लेटेस्ट चालू घडामोडी

Friday, February 28, 2014

प्रश्नसंच - ५९ [अर्थशास्त्र]

प्र १.} देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे ?

A. १४.९%
B. २०.१%
C. ०२.०२%
D. १८.९%


A. १४.९%

प्र २.} २००९-१० मधील निकषानुसार भारताचे दरडोई प्रतिमाह ग्रामीण आणि शहरी उत्पन्न अनुक्रमे [अंदाजे] किती आहे ?

A. ३०० रु. , ४०० रु
B. ५६५ रु. , ८७९ रु.
C. ६७२ रु. , ८५९ रु
D. ९५४ रु. , १००४ रु.


C. ६७२ रु. , ८५९ रु

प्र ३.}  २००९-१० च्या सुरेश तेंडूलकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे ?

A. ३८.२%
B. २४.५%
C. ४८.३%
D. १८.७%


B. २४.५%

प्र ४.} कोणत्या योजनेमध्ये बदल करून जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरु करण्यात आली ?

A. जवाहर रोजगार योजना
B. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
C. १ आणि २ दोन्ही
D. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना


A. जवाहर रोजगार योजना

प्र ५.} १ एप्रिल १९९९मध्ये  सहा योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरु करण्यात आली. खालीलपैकी कोणती योजना त्या ६ योजनांपैकी नाही.

A. IRDP
B. TRYSEM
C. DWCRA
D. ICDS


D. ICDS

प्र ६.}  योग्य विधाने ओळखा.

अ] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत देशाच्या मानव विकास निर्देशांकात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ब] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत महाराष्ट्राच्या मानव विकास निर्देशांकात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. एकही नाही
D. वरील दोन्ही


D. वरील दोन्ही

प्र ७.} सहस्त्रकालीन चिकास उद्दिष्ठासंबंधी अयोग्य विधाने ओळखा.

अ] १९९० ते २०१५ दरम्यान राष्ट्रीय दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण निम्म्यावर आणणे.
ब] १९९० ते २०१५ दरम्यान पाच वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण दोन तृतीयांशने कमी करणे.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. एकही नाही
D. वरील दोन्ही


C. एकही नाही

प्र ८.}  अयोग्य विधाने ओळखा.

अ] राज्य शासनाने २००५ साली राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम पारित केला.
ब] मागील काही वर्षांमध्ये महसुली तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण २००७-०८ वर्षी सर्वात कमी होते.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. एकही नाही
D. वरील दोन्ही


C. एकही नाही

प्र ९.}  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ खालीलपैकी कोणते कार्य करते ?

अ] हस्तकला कारागिरांना मदत.
ब] लघु उद्योगांना आयात निर्यातीसाठी मदत.
क] पैठण व येवला येथे दोन पैठणी केंद्र चालवते.

पर्यायः-
A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र १०.}  भांडवल बाजारासंबंधी योग्य विधाने ओळखा.

अ] भांडवल बाजारात मध्यमकालीन तसेच दीर्घकालीन कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालतात.
ब] या बाजारात उद्योजक व्यावसायिक या बाजारात शेअर्स, बॉन्डस वगैरे विकून भांडवलाची उभारणी
करतात.
क] भांडवल बाजार हा फक्त शुक्रवारी जिल्ह्याच्या ठिकाणी भरतो.

पर्यायः-
A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व


A. फक्त अ आणि ब

Thursday, February 27, 2014

प्रश्नसंच - ५८ [भूगोल]

प्र १.} नेवेली कोळसा क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?

A. आंध्रप्रदेश
B. कर्नाटक
C. केरळ
D. तामिळनाडू


D. तामिळनाडू

प्र २.} स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई बंदरावरील ताण कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते बंदर सर्वप्रथम बांधण्यात आले ?

A. न्हावाशेवा [JNPT]
B. कांडला
C. मार्मागोवा
D. मुंब्रा


B. कांडला

प्र ३.}  अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती सामुद्रधुनी लागते ?

A. पाल्क
B. जिब्राल्टर
C. मल्लाक्का
D. बिअरिंग


C. मल्लाक्का

प्र ४.} खालीलपैकी कोणते बंदर मलेशिया देशाशी संबंधित नाही ?

A. ब्रुनेई
B. मलाया
C. सेहाद
D. सारवाक


A. ब्रुनेई

प्र ५.} 'इल्मेनाईट' हे खनिज उत्पादन करणारे प्रमुख राज्य कोणते ?

A. आंध्रप्रदेश
B. कर्नाटक
C. केरळ
D. तामिळनाडू


C. केरळ [इल्मेनाईट हे Iron titanium oxide mineral आहे. जे मुख्यत्वे केरळमध्ये सापडते]

प्र ६.}  खाली दिलेल्या नद्यांपैकी कोणत्या नदीचा त्रिभुज प्रदेश मोठा आहे ?

A. हो-हॅंग-हो
B. नाईल
C. इरावती
D. मिसिसीपी


B. नाईल

प्र ७.} लोकतक जलविद्युत निर्मिती क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?

A. मेघालय
B. मिझोरम
C. त्रिपुरा
D. मणिपूर


D. मणिपूर

प्र ८.}  'शॉन'चे पठार खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

A. कंबोडिया
B. थायलंड
C. व्हिएतनाम
D. म्यानमार


D. म्यानमार

प्र ९.}  अयोग्य विधाने ओळखा.

अ] महाराष्ट्र हा शेंगदाणा तेल उत्पादनात अग्रेसर राज्य आहे.
ब] भारताला १०% कागद आयात करावा लागतो.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


A. फक्त अ

प्र १०.}  भारताच्या इतर किनारी भागांपेक्षा सौराष्ट्राचा किनारी भाग मत्स्य व्यवसायासंबंधी कमी विकसित आहे, कारण.........................

A. तेथील किनारी भागात पाण्याची क्षारता जास्त आहे.
B. औद्योगिक विकासामुळे जल प्रदूषणात वाढ झाली आहे.
C. मत्स्य व्यवसायासंदर्भात तेथील लोकांत जागरूकता नाही.
D. तेथील लोक कृषी आणि पशुपालन व्यवसायावर जास्त भर देतात.


D. तेथील लोक कृषी आणि पशुपालन व्यवसायावर जास्त भर देतात.

Wednesday, February 26, 2014

प्रश्नसंच - ५७ [इतिहास]

प्र १.} राष्ट्रकुट कोणत्या धर्माचे अनुयायी होते ?

A. बौद्ध
B. जैन
C. वैष्णव
D. शैव


B. जैन

प्र २.} अयोग्य जोडी ओळखा.

A. यादव - देवगिरी
B. राष्ट्रकुट - मान्यखेत
C. होयसाळ - द्वारसमुद्र
D. पांड्य - बेलूर


A. पांड्य - बेलूर

प्र ३.}  'राजतरंगिणी' या ग्रंथात कोणत्या प्रदेशचा इतिहास वर्णन केला आहे ?

A. मध्यप्रदेश
B. महाराष्ट्र
C. काश्मीर
D. राजस्थान


C. काश्मीर

प्र ४.} महमद गझनीने भारतावर पहिली स्वारी कधी केली ?

A. इ.स.१०००
B. इ.स.९९९
C. इ.स.९७५
D. इ.स.१००८


A. इ.स.१०००

प्र ५.} क्रिप्स मिशनला पोस्ट डेटेड चेक कोणी म्हंटले?

A. पट्टाभी सीतारामय्या
B. दादाभाई नौरोजी
C. न्या.रानडे
D. महात्मा गांधी


D. महात्मा गांधी

प्र ६.} भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यानचे दत्त-ब्रॅडली प्रबंध कशासंबंधी होता ?

A. कम्युनिस्ट चळवळ
B. भारतीयांना नागरी सेवेत प्रवेश
C. कामगार चळवळी
D. कृषी महसुलाच्या पद्धती


A. कम्युनिस्ट चळवळ

प्र ७.} सुलतान महंमद गझनीसोबत भारतात कोण आले ?

A. अल मसुदी
B.अल बरुनी
C. सुलेमान
D. इक्न हकल


C. सुलेमान

प्र ८.} भारतीय स्वातंत्र्य चळवळीत कोणत्या घटकाने सर्वात कमी प्रमाणात सहभाग घेतला ?

A. शेतकरी
B. राज्यांचे राजे
C. सरकारी अधिकारी
D. तुकडोजी महाराज


B. राज्यांचे राजे

प्र ९.} दिल्ली प्रस्तावामध्ये खालीलपैकी काय अंतर्भूत होते ?

अ] विभक्त मतदार संघाऐवजी एकत्रित मतदार संघ आणि मुस्लिमांना राखीव जागा
ब] केंद्रीय कायदेमंडळामध्ये मुस्लिम लीगला एक तृतीयांश प्रतिनिधीत्व देण्यात आले.
क] पंजाब व बंगाल मध्ये मुस्लिमांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व.

पर्यायः-
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. फक्त अ
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र १०.} खालीलपैकी कोणत्या राजांनी उत्तर भारतावर आक्रमण केले ?

अ] ध्रुव
ब] गोविंद तिसरा
क] इंद्र तिसरा

पर्यायः-
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. फक्त अ
D. वरील सर्व


D. वरील सर्व

Tuesday, February 25, 2014

प्रश्नसंच - ५६ [सामान्य अध्ययन]

प्र १.} 'जेव्हा माणूस जागा होतो'  पुस्तकाच्या लेखिका कोण ?

A. अनुताई वाघ
B. गोदावरी परुळेकर
C. आनंदीबाई जोशी
D. पंडिता रमाबाई


B. गोदावरी परुळेकर

प्र २.} आधुनिक आवर्तसारणीत .......... आवर्तने आहेत ?

A. ७
B. १६
C. १८
D. २१


A. ७

प्र ३.} आधुनिक आवर्तसारणीत .......... गण आहेत ?

A. १७
B. १६
C. १८
D. २१


C. १८

प्र ४.} व्होल्ट हे कश्याचे एकक आहे ?

A. विधुतधारा
B. विभवांतर
C. विधूतरोध
D. विधूतप्रभार


B. विभवांतर

प्र ५.} 'अखंड प्रेरणा-गांधी विचारांची' हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?

A. मोहन धारीया
B. अण्णा हजारे
C. डॉ. रघुनाथ माशेलकर
D. डॉ.विश्वनाथ कराड


B. अण्णा हजारे

प्र ६.} किरगीज लोकांचे मुख्य पेय ....... आहे.

A. चहा
B. कॉफी
C. क्युमीस
D. कोको


C. क्युमीस

प्र ७.} मानवी जठराचा आकार ........या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतो.

A. T
B. J
C. L
D. I


C. अ व ब दोन्ही

प्र ८.} भाऊराव पाटलांना कर्मवीर ही पदवी कोणी दिली ?

A. शाहू महाराज
B. महर्षी कर्वे
C. गाडगे महाराज
D. तुकडोजी महाराज


C. गाडगे महाराज

प्र ९.} वसंत वैभव पेक्षा लहान पण सुनंदा पेक्षा मोठा आहे, वासंती सुनंदा पेक्षा मोठी पण परंतु वसंत पेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण ?

A. वसंत
B. सुनंदा
C. वैभव
D. वासंती


B. सुनंदा

प्र १०.} एका विध्यार्थ्याचे बरोबर प्रश्न्याच्या दुप्पट प्रश्नाचे उत्तर चूक येते तर ५१ प्रश्नापैकी त्याचे किती प्रश्न बरोबर असतील ?

A. १७
B. ३४
C. ४८
D. ३०


१] १७

Monday, February 24, 2014

प्रश्नसंच - ५५ [इतिहास]

प्र १.} तिस-या अंग्लो-म्हैसूर युद्धात टिपू सुलतान विरुद्ध पुढीलपैकी कोणी संयुक्त फळी उभी केली ?

A. निजाम, कर्नाटकचा नवाब, इंग्रज
B. मराठे, इंग्रज, कर्नाटकचा नवाब
C. निजाम, मराठे, इंग्रज
D. त्रावणकोरचे राजे, मराठे, इंग्रज


C. निजाम, मराठे, इंग्रज

प्र २.} गोपाळ कृष्ण गोखले संबंधी पुढील विधानांचा विचार करा आणि योग्य विधाने ओळखा.

अ] १८९७ साली गोखलेंनी मॅंचेस्टर गार्डियन या वृत्तपत्रातून पुण्याच्या प्लेग कमिशनरवर टीका केली.
ब] त्या कृतीबद्दल गोखलेंनी इंग्लंडवरून भारतात परतल्यावर जाहीर माफी मागितली होती.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ व ब दोन्ही
D. एकही नाही


C. अ व ब दोन्ही

प्र ३.} अयोग्य विधान ओळखा.

A. १८१३च्या चार्टर कायद्याने कंपनीचे भारतीय व्यापारावरील अधिकार समाप्त झाले.
B. १७९३च्या चार्टर कायद्यान्वये कंपनीचा कार्यकाळ १० वर्षाने वाढविण्यात आला.
C. खेडा चळवळ मुंबई सरकार विरुद्ध होती.
D. १९२१मध्ये मोपला बंद आणि खिलाफत चळवळ एकमेकांत मिसळून गेले.


B. १७९३च्या चार्टर कायद्यान्वये कंपनीचा कार्यकाळ १० वर्षाने वाढविण्यात आला.

प्र ४.} खालीलपैकी मोपला बंडाचे तात्कालिक कारण कोणते ?

A. राष्ट्रीय सभेमध्ये पडलेली फुट.
B. इ.एफ.थॉमसने तिरुरांगडी येथे मशिदीत घुसून अली मुसालियरला पकडण्याचा प्रयत्न केला.
C. इंग्रजाचे खिलाफत विरोधी धोरण.
D. जमीनदारांचे मोपल्यांवरील अत्याचार


B. इ.एफ.थॉमसने तिरुरांगडी येथे मशिदीत घुसून अली मुसालियरला पकडण्याचा प्रयत्न केला.

प्र ५.} कॅबिनेट मिशन भारतात आले कारण...............

A. भारताचे सामाजिक प्रश्न सोडविण्याकरिता.
B. भारताच्या फाळणीला गती देण्याकरिता
C. भारताला सत्ता हस्तांतरित करण्याकरीता
D. राज्य घटनेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता


D. राज्य घटनेच्या प्रश्नावर तोडगा काढण्याकरिता

प्र ६.} खालीलपैकी कोणती बाब असहकार चळवळीशी संबंधित नाही.

A. परकीय वस्तूंवर बहिष्कार
B. कायदा न्यायालयांवर बहिष्कार
C. इंग्रजांनी केलेल्या कायद्यांना तुच्छ मानणे.
D. भारत सरकारच्या १९१९च्या कायद्यान्तर्गत घेतलेल्या निवडणुकांवर बहिष्कार.


C. इंग्रजांनी केलेल्या कायद्यांना तुच्छ मानणे.

प्र ७.} योग्य विधाने ओळखा.

अ] डेक्कन सभेची स्थापना गोखलेंनी केली.
ब] १८९५मध्ये टिळक व त्यांच्या सहका-यांनी पुण्याच्या सार्वजनिक सभेतून गोखले व रानडे यांना बाजूला सारले.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ व ब दोन्ही
D. एकही नाही


C. अ व ब दोन्ही

प्र ८.} होमरूलसंबंधी अयोग्य विधाने ओळखा.

अ] भारतीयांसाठी स्वराज्य हि होमरूलची मागणी होती.
ब] मद्रासमध्ये होमरूलची स्थापना अनी बेजंट यांनी केली.
क] या चळवळीमध्ये स्त्रिया व विद्यार्थ्यांचा समावेश होता.
ड] फ्रांसच्या होमरूलच्या धर्तीवर भारतात हि चळवळ सुरु झाली.

पर्यायः-
A. फक्त क व ड
B. फक्त क
C. फक्त ड
D. वरील सर्व


C. फक्त ड

प्र ९.} १८७८च्या भारतीय वृत्तपत्र कायद्यात खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो ?

अ] भारतीय वृत्तपत्रांमधून प्रतिज्ञा घेण्यात आली कि त्यांनी सरकारविरोधी लिखाण करू नये.
ब] जिल्हा दंडाधिकारी अशा वृत्तपत्रांकडून अनामत रक्कम मागवू शकत होता.
क] दंडाधिका-यांचा निर्णय अंतिम असेल त्यावर अपील करता येणार नाही.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. ब आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र १०.} शिक्षणाशी संबंधित हार्टोग समितीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. १९१३
B. १९१७
C. १९२९
D. १९३५


C. १९२९

Sunday, February 23, 2014

प्रश्नसंच - ५४ [सामान्य ज्ञान]

प्र.१.} पद्मभूषण पुरस्काराने 2013 च्या जानेवारीत गौरविण्यात आलेले मराठी साहित्यीक कोण ?

A. मंगेश पाडगावकर
B. राजन गवस
C. भालचंद्र नेमाडे
D. ना.धों.महानोर


A. मंगेश पाडगावकर

प्र.२.} सप्टेंबर 2012 मध्ये भारताच्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे निधन झाले. हे व्यक्तिमत्व कोण होते ?

A. उमा शंकर वाजपेयी
B. ब्रिजेश मिश्र
C. पी.के.कौल
D. पी.एन.मेनन


B. ब्रिजेश मिश्र

प्र.३.} 'रिटर्न टू इंडीया' ह्या पुस्तकाचे लेखन कोणी केले आहे ?

A. सलमान खुर्शीद
B. शोभा डे
C. शोभा नारायण
D. सॅम पित्रोदा


C. शोभा नारायण

प्र.४.} भारतीय रेल्वेच्या सुरक्षेसंबंधीची उच्चस्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली गेली ?

A. अनिल काकोडकर
B. विजय केळकर
C. ई.श्रीधरन
D. केंद्रीय रेल्वे मंत्री


A. अनिल काकोडकर

प्र.५.} महाराष्ट्र शासनाकडून नियुक्त झालेली डॉ. वि. म. दांडेकर समिती कशाशी संबंधित होती ?

A. प्रादेशिक असमतोल
B. प्राथमिक शिक्षणाची स्थिती
C. जलसिंचन
D. बँकिंग-मायक्रो फायन्नास


A. प्रादेशिक असमतोल

प्र.६.} डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विंग्ज ऑफ फायर ह्या आत्मचरित्राचा उत्तरार्ध नुकताच प्रकाशित झाला. त्याचे शिर्षक काय आहे ?

A. टर्न अराउंड
B. पृथ्वी टू अग्नी-अ ट्रॅव्हल स्टोरी
C. टर्निंग व्युव्ह
D. टर्निंग पॉईंट


D. टर्निंग पॉईंट

प्र.७.} 26 फेब्रुवारी 2013 रोजी कॉंग्रेसच्या रेल्वेमंत्र्यांनी देशाचा रेल्वे अर्थसंकल्प संसदेत सादर केला. असे करणारे ते गेल्या 17 वर्षातील पहिलेच कॉंग्रेस मंत्री ठरले. हे मंत्री कोण ?

A. सी. पी. जोशी
B. मल्लिकार्जुन खर्ग
C. पवनकुमार बंसल
D. मनमोहनसिंग


C. पवनकुमार बंसल

प्र.८.} अमर प्रताप सिंह् यांची फेब्रुवारी 2013 मध्ये यूपीएससी (UPSC) च्या सदस्य पदी नेमणूक झाली. ते कोणत्या संघटनेचे संचालक होते ?

A. रॉ (RAW)
B. सी.आर.पी.एफ
C. सी.बी.आय
D. गेल


C. सी.बी.आय

प्र.९.} नियोजन आयोगाने 26 डिसेंबर 2012 रोजी जरी केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वात वेगाने प्रगती करणारे राज्य (2006 ते 2010) कोणते ठरले ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. बिहार
D. आंध्रप्रदेश


C. बिहार

प्र.१०.} 'भारतीय सायन्स कॉंग्रेसचे' 100 वे अधिवेशनाचे 3 जानेवारी 2013 रोजी कोणत्या शहरात उद्घाटन झाले ?

A. भुवनेश्वर
B. कोलकाता
C. कोची
D. मुंबई


B. कोलकाता

Saturday, February 22, 2014

प्रश्नसंच - ५३ [भूगोल]

प्र १.} पावसाळा व हिवाळा यांच्या दरम्यानचा कोणता महिना संक्रमणाचा महिना म्हणून ओळखला जातो ?

A. ऑक्टोबर
B. जुलै
C. सप्टेंबर
D. जून


A. ऑक्टोबर

प्र २.} हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. नाशिक
B. जळगाव
C. धुळे
D. बुलढाणा


C. धुळे

प्र ३.} कोणता जिल्हा महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्य वितरणाचे प्रतिनिधित्व करतो ?

A. सोलापूर
B. कोल्हापूर
C. नागपूर
D. सातारा


B. कोल्हापूर

प्र ४.} महाराष्ट्रात राखीव वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे ?

A. गडचिरोली
B. औरंगाबाद
C. अमरावती
D. चंद्रपूर


A. गडचिरोली

प्र ५.} महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर आतापर्यंत एकूण किती नवीन जिल्ह्यांची निर्मिती झाली आहे ?

A. ३५
B. ३३
C. ८
D. ९


D. ९

प्र ६.} महाराष्ट्रात रब्बी ज्वारीचे क्षेत्र कोठे आढळते ?

A. अवर्षण प्रदेश
B. जास्त पर्जन्याचा प्रदेश
C. पर्जन्यछायेचा प्रदेश
D. निश्चित पावसाचा प्रदेश


C. पर्जन्यछायेचा प्रदेश

प्र ७.} भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत ?

A. पंडित नेहरू
B. सलीम अली
C. जिम कोर्बेट
D. कैलास सांकला


D. कैलास सांकला

प्र ८.} महाराष्ट्रात खरीप हंगामात कोणत्या पिकाचे सर्वात जास्त क्षेत्र असते ?

A. कापूस
B. बाजरी
C. तांदूळ
D. खरीप ज्वारी


C. तांदूळ

प्र ९.} खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात अभयारण्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे ?

A. नाशिक
B. अमरावती
C. कोकण
D. नागपूर


B. अमरावती

प्र १०.} ब्रिटीशकालीन मुंबई इलाख्याच्या उत्तर प्रशासकीय विभागाचे मुख्यालय कोठे होते ?

A. अहमदाबाद
B. पालमपूर
C. बडोदा
D. भोपाळ


A. अहमदाबाद

Friday, February 21, 2014

प्रश्नसंच - ५२ [चालु घडामोडी]

प्र.१} २६ जानेवारी २०१४ रोजी किती व्यक्तींना पद्मविभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले ?

A. १
B. २
C. ४
D. ५


B. २

प्र.२} २६ जानेवारी २०१४ रोजी किती व्यक्तींना पद्मभुषण किताबाने सन्मानित करण्यात आले ?

A. २४
B. २७
C. २९
D. ३१


A. २४

प्र.३} २६ जानेवारी २०१४ रोजी किती व्यक्तींना पद्मश्री किताबाने सन्मानित करण्यात आले ?

A.१००
B. १०१
C. ११०
D. १२५


B. १०१

प्र.४} २६ जानेवारी २०१४च्या पद्मपुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये किती महिलांना समावेश होता ?

A. ३२
B. ४०
C. २७
D. ५५


C. २७

प्र.५} लोकांसाठी मोफत Wi-Fi spots उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले शहर कोणते ठरले ?

A. पुणे
B. मुंबई
C. बंगलोर
D. नवी दिल्ली


C. बंगलोर

प्र.६} भारतातील पहिला सिंथेटिक रबर प्लांट कोणत्या राज्यात सुरु करण्यात आला आहे ?

A. उत्तर प्रदेश
B. केरळ
C. आंध्रप्रदेश
D. हरियाणा


D. हरियाणा

प्र.७} २९ जानेवारी २०१४ला कोणत्या पुलाला १०० वर्षे पूर्ण झाली ?

A. हावडा ब्रिज
B. पांबन ब्रिज
C. महात्मा गांधी सेतू
D. जवाहर सेतू


B. पांबन ब्रिज

प्र.८} २८ जानेवारी २०१४ रोजी Mykola Azarov यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ?

A. युक्रेन
B. डेन्मार्क
C. अंगोला
D. बेल्जियम


A. युक्रेन

प्र.९} ५६व्या ग्रॅमी पुरस्कार २०१४ मध्ये 'अल्बम ऑफ दि यिअर पुरस्कार' कोणत्या अल्बमला मिळाला ?

A. रॉयल्स
B. गेट लकी
C. रॅंडम एक्सेस मेमरीज
D. वेस्टलाइफ़


C. रॅंडम एक्सेस मेमरीज

प्र.१०} रामानुज पुरस्कार-२०१४ आनंद कुमार यांना देण्यात आला ते कोणत्या राज्याचे आहेत ?

A. उत्तर प्रदेश
B. झारखंड
C. बिहार
D. छत्तिसगड


C. बिहार

Thursday, February 20, 2014

प्रश्नसंच - ५१ [चालू घडामोडी]

प्र १.} किती रुपयांच्या प्लास्टिकच्या चलनी नोटा RBI लवकरच व्यवहारात आणणार आहे ?

A. १० रु.
B. १०० रु
C. २० रु
D. ५० रु


A. १० रु.

प्र २.} नुकतीच कोणत्या क्रिकेटपटूने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक जलद ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला ?

A. महेला जयवर्धने
B. महेंद्रसिंग धोनी
C. विराट कोहली
D. कुमार संगाकारा


D. कुमार संगाकारा

प्र ३.} कोणत्या सोशल नेट्वर्किंग साईटला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली ?

A. ओर्कुट
B. फेसबुक
C. ट्विटर
D. फ्लिकर


B. फेसबुक

प्र ४.}डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनची स्थापना कधी झाली ?

A. १९५६
B. १९५७
C. १९५८
D. १९५९


C. १९५८

प्र ५.} सध्या जागृत असलेला तुंगराहुआ ज्वालामुखी कोणत्या देशात आहे ?

A. इक्वेडोर
B. इटली
C. जपान
D. लातीव्हीया


A. इक्वेडोर

प्र ६.} भारताने नुकताच कोणत्या देशाबरोबर ग्रीन एनर्जी कॉरीडॉरबाबतचा करार केला ?

A. अमेरिका
B. रशिया
C. जर्मनी
D. मलेशिया


C. जर्मनी

प्र ७.} नोव्हेंबर २०१३ मध्ये ब्युबॉनिक प्लेगच्या साथीमुळे ३२ लोकांचा मृत्यू कोणत्या देशात झाला ?

A. मादागास्कर
B. नायजेरिया
C. अल्जेरिया
D. सोमालिया


A. मादागास्कर

प्र ८.} महाराष्ट्रातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने नुकतीच 'इको सेन्सेटिव्ह झोन' म्हणून मंजुरी दिली ?

A. मेळघाट
B. ताडोबा
C. सह्याद्री
D. पेंच


B. ताडोबा
'इको सेन्सेटिव्ह झोन'चा दर्जा मिळविणारा ताडोबा हा राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे.आता या प्रकल्पाच्या १० किमी परिघातील वीज-खाण प्रकाल्पांसारख्या मानवी हस्तक्षेपांवर बंदी येणार आहे.

प्र ९.} ५ जानेवारी २०१४ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या 'जीसॅट-१४' उपग्रहाबाबत योग्य विधाने ओळखा.

अ]  या उपग्रहाचे प्रक्षेपण GSLV-D5 या प्रक्षेपकाद्वारे करण्यात आले.
ब]  यासाठी संपूर्ण देशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला होता.
क] 'जीसॅट-१४' हा उपग्रह 'जीसॅट-५' या उपग्रहाला पर्याय ठरणार असून त्याची जागा घेणार आहे.

पर्यायः-
A. अ आणि ब योग्य
B. ब आणि क योग्य
C. अ आणि क योग्य
D. वरील सर्व योग्य


A. अ आणि ब योग्य
'जीसॅट-१४' हा उपग्रह 'जीसॅट-३' या उपग्रहाला पर्याय ठरणार असून त्याची जागा घेणार आहे.

प्र १०.} २०१४ या वर्षात RBI १० रुपयांच्या प्लास्टिकच्या १ अब्ज नोटा पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर व्यवहारात आणणार आहे. खालीलपैकी कोणते शहर त्या पाच शहरांपैकी नाही ?

A. मुंबई
B. कोची
C. म्हैसूर
D. जयपूर


A. मुंबई
२०१४ या वर्षात RBI १० रुपयांच्या प्लास्टिकच्या १ अब्ज नोटा कोची, म्हैसूर, जयपूर, शिमला आणि भुवनेश्वर या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर व्यवहारात आणणार आहे. या नोटांचे सरासरी आयुर्मान ५ वर्षाचे असेल व या नोटांची नक्कल करणे कठीण असेल.

Wednesday, February 19, 2014

प्रश्नसंच - ५० [इतिहास]

प्र १.} चोल राजांच्या संदर्भात "राजांच्या मृत्युनंतर त्याच्या चितेवर त्याचे सर्व अंगरक्षक स्वतःला जाळून घेऊन प्राणार्पण करत असत" हे विधान कोणी केले ?

A. मार्को पोलो
B. इब्न बतुता
C. अल बरुनी
D. इत्सिंग


A. मार्को पोलो

प्र २.} खालीलपैकी कोणत्या राजांकडे सर्वोत्कृष्ट घोडदळ होते ?

A. राष्ट्रकुट
B. प्रतिहार
C. पाल
D. चालुक्य


B. प्रतिहार

प्र ३.} राष्ट्रकुटांच्या राज्यात प्रांताला काय म्हणत ?

A. मंडळ
B. विषय
C. राष्ट्र
D. यापैकी नाही


C. राष्ट्र

प्र ४.} खालीलपैकी कोणत्या राष्ट्रकुट राजाने जलसमाधी घेतली ?

A. कृष्ण दुसरा
B. इंद्र तिसरा
C. कृष्ण तिसरा
D. अमोघवर्ष


D. अमोघवर्ष

प्र ५.} नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन कोणी केले ?

A. भोज
B. धर्मपाल
C. देवपाल
D. नागभट्ट


B. धर्मपाल

प्र ६.} महंमद गझनीने सोमनाथवर स्वारी कधी केली ?

A. १०१५
B. १०१८
C. १०२०
D. १०२५


D. १०२५

प्र ७.} महंमद गझनीच्या दरबारी कवी कोण होता ?

A. अल बरुनी
B. फिरदौसी
C. अल मसुदी
D. सुलेमान


B. फिरदौसी

प्र ८.} चोल राजांच्या संदर्भात अयोग्य विधान ओळखा.

A. विजयालय याने चोल साम्राज्याची स्थापना केली.
B. राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली.
C. राजेंद्र पहिला याने श्रीविजय साम्राज्यावर स्वारी केली.
D. चोल राजांच्या काळात तंजावर येथे मंदिर बांधले गेले.


B. राजराजा याने कलिंगमार्गे बंगालवर स्वारी केली.

प्र ९.} खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.

अ] अलवार संत हे विष्णूचे भक्त होते.
ब] नयनार संत हे विष्णूचे भक्त होते.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


A. फक्त अ

प्र १०.} खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा.

अ] 'मान्यखेड' हि राष्ट्रकुट साम्राज्याची राजधानी होती.
ब] अमोघवर्षने मान्यखेड हि राजधानी वसवली.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


D. एकही नाही

Tuesday, February 18, 2014

प्रश्नसंच - ४९ [भूगोल]

प्र १.} भारतातील सर्वात उंच धरण कोणते ?

A. भाक्रा-नांगल
B. उजनी
C. हिराकूड
D. हरिके


A. भाक्रा-नांगल

प्र २.} खाली दिलेल्या वने आणि त्यात आढळणारे वृक्ष यांच्या जोड्यांपैकी चुकीची जोडी ओळखा.

A. सुचीपर्णी - देवधर
B. सदाहरित - महोगनी
C. पानझडी - साल
D. भूमध्यसागरीय वने – फर, पाईन


D. भूमध्यसागरीय वने – फर, पाईन

प्र ३.} कोणत्या खंडातून विषुववृत्त, मकरवृत्त आणि कर्कवृत्त हि तीनही अक्षवृत्ते जातात ?

A. दक्षिण अमेरिका
B. आफ्रिका
C. युरोप
D. आशिया


B. आफ्रिका

प्र ४.} 'अल निनो' या सागरी प्रवाहामध्ये होणा-या बदलांची स्थिती खालीलपैकी कोणत्या खंडाशी संबंधित आहे ?

A. आशिया
B. युरोप
C. अंटार्क्टिका
D. दक्षिण अमेरिका


D. दक्षिण अमेरिका

प्र ५.} उरली व मोपला या जमाती कोणत्या राज्यात आढळतात ?

A. तामिळनाडू
B. केरळ
C. कर्नाटक
D. हिमाचल प्रदेश


B. केरळ

प्र ६.} ' गोंडवाना कोळसा क्षेत्र ' खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते ?

A. कर्नाटक
B. उत्तरप्रदेश
C. गुजरात
D. मध्यप्रदेश


A. कर्नाटक

प्र ७.} नर्मदा प्रकल्पासंदर्भात योग्य विधाने ओळखा.

अ] या प्रकल्पाअंतर्गत मध्यप्रदेशात 'सरदार सरोवर' बांधण्यात आले आहे.
ब] या प्रकल्पाअंतर्गत गुजरातमध्ये 'इंदिरासागर धरण' बांधण्यात आले आहे.

पर्यायः-
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


D. दोन्ही अयोग्य
{'सरदार सरोवर' गुजरातमध्ये व 'इंदिरासागर धरण' मध्यप्रदेशात बांधण्यात आले आहे.}

प्र ८.} युरोपमध्ये अंतर्गत जलवाहतुकीसाठी कोणती नदी प्रसिद्ध आहे ?

A. र्‍हाईन
B. मिसिसीपी
C. हडसन
D. टिबर


A. र्‍हाईन

प्र ९.} श्रीशैलमजवळील घळई कोणत्या नदीने तयार केली आहे ?

A. पेरियार
B. पेन्नार
C. कृष्णा
D. कावेरी


C. कृष्णा

प्र १०.} हिंदाल्को हि अल्युमिनिअम उत्पादन करणारी कंपनी कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

A. महाराष्ट्र
B. उत्तर प्रदेश
C. गुजरात
D. पश्चिम बंगाल


B. उत्तर प्रदेश

Monday, February 17, 2014

प्रश्नसंच - ४८ [मराठी व्याकरण]

प्र १.} ' राजा ' या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.

A. भूपती
B. भूर्ज
C. भूपाळ
D. भूप


B. भूर्ज

प्र २.} ' थंड फराळ करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

A. थंड अन्न खाणे
B. भरपूर जेवणे
C. उपाशी रहाणे
D. सावकाश जेवणे


C. उपाशी रहाणे

प्र ३.} ' मनस्ताप ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

A. पूर्वरूप संधी
B. पररूप संधी
C. व्यंजन संधी
D. विसर्ग संधी


D. विसर्ग संधी
{मनः + ताप = मनस्ताप}

प्र ४.} ' वहाने सावकाश चालवा.' - या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा.

A. क्रियाविशेषण
B. विशेषण
C. उभयान्वयी अव्यय
D. क्रियापद


A. क्रियाविशेषण

प्र ५.} ' मधु पुस्तक वाचतो.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

A. कर्तरी प्रयोग
B. कर्मणी प्रयोग
C. नवीन कर्तरी प्रयोग
D. भावे प्रयोग


A. कर्तरी प्रयोग

प्र ६.} सर्व समाजात समता असावी असे म्हणणा-या व्यक्तीला _ _ _ _ _ _ _ म्हणतात.

A. सर्वजनवादी व्यक्ती
B. सौम्यवादी व्यक्ती
C. साम्यवादी व्यक्ती
D. समतोलवादी व्यक्ती


C. साम्यवादी व्यक्ती

प्र ७.} ' चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.' - या वाक्याचा प्रकार ओळखा.

A. केवळ वाक्य
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. विधानार्थी वाक्य


C. संयुक्त वाक्य

प्र ८.} ' शार्दुल ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

A. सिंह
B. हरीण
C. शहामृग
D. हत्ती


A. सिंह

प्र ९.} ' साहस हे जीवनामध्ये मिठासारखे आहे.' या वाक्यातील साहस हे _ _ _ _ _ _ _ आहे.

A. सामान्यनाम
B. विशेषनाम
C. भाववाचक नाम
D. सर्वनाम


C. भाववाचक नाम

प्र १०.} जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.....

A. निरक्षर
B. अशिक्षित
C. सनातनी
D. अंधश्रद्धाळू


C. सनातनी

Sunday, February 16, 2014

प्रश्नसंच - ४७ [राज्यघटना]

प्र १.} खालीलपैकी कोणता मुलभूत हक्क नाही ?

A. समतेचा हक्क
B. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क
C. शोषणाविरुद्धचा हक्क
D. रोजगाराचा हक्क


D. रोजगाराचा हक्क

प्र २.} खालीलपैकी कोणती भाषा घटनेच्या ८व्या परिशिष्टात समाविष्ट नाही ?

A. उर्दू
B. गुरुमुखी
C. सिंधी
D. नेपाळी


B. गुरुमुखी

प्र ३.} भारतात कोणत्या प्रकारची शासनव्यवस्था आहे ?

A. निरंकुश राजेशाही
B. अध्यक्षीय लोकशाही
C. संसदीय शासनव्यवस्था
D. संघराज्यात्मक शासनव्यवस्था


C. संसदीय शासनव्यवस्था

प्र ४.} कायदेविषयक अधिकार कोणाच्या हाती असतात ?

A. राष्ट्रपती
B. संसद
C. पंतप्रधान
D. राज्यपाल


B. संसद

प्र ५.} विधानपरिषदेतील सदस्यसंख्या कमीत कमी किती असावी लागते ?

A. ५०
B. ४०
C. ६०
D. ७०


B. ४०

प्र ६.} ४२वी घटनादुरुस्ती किती साली संमत करण्यात आली ?

A. १९७४
B. १९७५
C. १९७६
D. १९७७


C. १९७६

प्र ७.} खालीलपैकी कोणता अधिकार भारताचा नागरिक नसलेल्या लोकांनादेखील मिळतो ?

A. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार
B. संचार स्वातंत्र्याचा अधिकार
C. संपत्तीचा अधिकार
D. जीविताचा अधिकार


D. जीविताचा अधिकार

प्र ८.} खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा.

अ] गरजेनुसार विविध खात्यांची निर्मिती पंतप्रधान करतो.
ब] कॅबिनेट सचिव हा युपीएससीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

पर्याय:-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. दोन्ही चूक
D. एकही नाही


B. अ-क-ब-ड

प्र ९.} राष्ट्रपतीला महाभियोगाद्वारे पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. सर्वोच्च न्यायालय
B. मंत्रीमंडळ
C. संसद
D. लोकसभा


C. संसद

प्र १०.} मंत्रीपरिषदेविरुद्धचा अविश्वासाचा ठराव कोठे मांडला जातो ?

A. लोकसभेत
B. राज्यसभेत
C. दोन्ही सभागृहात
D. संयुक्त अधिवेशनात


A. लोकसभेत