प्रश्नसंच - ४ [इतिहास]

प्र.१  महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?

A. लतिका घोष
B. सरोजिनी नायडू
C. कृष्णाबाई राव
D. उर्मिला देवी


A. लतिका घोष

प्र.२  पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?

A. अक्स-ला-चॅपेलचा तह
B. पॉंडेचेरीचा तह
C. मँगलोरचा तह
D. पॅरिसचा तह


A. अक्स-ला-चॅपेलचा तह

प्र.३  १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?

A. खान बहादूर खान
B. कुंवरसिंग
C. मौलवी अहमदुल्ला
D. रावसाहेब


B. कुंवरसिंग

प्र.४   डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले ?

A. १८४९
B. १८५१
C. १८५३
D. १८५४


C. १८५३

प्र.५  १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले ?

A. फ्री इंडिया
B. नया भारत
C. फ्री प्रेस जर्नल
D. लीडर


D. लीडर

प्र.६  १८५७ च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही


C. वरील दोन्ही

प्र.७   खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.

अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन

पर्याय
A. अ-ब-क-ड
B. अ-क-ब-ड
C. क-अ-ब-ड
D. अ-ड-क-ब


B. अ-क-ब-ड

प्र.८   विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.
स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.

पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

प्र.९   कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?

A. भारत सरकारचा कायदा १९३५
B. भारत सरकारचा कायदा १९१९
C. भारत कौन्सिल कायदा १९०९
D. भारत कौन्सिल कायदा १८९२


C. भारत कौन्सिल कायदा १९०९

प्र.१०   विधान:- अ] १९३९च्या त्रिपुरा अधिवेशनाच्या अध्यक्षीय निवडणुकीत सुभाषचंद्र बोस यांनी सितारामय्या यांचा पराभव केला.
स्पष्टीकरण:- ब] सितारामय्या यांना निवडणुकीत महात्मा गांधींचा पाठींबा होता.

पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे,
B.फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


B. कोलकाता
Previous Post Next Post