प्रश्नसंच - ४६ -[इतिहास]

प्र १.} गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पंचशीलांचा अर्थ पुढे दिला आहे. त्यापैकी चुकीचा अर्थ निवडा.

A. अस्तेय : सुखाच्या हव्यासावर विजय मिळवावा
B. अहिंसा : हिंसा करू नये
C. सत्य : नेहमी खरे बोलावे
D. संयम : मोह टाळावा


A. अस्तेय : सुखाच्या हव्यासावर विजय मिळवावा
{अस्तेय : चोरी करू नये}

प्र २.} संगम साहित्याचे केंद्र व राजाश्रय हा खालीलपैकी कोणता होता ?

A. मदुराइचे पाण्डय
B. उरायपुरचे चोल
C. वंजीचे चेर
D. वरील सर्व


A. मदुराइचे पाण्डय

प्र ३.} गायत्री मंत्राचा उल्लेख कोणत्या वेदामध्ये आहे ?

A. ऋग्वेद
B. अथर्ववेद
C. सामवेद
D. यजुर्वेद


A. ऋग्वेद

प्र ४.} आर्य हि संज्ञा खालीलपैकी काय दर्शवते ?

A. समान भाषेचा गट
B. आदिवासी लोक
C. वांशिक लोक
D. उच्चवर्णीयांचा गट


A. समान भाषेचा गट

प्र ५.} ब्राम्ही लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ?

A. विल्यम जोन्स
B. जेम्स प्रिन्सेप
C. जॉन मार्शल
D. इजे मॅके


B. जेम्स प्रिन्सेप

प्र ६.}खालीलपैकी कोणत्या लेखामध्ये अशोकाच्या कलिंगा युद्धाचा उल्लेख आढळतो ?

A. स्तंभ लेख - १
B. स्तंभ लेख - ७
C. शिला लेख - ११
D. शिला लेख - १३


D. शिला लेख - १३

प्र ७.} विधान अ] उत्तर वैदिक काळात राजपद हे वंशिक बनले.
स्पष्टीकरण ब] 'शतपत ब्राम्हण' साहित्यात दिलेल्या सूत्राचा वापर करून १० पिढ्यांकरिता राज्य राखून घेण्यात आले.

पर्याय:-
A. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

प्र ८.} खालील राज्यकर्त्यांचा कालखंडानुसार योग्य क्रम लावा.

अ] समुद्रगुप्त
ब] कुमारगुप्त
क] चंद्रगुप्त
ड] स्कंदगुप्त

पर्याय:-
A. अ-ब-क-ड
B. अ-क-ब-ड
C. ब-ड-अ-क
D. ड-अ-क-ब


B. अ-क-ब-ड

प्र ९.} विधान अ] ऋग्वेदकालीन राजे प्रशासकीय व्यवस्था संभाळत नसत.
स्पष्टीकरण ब] ऋग्वेदिक अर्थव्यवस्था प्रशासकीय व्यवस्था सांभाळण्यास सक्षम नव्हती.

पर्याय:-
A. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


A. अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे.

प्र १०.} ऋग्वेदिक काळामध्ये प्रार्थनेचा प्रमुख हेतू कोणता होता ?

अ] अध्यात्मिक उन्नती साधने.
ब] भौतिक सुखाच्या गोष्टी मिळविणे.
क] मुक्ती मिळविणे.

पर्याय:-
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


A. अ आणि ब
Previous Post Next Post