प्रश्नसंच - २० [विज्ञान]

प्र.१} हवेचे तापमान ५ अंश सेल्सिअसने वाढवल्यास ध्वनीचा हवेतील वेग कितीने वाढेल ?

A. ६ m/s
B. ३६ m/s
C. ३ m/s
D. ९ m/s


C. ३ m/s

प्र.२} WHOच्या मते मानवासाठी सर्वोत्तम ध्वनीतीव्रतेची पातळी किती असावी ?

A. ४० db
B. ४५ db
C. ३८ db
D. ५० db


B. ४५ db

प्र.३} पांढ-या रंगामध्ये सात रंगांचे किरण समाविष्ट असतात. हे सर्वप्रथम कोणी शोधले ?

A. न्यूटन
B. आईनस्टाईन
C. नील्स बोहर
D. अलेक्झांडर फ्लेमिंग


A. न्यूटन

प्र.४} A.C. विद्युतधारेचे रुपांतर D.C. विद्युतधारेमध्ये रुपांतर करण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते ?

A. ट्रान्सफॉर्मर
B. ऑसीलेटर
C. रेक्टीफायर
D. कॅपेसिटर


C. रेक्टीफायर

प्र.५} समुद्राचे पाणी निळे दिसते कारण......................

A. प्रकाशाचे अपवर्तन
B. प्रकाशाचे अपस्करण
C. प्रकाशाचे विकिरण
D. प्रकाशाचे परिवर्तन


C. प्रकाशाचे विकिरण

प्र.६} मानवाची श्राव्य मर्यादा _ _ _ _ _ _ _ दरम्यान असते.

A. ०.००२ KHz ते ०.२०२ KHz
B. ०.२ KHz  ते २.० KHz
C. ०.०२ KHz  ते २० KHz
D. २ KHz  ते २० KHz


C. ०.०२ KHz ते २० KHz

प्र.७} खालील विधान आणि स्पष्टीकरण वाचून योग्य पर्याय निवडा.

विधानः- अ] द्रव आणि वायूमध्ये उष्णतेचे स्थानांतरण अभिसरण पद्धतीने होते.
स्पष्टीकरणः- ब] अभिसरण प्रक्रियेमुळे पृथ्वीवरील वातावरण तापते व समुद्रामध्ये प्रवाह निर्माण होतात.

पर्याय:-
A. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

प्र.८} योग्य विधाने ओळखा.

अ] एकमेकांशी काटकोनात ठेवलेल्या दोन आराशांमध्ये ठेवलेल्या वस्तूच्या दोन्ही आराशांमध्ये तीन प्रतिमा दिसतील.
ब] आरसे जर एकमेकांना समांतर ठेवले तर दोन्ही आरशांमध्ये वस्तूच्या अनंत प्रतिमा दिसतील.

पर्याय:-
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

प्र.९} पृथ्वी आणि सूर्य यामधील समान अंतरावर असणा-या अंतराळयानातील व्यक्तीस काय निदर्शनास येईल ?

अ] आकाश काळे दिसेल.
ब] तारे चकाकताना दिसतील.
क] पृथ्वीच्या तापमानापेक्षा जास्त तापमान.

पर्याय:-
A. फक्त अ आणि क
B. फक्त अ आणि ब
C. फक्त क
D. वरील सर्व


A. फक्त अ आणि क

प्र.१०} खालील विधान आणि स्पष्टीकरण वाचून योग्य पर्याय निवडा.

विधान अ] - हिरा हा संपूर्ण आंतरिक परिवर्तनामुळे चकाकतो.
स्पष्टीकरण ब] - हि-याचा क्रांतिक कोन हा अपाती कोनापेक्षा मोठा असतो.

पर्याय
A. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


C. अ बरोबर आणि ब चूक
Previous Post Next Post