प्रश्नसंच - ६७ [अर्थशास्त्र]

प्र १.} 'सागर माला' कार्यक्रम कशासाठी प्रसिद्ध आहे ?

A. हवाई वाहतूक
B. सागर वाहतूक
C. ईशान्य भारत रस्ते विकास
D. भारत पाकिस्तान रेल्वे लाइन


B. सागर वाहतूक

प्र २.} २००६ साली सुरु झालेल्या २० कलमी कार्यक्रमात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही ?

A. ई-शासन
B. सामाजिक सुरक्षा
C. स्वछ पेयजल
D. अंतराळ संशोधन


D. अंतराळ संशोधन

प्र ३.}  डॉ. आंबेडकर दुग्ध रोजगार योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

A. महाराष्ट्र
B. उत्तर प्रदेश
C. गुजरात
D. बिहार


B. उत्तर प्रदेश

प्र ४.}  कल्पवृक्ष योजनेचा मुख्य हेतू कोणता ?

A. अनाथ विधवांना पेंशन
B. गरीब स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देणे
C. SC/ST आदिवासी स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देणे
D. गरीब स्त्रियांना वैद्यकीय सेवा देणे


C. SC/ST आदिवासी स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून देणे

प्र ५.} पंचधारा हि मध्यप्रदेशची योजना कोणासाठी आहे ?

A. शहरी रोजगार
B. ग्रामीण व आदिवासी स्त्रिया
C. ग्रामीण विधवा
D. ग्रामीण लघुउद्योग


B. ग्रामीण व आदिवासी स्त्रिया

प्र ६.}  'जन्मलेल्या शिशूला आरोग्य सुविधा' हा कोणत्या योजनेचा मुख्य हेतू आहे ?

A. मातोश्री योजना
B. जननी सुरक्षा योजना
C. वात्सल्य योजना
D. आयुष्यमती योजना


C. वात्सल्य योजना

प्र ७.}  'राष्ट्रीय महिला कोष'संबंधी योग्य विधाने ओळखा.

अ] या संस्थेची स्थापना १९९३ साली झाली.
ब] या योजनेंतर्गत गरीब महिलांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
क] या कोषामध्ये स्त्रियांसंबंधी सर्व सामाजिक कार्याचा समावेश होतो.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


A. अ आणि ब

प्र ८.}  खालील दिलेल्या वैशिष्ठ्यांवरून योजनेचे नाव ओळखा.

अ] या योजनेची सुरुवात २५ डिसेंबर २००५ पासून झाली.
ब] हि योजना १००% केंद्र पुरस्कृत आहे.
क] केंद्रीय रस्ते निधी मध्ये जमा झालेल्या डीझेल उपकराचा वापर या योजनेसाठी होतो.

A. इंदिरा आवास योजना
B. नागपूर योजना
C. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना
D. जवाहर रोजगार योजना


C. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना

प्र ९.} 'महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने'संबंधी योग्य विधाने ओळखा.

अ] या योजनेंतर्गत कुटुंबातील प्रतिव्यक्ती १०० दिवसांच्या रोजगाराची हमी दिली जाते.
ब] अर्ज केल्यापासून १५ दिवसात रोजगार उपलब्ध न झाल्यास लाभार्थ्यास महागाई भत्ता दिला जातो.
क] प्रकल्पाची निवड, अंमलबजावणीची जबाबदारी ग्रामसभेच्या शिफारसीनुसार ग्रामपंचायतीची आहे.

A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


B. ब आणि क

प्र १०.}  ‘वाल्मिकी आंबेडकर योजने'संबंधी योग्य विधाने ओळखा.

अ] हि योजना शहरी झोपडपट्टीतील लोकांसाठी आहे.
ब] हि योजना ग्रामीण झोपडपट्टीतील लोकांसाठी आहे.
क] हि योजना ग्रामीण मागासवर्गीय समाजातील अपंग लोकांसाठी आहे.

A. फक्त अ
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व


A. फक्त अ
Previous Post Next Post