प्रश्नसंच - ५ [अर्थशास्त्र]

प्र.१  संपूर्ण भारतीयांच्या मालकीची पहिली बँक कोणती ?

A. हिंदुस्थान बँक
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
C. पंजाब नॅशनल बँक
D. स्टेट बँक ऑफ इंडिया


C. पंजाब नॅशनल बँक

प्र.२  खालीलपैकी कोणती बँक प्रेसिडेन्सी बँक म्हणून ओळखली जात नव्हती ?

A. बँक ऑफ बॉम्बे
B. बँक ऑफ कलकत्ता
C. बँक ऑफ हैद्राबाद
D. बँक ऑफ मद्रास 


C. बँक ऑफ हैद्राबाद

प्र.३  उत्पादन क्षमतेच्या कमतरतेमुळे निर्माण होणारी बेरोजगारी कोणती ?

A. संरचनात्मक
B. सुशिक्षित
C. चक्रीय
D. घर्षणात्मक


A. संरचनात्मक

प्र.४   जीवनाची भौतिक गुणवत्ता निर्देशांक तयार करताना खालीलपैकी कोणत्या घटकाचा विचार केला जात नाही ?

A. आयुर्मान
B. साक्षरता
C. जन्मदर
D. मृत्युदर


C. जन्मदर

प्र.५  स्थानिक क्षेत्रीय बँक संबंधी अयोग्य पर्याय निवडा.

A.या बँकांचे कार्यक्षेत्र तीन सलग जिल्ह्यांचा विभाग आहे.
B. स्थानिक क्षेत्रीय बँकांच्या स्थापनेचे धोरण २००२ सालच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले.
C. या बँकांचे भाग भांडवल किमान ५ कोटी रुपये असावे.
D. या बँकांना जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राबाहेर शाखा काढण्यास बंदी आहे.


B. स्थानिक क्षेत्रीय बँकांच्या स्थापनेचे धोरण २००२ सालच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले.

प्र.६  नरसिंहन समिती-२ च्या शिफारसीने खालीलपैकी कोणती घटना घडली ?

A. भारताने उदारीकरण धोरण स्वीकारले.
B. RBI ने SBI मधील भागीदारी भारत सरकारला विकली.
C. संपूर्ण भारतात समान मूल्यवर्धित कर लागू करण्यात आला.
D. वरीलपैकी सर्व


B. RBI ने SBI मधील भागीदारी भारत सरकारला विकली.

प्र.७. १९९४ च्या भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या अंशिक खाजगीकरणाने खालीलपैकी कोणत्या बाबी घडल्या ?

अ] बँकांनी खुल्या बाजारात शेअर्स विकून भांडवल उभारणीची संमती मिळाली.
ब] भारतीय बँकांमध्ये परकीय प्रत्यक्ष गुंतवणुकीस अटीनुसार संमती मिळाली.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ आणि ब दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही


C. अ आणि ब दोन्ही

प्र.८  खालील दरडोई उत्पन्न [गट १] आणि त्या सर्वेक्षणाशी संबंधित व्यक्ती[गट २] यांच्या योग्य जोड्या लावा.

गट १ गट २
अ] ६२ रु. I] एफ शिरास
ब] २० रु. II] दादाभाई नौरोजी
क] ४९ रु. III] व्ही.के.आर.व्ही.राव

पर्याय
A. अ-I, ब-II, क-III
B. अ-III, ब-II, क-I
C. अ-III, ब-I, क-II
D. अ-II, ब-I, क-III


B. अ-III, ब-II, क-I

प्र.९   मानव विकास निर्देशांकात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होत नाही ?

अ] मृत्यू समयीचे वर
ब] प्रौढ साक्षरता दर
क] पोषण मुल्य उपलब्धता

पर्याय
A. फक्त अ आणि ब
B. फक्त अ आणि क
C. फक्त ब आणि क
D. वरील सर्व


B. फक्त अ आणि क

प्र.१०   केंद्रीय सांख्यिकी संस्थेसंबंधी [CSO] अयोग्य विधान ओळखा.

अ] या संस्थेच्या स्थापनेची घोषणा १९५४ मध्ये झाली.
ब] भारतात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची जबाबदारी या संस्थेवर आहे.
क] या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
ड] संस्थेचा कारभार १९५५ साली सुरु झाला.

पर्याय
A. अ आणि ड
B.फक्त क
C. फक्त ड
D. क आणि ड


B.फक्त क
Previous Post Next Post