प्रश्नसंच - २४ [इतिहास]

प्र.१} खालीलपैकी कोणती निर्मिती गुप्तकालीन नाही ?

A. भाग लेण्या
B. श्रीलंकातील खडकाळ सिग्रीया मंदिर
C. महाबलीपुरम लेण्या मंदिर
D. सितन्नावसल मंदिर


C. महाबलीपुरम लेण्या मंदिर

प्र.२} विशाखादत्त यांच्या देवी चंद्र्गुप्तम संदर्भात खालीलपैकी कोणते विधान लागू पडते ?

A. गीत काव्य
B. राजकीय नाट्य
C. वैज्ञानिक दंतकथा
D.आध्यात्मिक स्पष्टीकरण


B. राजकीय नाट्य

प्र.३} नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता ?

A. लोखंड
B. तांबे
C. चांदी
D. यापैकी नाही.


D. यापैकी नाही.

प्र.४} अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्वज्ञान होते ?

A. जैन
B. वैष्णव
C. शीख
D. बौद्ध


B. वैष्णव

प्र.५} रत्न्मालिका आणि कविराजमार्ग या ग्रंथांची रचना कोणी केली ?

A. हर्षवर्धन
B. राजा हाल
C. अमोघवर्ष
D. विक्रमादित्य


C. अमोघवर्ष

प्र.६} खालील वैशिष्ठ्ये कोणत्या संस्कृतीची आहेत ते ओळखा ?

अ] या काळात मानव सोने, चांदी, ब्राँझ धातूपासून बनवलेले अलंकार वापरत
ब] या संस्कृतीचा काळ इ.स.पु.१००० वर्षापूर्वीचा आहे.
क] या काळातील मृत अवशेष शिलावर्तुळात पुरत असत.

पर्यायः-
A. सिंधू
B. महापाषाण
C. मेसोपोटेमिया
D. जॉर्वे


B. महापाषाण

प्र.७} कापसाच्या कापडाचा तुकडा हडप्पातील कोणत्या ठिकाणी सापडला ?

अ] लोथल
ब] धोलविरा
क] राखीगडी

पर्यायः-
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र.८} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] दक्षिण भारतातील ईश्वाकु राज्यकर्ते बौद्ध धर्माच्या विरोधी होते.
ब] पूर्व भारतातील पाल घराणे हे बौद्ध धर्माचे आश्रय होते.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


B. फक्त ब

प्र.९} खालीलपैकी कोणती बाब कुशाणांशी संबंधित आहे ?

अ] त्यांनी सुवर्णमुद्रा चलनात आणल्या.
ब] त्यांचा चीनमधील राज्यकर्त्यांशी संघर्ष उद्भवला.
क] गांधार शैलीतील शिल्पांची निर्मिती
ड] मथुरा येथे देवकुल स्थापन केले.

पर्यायः-
A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. अ, ब आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र.१०} खाली दिलेल्या प्राचीन मंदिरे व त्यांचे स्थान यांच्या योग्य जोड्या लावा.

[प्राचीन मंदिरे] [ठिकाणे]
A] विद्याशंकर मंदिर I] आंध्रप्रदेश
B] राजाराणी मंदिर II] कर्नाटक
C] कंदारीय महादेव मंदिर  III] मध्यप्रदेश
D] भीमेश्वर मंदिर IV] ओडिशा

A. A-II, B-IV, C-III, D-I
B. A-II, B-III, C-IV, D-I
C. A-I, B-IV, C-III, D-II
D. A-I, B-III, C-IV, D-II


A. A-II, B-IV, C-III, D-I
Previous Post Next Post