अर्जुन पुरस्कार :- जोसेफ इब्राहिम, कृष्णा पूनिया (ऍथलेटिक्‍स), दिनेश कुमार (मुष्टियुद्ध), परिमार्जन नेगी (बुद्धिबळ), झूलन गोस्वामी (महिला क्रिकेट), दीपककुमार मोंडल (फुटबॉल), संदीप सिंग, जसजीत कौर हांडा (हॉकी), दिनेशकुमार (कबड्डी), संजीव राजपूत (नेमबाजी), रेहान पोंचा (जलतरण), कपिलदेव केजे (व्हॉलिबॉल), राजीव तोमर (कुस्ती), राजेश चौधरी (नौकानयन), जगसीर सिंग (पॅरालिंपिक ऍथलेटिक्‍स)
 • ध्यानचंद :- सतीश पिल्ले (ऍथलेटिक्‍स), कुलदीप सिंग (कुस्ती), अनिता चानू (वेटलिफ्टिंग)
 • द्रोणाचार्य :- ए. के. कुट्टी (ऍथलेटिक्‍स), सुभाष अग्रवाल (बिलियर्डस, स्नूकर), एल. इबोमचा सिंह (मुष्टियुद्ध), अजय कुमार बन्सल (हॉकी), कॅप्टन चांदरुप (कुस्ती)
 • खेल प्रोत्साहन :- सेनादल क्रीडा मंडळाला दोन गटात, टाटा स्टील लिमिटेड आणि मध्य प्रदेश क्रीडा आणि युवा विभाग.
 • पुरस्कार निवड समित्या :-१. राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, ध्यानचंद, तसेच प्रोत्साहन पुरस्कार: पी. टी. उषा यांच्या अध्यक्षतेखालील समिती

  २. द्रोणाचार्य पुरस्कार : अशोक कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समिती.

    'खेलरत्न' पुरस्कार रोख साडे सात लाख आणि स्मृतिचिन्ह

    'अर्जुन' पुरस्कार पुरस्कार आणि अर्जुनाचा ब्रॉंझचा पुतळा.

    'द्रोणाचार्य' आणि ध्यानचंद पुरस्काराचे प्रत्येकी पाच लाख 
 • राजीव गांधी खेलरत्न : आंतरराष्ट्रीय स्तरावरील दैदिप्यमान कामगिरीसाठी
 • अर्जुन पुरस्कार: खेळाडूंच्या उत्तम कामगिरीसाठी
 • ध्यानचंद पुरस्कार: जीवन गौरव पुरस्कार
 • द्रोणाचार्य पुरस्कार: प्रशिक्षकांकरिता

Saturday, December 28, 2013

राज्यसेवा इतिहास अभ्यासक्रम [State Preliminary Exam History Syllabus]

 • भारतात युरोपियन वसाहतीची सुरुवात (१६०० ते १८५७)
 • ब्रिटिश सत्तेची स्थापना व विस्तार (१७५७ - १८१८)
 • ब्रिटिश सत्तेचे एकत्रीकरण (१८१८-१८५७)
 • इंग्रज सरकारचे प्रशासन
 • १८५७ चा राष्ट्रीय उठाव 
 • भारतीय सुधारणा चळवळीला प्रारंभ
 • राष्ट्रसभेची (कॉग्रेसची)स्थापना
 • राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या संस्था
 • राष्ट्रीय चळवळीचा प्रारंभीचा कालखंड
 • राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेचा उदय व विकास 
 • सामाजिक सुधारविषयक कायदे
 • जहालवादाचा विकास आणि (लोकमान्य टिळकांची) भूमिका 
 • भारतीय क्रांतीकारी चळवळ 
 • गांधीजींचे पदार्पण 
 • गांधीवादाचा विकास आणि महात्मा गांधीजींची भूमिका 
 • दुसर्‍या महायुध्दाच्या काळातील स्वातंत्र्य चळवळ 
 • हिंदी राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे
 • मवाळवादी युग आणि गोपाळ कृष्ण गोखले यांची भूमिका
 • सत्याग्रह पर्वाला प्रारंभ
 • सविनय कायदेभंग आंदोलन
 • असहकार आंदोलन
 • चलेजाव आंदोलन (१९४२)
 • स्वदेशीची चळवळ
 • क्रांतिकारी चळवळी आणि भारतीय राष्ट्रीय आर्मी
 • भारत स्वतंत्र झाला
 • द्विराष्ट्र सिध्दान्त आणि हिंदुस्थानची फाळणी
 • भारतातील फ्रेंच आणि पोर्तुगीज वसाहतींची मुक्तता
 • संस्थानिक राज्यांचे विलीनीकरण
 • स्वतंत्र भारताची राज्यघटना
 • पंचशील आणि अलिप्तवाद 

Friday, December 27, 2013

राज्यसेवा पूर्वपरीक्षा-महत्वाची पुस्तके [State Preliminary Exam - Important Books]

 • आधुनिक भारताचा इतिहास- जयसिंगराव पवार
 • आधुनिक भारत- बिपीन चंद्र
 • समाजसुधारक- के सागर
 • महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
 • पंचायतराज- के सागर
 • भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
 • विज्ञान आणि तंत्रज्ञान- रंजन कोळंबे
 • गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
 • बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
 • चालू घडामोडी- लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक, योजना, लोकराज्य, इंटरनेट
 • गाईड- एकनाथ पाटील / के सागर
 • तसेच इयत्ता ८वी ते १२वी ची राज्य शासनाची पुस्तके वाचा

Wednesday, December 25, 2013

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०१० [Fifa Football World Cup 2010]

फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०१० (परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण नोंदी)

 • स्पर्धा संपन्न झाली : द. आफ्रिकेत (आफ्रिका खंडातील पहिलीच स्पर्धा )
 • अंतिम सामना : सॉकर सिटी स्टेडीयम,जोहान्नेसबुर्ग, द. आफ्रिका
 • विजेता : स्पेन
 • उपविजेता : नेदरलंड
 • ३ रे स्थान : जर्मनी
 • गोल्डन बॉल अवार्ड : दिएगो फोर्लन (उरुग्वेचा खेडाळू) - स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू
 • गोल्डन बूट अवार्ड : थोमस मुल्लर (जर्मनी)
 • शुभंकर : झाकुमी
 • स्पर्धेचे गीत : वाका वाका (Waka Waka ) - कोलंबियाची गायिका शकिरा हिने तयार केले.
 • स्पर्धेत वापरलेला चेंडू : जाबुलानी (निर्माता : आदिदास कंपनी ) या चेंडूवर बरीच टीका झाली.
 • वूवूझेला (Vuvuzela) : : लांब शिंगासारखे मोठा आवाज असलेले वाद्य प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय .; मात्र बऱ्याच खेळाडूंनी एकाग्रता भंग होत असल्याचा आरोप केला.
 • 19 वी वर्ल्ड कप स्पर्धा
 • स्पेन पहिल्यांदाच विजेता .
 • सर्वाधिक विजेतेपदे: ब्राझील (एकूण 5 )
 • FIFA चे पूर्ण रूप: Fédération Internationale de Football Association

महाराष्ट्र - सांस्कृतिक धोरण [Maharashtra - Cultural Policy]

महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक धोरणातील प्रमुख बाबी

 •  'राज्य सांस्कृतिक निधी' ची स्थापना. - शासकीय अर्थसहाय्य आणि लोकसहभाग यातून; या निधीतून केवळ शासकीय तरतुदींतून सहजगत्या न राबविता येणाऱ्या योजना /उपक्रम राबविले जातील.
 •  मराठी भाषा विभाग स्थापन केला जाईल.
 •  भाषा सल्लागार मंडळ स्थापन होणार.
 •  मुंबईत भाषाभवन उभे राहणार.- भाषा आणि साहित्यविषयक उपक्रम राबविण्यासाठी.
 •  मराठीसाठी 'प्रमाण भाषा कोश ' मंडळ स्थापन होणार.
 •  प्रत्येक तालुक्यात एक खुले नाट्यगृह.
 •  जिल्हा पातळीवर खाजगी सहकार्याने नाट्यगृह.
 • मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज (नियोजित स्थळ: अरबी समुद्रात), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (चैत्यभूमी ), महात्मा फुले आणि राजर्षी  शाहू महाराज यांचे स्मारक उभे राहणार.
 • प्रत्येक महसुली विभागात, विभागीय पातळीवर 'कलासंकुल' उभे करणार.
 • साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने अध्यासन रशियात स्थापण्याचा प्रयत्न करणार.
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कोलंबिया विद्यापीठ (अमेरिकेत) तर महर्षी वि.रा.शिंदे यांच्या नावाने ऑक्सफर्ड (ब्रिटन ) विद्यापीठात अध्यासन निर्माण करण्यात शासन प्रयत्न करेल.
 • शिवकालीन किल्ल्यांच्या ठिकाणी "शिवकिल्ले मालिका योजना " तयार करणार.
 • पैठण येथे संतपीठ
 • महाराष्ट्र ललित कला अकादमीची स्थापना.
 • मराठी बोली भाषा अकादमी उभारणार.
 • महाराष्ट्र प्रगत अध्ययन केंद्र नावाची स्वायत्त संस्था उभी राहणार- 'महाराष्ट्रविद्या' या नवीन ज्ञानशाखेच्या अभ्यासासाठी.

Tuesday, December 24, 2013

PSI पूर्व परीक्षा - चालू घडामोडीवरील प्रश्नोत्तरे - भाग १ [PSI Pre Exam - Current Affairs]

२० जून २०१० ला झालेल्या PSI पूर्व परीक्षेतील चालू घडामोडीवरील प्रश्नांची उत्तरे व त्या अनुषंगाने इतर माहिती ( भाग -१ )

 • आय.पी.एल 2009 चा विजेता संघ कोणता? ---> डेक्कन चार्जर्स हैदराबाद
 • आय.पी.एल 2008 चा विजेता --> राजस्थान रॉयल्स
 • आय.पी.एल 2010 चा विजेता --> चेन्नई सुपरकिंग्स
 • आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा या जिल्यात आहेत?--> रत्नागिरी (करबुडे :लांबी 6 .5 कि.मी.)
 • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची करणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष -->डॉ. नरेंद्र जाधव 
 • राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषणा :-->डॉल्फिन
 • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे--> नाशिक
 • (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ : नागपूर ;
  कर्मयोगी गाडगे महाराज विद्यापीठ : अमरावती ;
  स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ: नांदेड)
 • दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : मंगेश पाडगावकर
  (ठिकाण :दुबई )
  तिसरे लंडन येथे होणार आहे. 
 • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : शिव शंकर मेनन (4 थे सुरक्षा सल्लागार)
  या पूर्वी एम. के. नारायणन होते. ते सध्या प. बंगालचे राज्यपाल आहेत .
 • स्वाईन फ्लू ची साथ 2009 मध्ये सर्वप्रथम कोणत्या देशात सुरु झाली..> मेक्सिको
  स्वाईन फ्लू --> H1N1
  बर्ड फ्लू --- > H5N1
 •  स्वाईन फ्लचा  भारतातील पहिला रुग्ण कोठे सापडला -->हैदराबाद
 • कानू सन्याल कशाशी संबधित होते?---> कष्टकरी -कामगार चळवळ (साम्यवादी विचारसरणीचे कानू सन्याल हे नक्षलबारी येथील उठावाचे प्रमुख नेते होते . हीच चळवळ पुढे नक्षलवादी चळवळ बनली. त्यांनी अलीकडेच आत्महत्या केली .)
 • भोपाळ येथील कारखान्यातील मिथिल आयसो साईनाईड च्या विषारी वायुगळतीमुळे हजारोंचे बळी गेले.
  (1984 ला झालेली दुर्घटना. संबधित कंपनी: युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड .- कीटकनाशक बनवारणी कंपनी .
  प्रमुख :वार्रेन अंडरसन)
 •   हॉकी विश्वचषक सलामी सामन्यात ......या खेळाडूवर 3 सामन्यांची बंदी घातली गेली --> शिवेंद्र सिंग
  (हॉकी विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली : नवी दिल्ली येथे.
  भारताचे स्थान : 8 वे.
  विजेता संघ : ऑस्ट्रेलिया; उपविजेता संघ: जर्मनी