चालू घडामोडी - ०७,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 07, 2015]

15 नोव्हेंबरपासून अर्धा टक्का उपकर लागू होणार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी आता अर्धा टक्का स्वच्छता उपकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
  • त्यामुळे विमान प्रवास, दूरध्वनीवरील संभाषण, हॉटेलांतील जेवण आणि बँकिंग सेवा आदी महाग होणार आहे.
  • या निर्णयामुळे केंद्राच्या तिजोरीत चार हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे.
  • अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आवश्यकता भासल्यास सर्वच किंवा विशिष्ट सेवांवर दोन टक्के स्वच्छ भारत उपकर लागू करण्याचे संकेत दिले होते.
  • तसेच या उपकराच्या माध्यमातून जमा झालेला निधी स्वच्छ भारत अभियानासाठीच वापरला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधन

  • तंबाखूवर्गातील प्राचीन वनस्पतीमध्ये असलेले असे जनुक शोधले आहे की, त्याचा वापर करून मंगळासारख्या दूरच्या ग्रहावरही प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणारी पिके व इतर वनस्पती आंतरजनुकीय तंत्राने तयार करणे शक्य होणार आहे.
  • क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठातील वनस्पती जनुकशास्त्राज्ञ प्रा. पीटर वॉटरहाऊस यांनी सांगितले की, मूळ आदिवासी जमातींमध्ये प्रचलित असलेल्या तंबाखूच्या एका देशी रोपात म्हणजे निकोटियाना बेनथामियाना या पिटज्युरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीत हे जनुक सापडले आहे.
  • पिटज्युरी ही तंबाखू वनस्पती आहे, तिचा इतिहास शोधताना हे जनुक सापडले आहे.
  • या वनस्पतीचा उपयोग जनुकशास्त्रज्ञ विषाणू व लशीची चाचणी घेण्यासाठी प्रारूप म्हणून करीत असतात.
  • वनस्पतींमधील पांढरा उंदीर म्हणजे ज्याच्यावर प्रयोग केले जातात असा जैविक घटक असे या वनस्पतीला म्हणावे लागेल.
  • या वनस्पतीत अनेक आश्चर्यकारक गुण असल्याचे दिसून आले आहे. या वनस्पतीचा जनुकीय आराखडा तयार केला आहे.
  • ही वनस्पती पश्चिम ऑस्ट्रेलिया व उत्तर सीमेकडील असल्याचे सांगण्यात येते.
  • रेणवीय घड्याळाच्या व जीवाश्म नोंदीच्या आधारे वैज्ञानिकांनी या वनस्पतीचे आताचे रूप शोधून काढले आहे.
  • साडेसात लाख वर्षांपूर्वीची ही वनस्पती असून ती जंगली स्वरूपातील होती.
  • वनस्पती जैवतंत्रज्ञानावर मोठा परिणाम करणारे हे संशोधन असल्याचे संशोधक श्रीमती ज्युलिया बॅली यांनी सांगितले.
  • या वनस्पतीने प्रतिकारशक्ती गमावली असली तरी ती पटकन वाढते, फुलोरा लगेच येतो व कमी पावसातही उगवते.
  • दुष्काळातही ही वनस्पती तग धरते, त्यामुळेच इतकी वष्रे ती टिकून राहिली आहे. अवकाशात रोगमुक्त वनस्पतींच्या निर्मितीसाठी या वनस्पतीचा अभ्यास उपयुक्त आहे.

तामिळनाडूतील संस्था नोंदणी कार्यालयाची नोंदणी रद्द केल्याचा दावा

  • तामिळनाडूतील संस्था नोंदणी कार्यालयाने स्वयंसेवी संस्था म्हणून असलेली आपली नोंदणी रद्द केल्याचा दावा ग्रीनपीस इंडिया सोसायटीने केला.

अ‍ॅपलने स्मार्ट घडय़ाळांची विक्री भारतात केली सुरू

  • अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या अ‍ॅपलने स्मार्ट घडय़ाळांची विक्री भारतात सुरू केली असून, त्यातील सर्वात चांगले मॉडेल १४ लाख रुपयांना आहे.
  • या घडय़ाळाच्या किमती ३०,९९० ते १४ लाख दरम्यान आहे.
  • देशातील १०० अ‍ॅपल प्रीमियम स्टोअर्समधून ही घडय़ाळे विक्रीस आहेत. वेगवेगळय़ा डिस्प्ले आकारात म्हणजे ३८ मि.मी. व ४२ मि.मी.मध्ये ती उपलब्ध आहेत.
  • अ‍ॅपल घडय़ाळे १८ कॅरट रोज गोल्ड, व्हाइट स्पोर्ट्स बँड,४२ मि.मी. डिस्प्ले या स्वरूपात उपलब्ध आहेत.
  • त्यांची किंमत ९.९लाख रुपये आहे. ४२ मि.मी. डिस्प्लेचे दोन प्रकार अ‍ॅल्युमिनियम केस व स्पोर्ट्स बँड असे असून त्यांच्या किमती ३४९०० रुपये आहेत.
  • अ‍ॅपल घडय़ाळाचे उपयोग : कॉल घेणे,  छायाचित्रे काढणे,  संगीत श्रवण, इन्स्टाग्राम छायाचित्रांचे व्यवस्थापन, शरीराच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवणे,

दिवाळीपूर्वी वन रँक वन पेन्शंन योजना लागू होणार :

  • दिवाळीपूर्वी वन रँक वन पेन्शंन अर्थात OROP योजना लागू होणार असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
  • OROP संर्दभातील सर्व मागण्या मान्य होत नाहीत त्यामुळे सरकारच्या विरोधात आज सर्व माजी सैनिकांनी मेडल वापसी करणार असल्याचे जाहीर केले होते.
  • जर वन रँक वन पेन्शंन योजना सरकारने लागू नाही केली तर दिवाळी साजरी करणार नाही असेही माजी सैनिकांने सांगीतले होते.
  • निवृत्त सैनिकांसाठी असलेली निवृत्तीवेतन योजना (OROP)  १ जुलै २०१४ पासून लागू केली होती पण सरकार आणि अंदोलनकर्ते (माजी सैनिक) यांच्यातील तिढा कायम होता.

भारताकडून अफगाणिस्तानला चार लढाऊ हेलिकॉप्टर देण्याचा करार

  • भारताकडून अफगाणिस्तानला चार लढाऊ हेलिकॉप्टर देण्याचा करार लवकरच अंतिम होण्याची शक्‍यता असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
  • अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हानिफ अत्मर भारत दौऱ्यावर येत असून, त्याचवेळी करारावर स्वाक्षरी होण्याची शक्‍यता आहे.
  • भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानला फक्त पायाभूत सुविधांसंदर्भात मदत करण्यापर्यंत स्वतःला मर्यादित ठेवले होते.
  • मात्र, दहशतवादाशी झुंजत असल्याने लष्करी मदतही पुरवण्याची अफगाणिस्तानकडून सातत्याने मागणी होत होती.
  • हे चार हेलिकॉप्टर पुरविण्यामुळे त्यांची ही मागणी पूर्ण होण्यास सुरवात झाली असल्याचे मानले जाते.
  • लढाऊ हेलिकॉप्टर्सबरोबरच साध्या हेलिकॉप्टर्सची मागणीही अफगाणिस्तानने केली आहे.
  • डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना
  •  नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण
Previous Post Next Post