Home प्रश्नसंच - ५१ [चालू घडामोडी] bySunil Jadhavar •February 20, 2014 0 प्र १.} किती रुपयांच्या प्लास्टिकच्या चलनी नोटा RBI लवकरच व्यवहारात आणणार आहे ? A. १० रु. B. १०० रु C. २० रु D. ५० रु उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. १० रु. प्र २.} नुकतीच कोणत्या क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला ? A. महेला जयवर्धने B. महेंद्रसिंग धोनी C. विराट कोहली D. कुमार संगाकारा उत्तरासाठी येथे क्लिक करा. D. कुमार संगाकारा प्र ३.} कोणत्या सोशल नेट्वर्किंग साईटला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली ? A. ओर्कुट B. फेसबुक C. ट्विटर D. फ्लिकर उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. फेसबुक प्र ४.}डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली ? A. १९५६ B. १९५७ C. १९५८ D. १९५९ उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. १९५८ प्र ५.} सध्या जागृत असलेला तुंगराहुआ ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ? A. इक्वेडोर B. इटली C. जपान D. लातीव्हीया उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. इक्वेडोर प्र ६.} भारताने नुकताच कोणत्या देशाबरोबर ग्रीन एनर्जी कॉरीडॉरबाबतचा करार केला ? A. अमेरिका B. रशिया C. जर्मनी D. मलेशिया उत्तरासाठी येथे क्लिक करा. C. जर्मनी प्र ७.} नोव्हेंबर २०१३ मध्ये ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे ३२ लोकांचा मृत्यू कोणत्या देशात झाला ? A. मादागास्कर B. नायजेरिया C. अल्जेरिया D. सोमालिया उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. मादागास्कर प्र ८.} महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच 'इको सेन्सेटिव्ह झोन' म्हणून मंजुरी दिली ? A. मेळघाट B. ताडोबा C. सह्याद्री D. पेंच उत्तरासाठी येथे क्लिक करा. B. ताडोबा 'इको सेन्सेटिव्ह झोन'चा दर्जा मिळविणारा ताडोबा हा राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे.आता या प्रकल्पाच्या १० किमी परिघातील वीज-खाण प्रकाल्पांसारख्या मानवी हस्तक्षेपांवर बंदी येणार आहे. प्र ९.} ५ जानेवारी २०१४ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या 'जीसॅट-१४' उपग्रहाबाबत योग्य विधाने ओळखा. अ] या उपग्रहाचे प्रक्षेपण GSLV-D5 या प्रक्षेपकाद्वारे करण्यात आले. ब] यासाठी संपूर्ण देशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला होता. क] 'जीसॅट-१४' हा उपग्रह 'जीसॅट-५' या उपग्रहाला पर्याय ठरणार असून त्याची जागा घेणार आहे. पर्यायः- A. अ आणि ब योग्य B. ब आणि क योग्य C. अ आणि क योग्य D. वरील सर्व योग्य उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. अ आणि ब योग्य 'जीसॅट-१४' हा उपग्रह 'जीसॅट-३' या उपग्रहाला पर्याय ठरणार असून त्याची जागा घेणार आहे. प्र १०.} २०१४ या वर्षात RBI १० रुपयांच्या प्लास्टिकच्या १ अब्ज नोटा पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर व्यवहारात आणणार आहे. खालीलपैकी कोणते शहर त्या पाच शहरांपैकी नाही ? A. मुंबई B. कोची C. म्हैसूर D. जयपूर उत्तरासाठी येथे क्लिक करा. A. मुंबई २०१४ या वर्षात RBI १० रुपयांच्या प्लास्टिकच्या १ अब्ज नोटा कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर व्यवहारात आणणार आहे. या नोटांचे सरासरी आयुर्मान ५ वर्षाचे असेल व या नोटांची नक्कल करणे कठीण असेल. Facebook Twitter