प्रश्नसंच - ३२ [सामान्य विज्ञान]

प्र १.} घरातील सिलेंडरमध्ये LPG वायू कोणत्या स्थितीत असतो ?

A. स्थायू
B. द्रव
C. वायू
D. स्थायू आणि द्रव


C. वायू

प्र २.} समुद्राचे खारट पाणी कोणत्या प्रक्रियेने शुद्ध करतात ?

A. बाष्पीभवन
B. उर्ध्वपातन
C. प्रभाजी उर्ध्वपातन
D. उत्कलन


B. उर्ध्वपातन

प्र ३.} चुकीचे विधान ओळखा.

अ] मिथेन छपाईची शाई तयार करण्यासाठी वापरतात.
ब] ग्लिसरीन डायनामाईट तयार करण्यासाठी वापरतात.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


D. एकही नाही

प्र ४.} पावसाचे पाणी खडकांवर पडल्यावर काय होते ?

A. पाण्यात सोडियम क्लोराईड मिसळते.
B. पाण्यात सोडियम कार्बोनेट मिसळते.
C. पाण्यात नायट्रोजन वायू मिसळतो.
D. पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट मिसळते.


D. पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट मिसळते.

प्र ५.} कोणत्या प्रक्रियेने कच्च्या तेलापासून गेसोलीन मिळवतात ?

A. बाष्पीभवन
B. उर्ध्वपातन
C. प्रभाजी उर्ध्वपातन
D. उत्कलन


C. प्रभाजी उर्ध्वपातन

प्र ६.} खालीलपैकी कोणत्या द्रावणातून विद्युतधारा वाहते ?

A. ग्लिसरीन
B. अल्कोहोल
C. युरिया
D. हायड्रोक्लोरिक आम्ल


D. हायड्रोक्लोरिक आम्ल

प्र ७.} टंगस्टन स्टील मध्ये खालीलपैकी काय नसते.

अ] लोह
ब] कार्बन
क] निकेल
ड] टंगस्टन
इ] क्रोमियम

पर्याय
A. ब आणि क
B. फक्त क
C. क आणि इ
D. ब आणि इ


C. क आणि इ

प्र ८.} चुकीचे विधान ओळखा.

A. सोने मूलद्रव्याचा अणुअंक ७९ असतो.
B. सोने मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक १९७ असतो.
C. सोने नायट्रिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्लाच्या संहत द्रावणात विरघळतो.
D. २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ९८% सोने असते.


D. २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ९८% सोने असते.
{२२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ९१%-९५% सोने असते.}

प्र ९.} असत्य विधाने ओळखा.

अ] फॉस्फोरस हा चकाकण्याची क्षमता असणारा धातू आहे.
ब] फॉस्फोरसचा शोध ब्रॅंड या शास्त्रज्ञाने लावला.
क] फॉस्फोरस अत्यंत क्रियाशील असून तो निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही.

पर्याय
A. फक्त अ
B. अ आणि ब
C. ब आणि क
D. एकही नाही


A. फक्त अ

प्र १०.} चुकीचे विधान ओळखा.

अ] ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने लावला.
ब] पोटॅशियम डायऑक्साईड आणि सोडियम बायकार्बोनेट यापासून ऑक्सिजनची निर्मिती करतात.
क] वेल्डिंग करताना असेटिलिन बरोबर वापर करतात.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. ब आणि क
D. एकही नाही


B. फक्त ब
Previous Post Next Post