प्रश्नसंच - ६२ [सामान्य ज्ञान]

प्र १.} ताश्कंद कराराने कोणत्या युध्दाची समाप्ती झाली?

A. 1962 चे भारत -चीन युध्द
B. 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द
C. 1971 चे भारत -पाक युध्द 
D. 1999 चे कारगील युध्द


B. 1965 चे भारत -पाकिस्तान युध्द
प्र २.} ग्राम न्यायालयांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते/कोणती  विधान /विधाने बरोबर आहे /आहेत?

अ. महाराष्ट्रात ग्राम-न्यायालये ही 'ग्राम-न्यायालय कायदा 2008 ' नुसार स्थापण्यात आली.
ब. ग्राम-न्यायालये स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते.
क. ही न्यायालये प्रामुख्याने फौजदारी खटल्यांशी संबंधित आहेत.
ड. या न्यायालयातील निकालाविरुध्द अपिलाचे अंतिम न्यायालय हे जिल्हा न्यायालय असेल.

A. अ,ब आणि क
B. अ,ब आणि ड
C. फक्त अ
D. वरील सर्व


D. वरील सर्व
प्र ३.}  परदेशी कपडे आणि वस्तू यांवरील बहिष्कार हे कोणत्या लढ्याचे वैशिष्टय होते?

A. स्वदेशी चळवळ
B. असहकार आंदोलन
C. भारत छोडो आंदोलन
D. सविनय कायदेभंग चळवळ


A. स्वदेशी चळवळ
प्र ४.}  __________ हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात.

A. राष्ट्रपती
B. पंतप्रधान
C. राज्यपाल
D. सरन्यायाधीश


C. राज्यपाल
प्र ५.} कारगील मधील विजयाची स्मृती 'कारगील विजय दिवस 'म्हणून केव्हा साजरा केला जातो ?

A. 16 डिसेंबर
B. 31 ऑक्टोबर
C. 14 जानेवारी
D. 26 जुलै


D. 26 जुलै
प्र ६.}  तिसरे इंग्रज-मराठा युद्धातला मराठ्यांचा सेनापती कोण होता ?

A. त्रिंबकजी डेंगळे
B. गंगाधर शास्त्री
C. बापू गोखले
D. यशवंतराव होळकर


C. बापू गोखले
प्र ७.} खालीलपैकी कोणते तत्त्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही ?

A. जगात ईश्वर एकच असून त्याचे स्वरूप सर्वव्यापी , निर्गुण व निराकारी आहे.
B. सर्व मानवप्राणी त्याची लेकरे आहेत.
C. भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.
D. मनुष्य प्राणी हा गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही.


C. भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्वशक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत असे मानणे.
प्र ८.} अयोग्य जोडी ओळखा.

A. राज्य पुनर्रचना आयोग : आंध्रप्रदेश
B. मद्रास राज्य : तामिळनाडू
C. बिलासपुर राज्य : हिमाचल प्रदेश
D. १९६६ : गुजरातची स्थापना


D. १९६६ : गुजरातची स्थापना [महाराष्ट्राची स्थापना : १ मे १९६०]
प्र ९.}  मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशावर अवलंबून असते ?

A. न्यायालये
B. विरोधी पक्षांच्या दबावावर
C. सरकारकडे असलेल्या उपलब्ध संसाधनांवर
D. लोकाच्या सहकार्यावर


C. सरकारकडे असलेल्या उपलब्ध संसाधनांवर
प्र १०.}  असत्य विधाने ओळखा.

A. महाराष्ट्राची स्थापना १९६० साली झाली.
B. दीव हे बेट खंबायतच्या आखातात आहे.
C. दादरा नगर हवेली १९५४ पर्यंत फ्रेंचांच्या ताब्यात होते.
D. गोव्याला १९८७ साली स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.


C. दादरा नगर हवेली १९५४ पर्यंत फ्रेंचांच्या ताब्यात होते.
[दादरा नगर हवेली १९५४ पर्यंत पोर्तुगीजांच्या ताब्यात होते.]
Previous Post Next Post