चालू घडामोडी - १२ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 12, 2015]

लिअँडर पेस, मार्टिना हिंगीसला मिश्र दुहेरीचे विजेतेपद :

  • अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या लिअँडर पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.
  • पेस-हिंगीस जोडीने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सॅंड्‌स आणि सॅम क्‍यूरी या जोडीचे आव्हान 6-4, 3-6, 10-7 असे मोडीत काढत विजय मिळविला.
  • चौथे मानांकन असलेल्या या जोडीची बेथानी मॅटेक आणि सॅम क्यूरी यांच्याबरोबरील लढत तीन सेटपर्यंत चालली.
  • अखेर पेस-मार्टिनाने अनुभवाच्या जोरावर तिसरा सेट 10-7 असा जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
  • पेस-मार्टिना या जोडीने या वर्षभरातील ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये मिळविलेले हे तिसरे विजेतेपद आहे.
  • यापूर्वी टेनिसच्या इतिहासात 1969 मध्ये मार्टी रिसेन आणि मार्गारेट कोर्ट यांनी तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविली होती.
  • त्यानंतर प्रथमच एखाद्या जोडीने वर्षात तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविली आहेत.
  • पेसने भारताच्याच महेश भूपतीच्या साथीने कारकिर्दीत सर्वाधिक 9 ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविलेली आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस संबंधित कागदपत्रे उघड करण्याची घोषणा :

  • थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित असणाऱ्या 64 फायलींमधील कागदपत्रे उघड करण्याची घोषणा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
  • राज्याच्या गृहविभागाकडून ही कागदपत्रे उघड केली जाणार असून, पुढील शुक्रवारपासून ती सामान्य नागरिकांना पाहता येतील.
  • तसेच 64 पेक्षाही अधिक फायली सापडल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

माता अमृतानंदमयीनी केला धनादेश जेटली यांच्याकडे सुपुर्द :

  • अम्मा नावाने परिचित असलेल्या माता अमृतानंदमयी यांच्या मठाने स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शौचालये उभारण्यासाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा धनादेश शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सुपुर्द केला.
  • महिनाभरानंतर मठाकडून आणखी 100 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
  • देशाची संस्कृती आणि वारशाचे प्रतीक असलेल्या गंगा नदीचे संवर्धन करण्यासाठी नमामी गंगे आणि स्वच्छ भारत मोहिमेत जगभरातील भारतीयांनी योगदान द्यावे, असे आवाहन जेटली यांनी अम्मांच्या मठाने दिलेला धनादेश स्वीकारल्यानंतर केले.

जया बच्चन, विजय दर्डा आणि सचिन तेंडुलकर नामनियुक्त :

  • प्रख्यात अभिनेत्री जया बच्चन, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य 28 खासदारांना 2015-16 या वर्षासाठी माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीवर नामनियुक्त करण्यात आले आहे.
  • ही समिती सूचना व प्रसारण मंत्रालय, दूरसंचार मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कामगिरीची समीक्षा करेल आणि धोरणात्मक बदल सुचवेल.
  • या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'हाईक' मेसेंजरची एक मोफत 'समूह संपर्क' सुविधा उपलब्ध :

  • दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख हस्ती सुनील मित्तल यांचे पुत्र केविन मित्तल यांच्या नेतृत्वाखालील 'हाईक' मेसेंजरने शुक्रवारी एक मोफत 'समूह संपर्क' सुविधा उपलब्ध करून दिली.
  • या सेवेनुसार 100 लोकांशी मोफत संपर्क होऊ शकेल.
  • ही सुविधा अँड्रॉईडवर 4-जी आणि वायफायवर कार्यान्वित असेल.
  • वर्ष अखेरीस ही सुविधा आयओएस आणि विंडोज यांच्या कक्षेत आणली जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
  • तसेच दूरसंचार विभागाने (डीओटी) नेट तटस्थतेवरील आपल्या अहवालात ओटीटी शाखांद्वारे पेश केल्या जाणाऱ्या 'व्हाईस कॉलिंग' सुविधेला या नियमातहत आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या नवीन सुविधेमुळे एक बटन दाबताच 100 लोकांशी आपण संपर्क साधू शकता.
  • त्यासाठी कोणतीही पिन, क्रमांक डायल करण्याची गरज नाही.

मानवाच्या नव्या प्रजातीचा शोध :

  • मानवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावल्याचा दावा येथील काही संशोधकांनी केला आहे.
  • दक्षिण आफ्रिकेमधील एका दुर्गम भागातील अंधाऱ्या गुहेत सापडलेल्या हाडांच्या सांगाड्याच्या अभ्यासावरून त्यांनी हा दावा केला आहे.
  • संशोधकांनी या प्रजातीचे नाव "होमो नालेदी" असे ठेवले आहे.
  • "होमो नालेदी"मध्ये विकसित होत असलेला मानव आणि प्राथमिक पातळीवरील मानवाची वैशिष्ट्ये आढळून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
  • जोहान्सबर्गपासून जवळ असलेल्या गुहेत दोन वर्षांपूर्वी संशोधकांना हाडांचे सुमारे 1,550 नमुने सापडले.
  • ही एकूण 15 व्यक्तींची हाडे असण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.
  • संशोधकांच्या म्हणण्यानुसार, "होमो नालेदी" हा दोन्ही पायांवर ताठ उभा राहून चालत होता. त्याच्या हात आणि पायाच्या हाडांची रचना "होमो" या विकसित होत असलेल्या मानवाशी मिळतीजुळती असून, खांदे आणि कवटीची रचना मात्र आदिमानवाप्रमाणे आहे.
  • त्याचा मेंदू लहान होता. "होमो नालेदी"चे मूळ "होमो"कुळातच असून, सापडलेली हाडे 25 ते 28 लाख वर्षांपूर्वीची आहेत, असे संशोधकांच्या गटाचे प्रमुख ली बर्जर यांनी सांगितले.
 दिनविशेष : 
  • केप व्हर्दे राष्ट्रीय दिन
  • इथियोपिया राष्ट्रीय क्रांती दिन
  • 1890 : सॅलिसबरी, र्‍होडेशिया शहराची स्थापना.
  • 1980 : तुर्कस्तानमध्ये लश्करी उठाव.
  • 2002 : 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
  • 2005 : डिझनीलँड हाँगकाँग खुले.
Previous Post Next Post