लेटेस्ट चालू घडामोडी

Tuesday, September 15, 2015

चालू घडामोडी - १४ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 14, 2015]

सर्बियाचा नोव्हाक जोकोविचला टेनिस स्पर्धेतील विजेतेपद :

 • सर्बियाचा नोव्हाक जोकोविचने कट्टर प्रतिस्पर्धी स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर याच्यावर पुन्हा एकदा मात करत अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकाविले.
 • जोकोविचच्या टेनिस कारकिर्दीतील हे १० वे आणि या वर्षातील तिसरे ग्रँडस्लॅम विजतेपद आहे.
 • अग्रमानांकन असलेल्या जोकोविचने फेडररचा ६-४, ५-७, ६-४, ६-४ असा पराभव केला.
 • जोकोविचने यंदा ऑस्ट्रेलियन आणि विंबल्डन स्पर्धांचे विजेतेपद पटकावले आहे.
 • त्यानंतर त्याचे या वर्षातील हे तिसरे विजेतेपद आहे.
 • नोव्हाक जोकोविचची कारकीर्त :
 • काउंटडाऊन - फेडरर वि. जोकोविच
 • फेडडर आणि जोकोविच यांच्यात आतापर्यंत ४२ सामने. जोकोविच २२, तर फेडरर २० वेळा विजयी
 • ग्रॅंड स्लॅम स्पर्धेतील यापूर्वीच्या सामन्यात जोकोविच विजयी. विंबल्डनच्या अंतिम सामन्यात जोकोविचची सरशी
 • जोकोविचचे कारकिर्दीतील १० वे ग्रँडस्लॅम विजेतेपद
 • टूरवरील यापूर्वीच्या सामन्यात फेडररची सरशी. ऑगस्टमध्ये सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फेडररचा विजय
 • फेडररची पुरुष एकेरीत सर्वाधिक १७ विक्रमी विजेतीपदे
 • फेडररचे यापूर्वीचे ग्रॅंड स्लॅम विजेतेपद २०१२ मध्ये. तेव्हा तो विंबल्डनमध्ये विजेता
 • फेडरर अमेरिकन स्पर्धेत सलग पाच वेळा विजेता. २००४ ते २००८ मध्ये ही कामगिरी. २००९ मध्ये फेडररला उपविजेतेपद

मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा १३० फूट जाडीचा थर सापडला :

 • मंगळाच्या पृष्ठभागाखाली बर्फाचा १३० फूट जाडीचा थर सापडला असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
 • हा थराचा तुकडा कॅलिफोर्निया व टेक्सास यांच्या एकत्रित क्षेत्रफळाएवढा आहे.
 • लाखो वर्षांपूर्वी मंगळावर बर्फवृष्टी झाली होती त्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात आले. नासाच्या मार्स रेकनसान्स ऑर्बिटर म्हणजेच एमआरओ या अवकाशयानावरील दोन उपकरणांनी हे संशोधन केले आहे.
 • मंगळावर एक विवर भांडय़ासारखे गोलाकार नाही बाकीची सगळी विवरे भांडय़ासारखी खोलगट व गोलाकार आहेत.
 • मंगळावरील अर्काडिया प्लॅनशिया भागात अशी विवरे आहेत, ती वेगवेगळ्या काळात तयार झालेली असून तेथे कशाचा तरी वर्षांव झाल्याच्या खुणा आहेत.
 • एमआरओच्या जास्त विवर्तन असलेल्या प्रतिमा विज्ञान प्रयोगात (हायराइज) संशोधकांनी या विवराचे त्रिमिती प्रारूप तयार केले त्यामुळे त्यांना त्यांची खोली समजू शकली.

जर्मनीच्या महापौरपदी अशोक श्रीधरन यांची नियुक्ती :

 • जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविणारे भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांना बॉनच्या महापौरपदासाठी निवडणूकपूर्व मतदानोत्तर चाचणीमध्ये सर्वाधिक पसंती असल्याचे समोर येत आहे.
 • मात्र अद्याप या तिघांपैकी कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे याबद्दलचा निर्णय जवळपास २६ टक्के म्हणजेच २.४५ लाख मतदारांनी घेतला नसल्याने खरा निकाल यानंतर लागणार आहे.

पत्रकारांसाठी फेसबुकचे मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध :

 • पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध करून दिले
 • अ‍ॅप व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांची माहिती दिली आहे.
 • पत्रकारांसाठी एक खुशखबर आता फेसबुकने खास त्यांच्या व्यक्तिगत वापरासाठी मेन्शन्स अ‍ॅप उपलब्ध करून दिले असून त्याच्या माध्यमातून पत्रकारांना त्यांच्या अनुसारकांशी संवाद साधता येईल.
 • शिवाय त्यांचे लेखनही पोहोचवता येईल.
 • पत्रकार या माध्यमातून जास्त माहिती वाचक व अनुसारकांपर्यंत पोहोचवू शकतील.
 • या अ‍ॅपचे उत्पादन व्यवस्थापक वादिम लाव्रुसिक यांनी सांगितले की, पत्रकारच नव्हे तर इतरांनाही ही सुविधा उपलब्ध राहील.
 • फेसबुकने जुलै २०१४ मध्ये मेन्शन्स अ‍ॅप सुरू केले होते पण ते वलयांकित म्हणजे सेलिब्रिटी व्यक्तींसाठी होते.
 • जर फेसबुक वापरकर्त्यांने द रॉक असे स्टेटस अपडेट केले तर तो वापरकर्ता त्याची नवीन माहिती मेन्शन्स अ‍ॅपमध्ये टाकू शकेल व त्यावर प्रतिसादही मिळू शकेल.
 • मेन्शन्स अ‍ॅप :
 • तुमचे फेसबुक खाते असेल तर एक ऑनलाईन फॉर्म भरून हे अ‍ॅप डाऊनलोड करता येईल
 • त्यासाठी तुमचे फेसबुक खाते खरे असले पाहिजे
 • लाइव्ह माहिती, छायाचित्रे, प्रश्नोत्तरे या सुविधा
 • पत्रकारांसाठी माहिती देवाणघेवाणीचे एक साधन
 • अर्थात यात कुणीही खोटी माहिती देणे दिशाभूल करणारे ठरू शकते.
 • वृत्तपत्र व पत्रकाराला समाजाचा प्रतिसाद समजेल

टी-२० क्रिकेट विश्वचषक रवी शास्त्री यांना संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय :

 • पुढील वर्षी भारताच्या यजमानपदाखाली होणाऱ्या टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) रवी शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • रविवारी याबाबतीत अधिकृतरीत्या जाहीर करताना बीसीसीआयने शास्त्री यांना संघाच्या संचालकपदी कायम ठेवताना संजय बांगर, भरत अरुण आणि श्रीधर या सहाय्यक प्रशिक्षकांच्या कार्यकाळामध्येही टी-२० विश्वचषकपर्यंत वाढ केली आहे.
 • सचिन तेंडुलकर, सौरभ गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण, बीसीसीआय अध्यक्ष जगमोहन दालमिया आणि सचिव अनुराग ठाकूर यांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीच्या वतीने हा निर्णय घण्यात आला.

दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय :

 • फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतील दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे.
 • उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन १३ देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
 • त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या 'इन्फोसिस'च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे.
 • आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिक दानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
 • नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला ५२ लाख डॉलरची मदत केली आहे.
 • त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.
 • त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.

जे. मंजुळा यांची डीआरडीओच्या महासंचालकपदी नियुक्ती

 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी 'इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर' या विभागाची सूत्रे स्वीकारली.
 • मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
 • या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंजुळा यांनी बंगळूरमधील 'डिफेन्स ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर'मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे.
 • मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
 • हैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात २६ वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे.
 • यात त्यांनी सेना, वायु सेना, नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत.
 • मंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व २०१२ मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला आहे.
 दिनविशेष : 
 • हिंदी दिवस
 • 1917 : रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
 • 1960 : ओपेकची स्थापना.
 • 1999 : किरिबाटी, नौरू व टोंगाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

Sunday, September 13, 2015

चालू घडामोडी - १२ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 12, 2015]

लिअँडर पेस, मार्टिना हिंगीसला मिश्र दुहेरीचे विजेतेपद :

 • अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या लिअँडर पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविले.
 • पेस-हिंगीस जोडीने अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सॅंड्‌स आणि सॅम क्‍यूरी या जोडीचे आव्हान 6-4, 3-6, 10-7 असे मोडीत काढत विजय मिळविला.
 • चौथे मानांकन असलेल्या या जोडीची बेथानी मॅटेक आणि सॅम क्यूरी यांच्याबरोबरील लढत तीन सेटपर्यंत चालली.
 • अखेर पेस-मार्टिनाने अनुभवाच्या जोरावर तिसरा सेट 10-7 असा जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
 • पेस-मार्टिना या जोडीने या वर्षभरातील ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये मिळविलेले हे तिसरे विजेतेपद आहे.
 • यापूर्वी टेनिसच्या इतिहासात 1969 मध्ये मार्टी रिसेन आणि मार्गारेट कोर्ट यांनी तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविली होती.
 • त्यानंतर प्रथमच एखाद्या जोडीने वर्षात तीन ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळविली आहेत.
 • पेसने भारताच्याच महेश भूपतीच्या साथीने कारकिर्दीत सर्वाधिक 9 ग्रँडस्लॅम विजेतेपदे मिळविलेली आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस संबंधित कागदपत्रे उघड करण्याची घोषणा :

 • थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित असणाऱ्या 64 फायलींमधील कागदपत्रे उघड करण्याची घोषणा पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
 • राज्याच्या गृहविभागाकडून ही कागदपत्रे उघड केली जाणार असून, पुढील शुक्रवारपासून ती सामान्य नागरिकांना पाहता येतील.
 • तसेच 64 पेक्षाही अधिक फायली सापडल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

माता अमृतानंदमयीनी केला धनादेश जेटली यांच्याकडे सुपुर्द :

 • अम्मा नावाने परिचित असलेल्या माता अमृतानंदमयी यांच्या मठाने स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शौचालये उभारण्यासाठी तब्बल 100 कोटी रुपयांचा धनादेश शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे सुपुर्द केला.
 • महिनाभरानंतर मठाकडून आणखी 100 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे.
 • देशाची संस्कृती आणि वारशाचे प्रतीक असलेल्या गंगा नदीचे संवर्धन करण्यासाठी नमामी गंगे आणि स्वच्छ भारत मोहिमेत जगभरातील भारतीयांनी योगदान द्यावे, असे आवाहन जेटली यांनी अम्मांच्या मठाने दिलेला धनादेश स्वीकारल्यानंतर केले.

जया बच्चन, विजय दर्डा आणि सचिन तेंडुलकर नामनियुक्त :

 • प्रख्यात अभिनेत्री जया बच्चन, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्यासह अन्य 28 खासदारांना 2015-16 या वर्षासाठी माहिती तंत्रज्ञानावरील संसदीय स्थायी समितीवर नामनियुक्त करण्यात आले आहे.
 • ही समिती सूचना व प्रसारण मंत्रालय, दूरसंचार मंत्रालय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या कामगिरीची समीक्षा करेल आणि धोरणात्मक बदल सुचवेल.
 • या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अनुराग ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

'हाईक' मेसेंजरची एक मोफत 'समूह संपर्क' सुविधा उपलब्ध :

 • दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख हस्ती सुनील मित्तल यांचे पुत्र केविन मित्तल यांच्या नेतृत्वाखालील 'हाईक' मेसेंजरने शुक्रवारी एक मोफत 'समूह संपर्क' सुविधा उपलब्ध करून दिली.
 • या सेवेनुसार 100 लोकांशी मोफत संपर्क होऊ शकेल.
 • ही सुविधा अँड्रॉईडवर 4-जी आणि वायफायवर कार्यान्वित असेल.
 • वर्ष अखेरीस ही सुविधा आयओएस आणि विंडोज यांच्या कक्षेत आणली जाईल, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
 • तसेच दूरसंचार विभागाने (डीओटी) नेट तटस्थतेवरील आपल्या अहवालात ओटीटी शाखांद्वारे पेश केल्या जाणाऱ्या 'व्हाईस कॉलिंग' सुविधेला या नियमातहत आणण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या नवीन सुविधेमुळे एक बटन दाबताच 100 लोकांशी आपण संपर्क साधू शकता.
 • त्यासाठी कोणतीही पिन, क्रमांक डायल करण्याची गरज नाही.

मानवाच्या नव्या प्रजातीचा शोध :

 • मानवाच्या नव्या प्रजातीचा शोध लावल्याचा दावा येथील काही संशोधकांनी केला आहे.
 • दक्षिण आफ्रिकेमधील एका दुर्गम भागातील अंधाऱ्या गुहेत सापडलेल्या हाडांच्या सांगाड्याच्या अभ्यासावरून त्यांनी हा दावा केला आहे.
 • संशोधकांनी या प्रजातीचे नाव "होमो नालेदी" असे ठेवले आहे.
 • "होमो नालेदी"मध्ये विकसित होत असलेला मानव आणि प्राथमिक पातळीवरील मानवाची वैशिष्ट्ये आढळून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
 • जोहान्सबर्गपासून जवळ असलेल्या गुहेत दोन वर्षांपूर्वी संशोधकांना हाडांचे सुमारे 1,550 नमुने सापडले.
 • ही एकूण 15 व्यक्तींची हाडे असण्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे.
 • संशोधकांच्या म्हणण्यानुसार, "होमो नालेदी" हा दोन्ही पायांवर ताठ उभा राहून चालत होता. त्याच्या हात आणि पायाच्या हाडांची रचना "होमो" या विकसित होत असलेल्या मानवाशी मिळतीजुळती असून, खांदे आणि कवटीची रचना मात्र आदिमानवाप्रमाणे आहे.
 • त्याचा मेंदू लहान होता. "होमो नालेदी"चे मूळ "होमो"कुळातच असून, सापडलेली हाडे 25 ते 28 लाख वर्षांपूर्वीची आहेत, असे संशोधकांच्या गटाचे प्रमुख ली बर्जर यांनी सांगितले.
 दिनविशेष : 
 • केप व्हर्दे राष्ट्रीय दिन
 • इथियोपिया राष्ट्रीय क्रांती दिन
 • 1890 : सॅलिसबरी, र्‍होडेशिया शहराची स्थापना.
 • 1980 : तुर्कस्तानमध्ये लश्करी उठाव.
 • 2002 : 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
 • 2005 : डिझनीलँड हाँगकाँग खुले.

Saturday, September 12, 2015

चालू घडामोडी - ११ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 11, 2015]

मोदी, ओबामा आणि बिडेन यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्‍यता

 • महिनाअखेरीस नियोजित असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि उपाध्यक्ष ज्यो बिडेन यांच्यामध्ये चर्चा होण्याची दाट शक्‍यता आहे.
 • पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामध्ये भारतीय नेतृत्वाशी उच्चस्तरीय चर्चा करण्याची तयारी सुरू आहे.
 • यामध्ये थेट मोदी-ओबामा यांच्यातही चर्चा होऊ शकेल, असे सांगितले जाते.
 • यापूर्वी प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी बराक ओबामा यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते.
 • त्यानंतरची ही दोन्ही नेत्यांमधील पहिली भेट असेल.
 • मोदी आणि ओबामा यांच्यात 28 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये चर्चा होऊ शकते.
 • या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
 • या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी उपाध्यक्ष ज्यो बिडेन स्वत:हून उत्सुक असून दोन्ही देशांमधील व्यापार 500 अब्ज डॉलरपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न केले जातील असे बिडेन यांनी काही वर्षांपूर्वी केलेल्या भारत दौऱ्यामध्ये सांगितले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण :

 • जपानमधील कोयासन विद्यापीठात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
 • जपानच्या नागरिकांना महाराष्ट्राने दिलेली ही अमूल्य भेट आहे, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केली.
 • मुख्यमंत्री फडणवीस आणि वाकायामाचे गव्हर्नर योशिनोबू निसाका यांच्या उपस्थितीत औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि कोसायन विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

सानिया मिर्झा, लिएंडर पेस मिश्र दुहेरीत अंतिम फेरीत :

 • स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस हिच्यासोबत अव्वल मानांकित सानिया मिर्झा हिने महिला दुहेरीत तसेच अनुभवी लिएंडर पेसने मिश्र दुहेरीत अमेरिकन ओपन टेनिसची गुरुवारी अंतिम फेरी गाठली.
 • सानिया-हिंगीस या अव्वल जोडीने उपांत्य फेरीत इटलीची सारा इराणी-फ्लाव्हिया पेनेटा या 11व्या मानांकित जोडीचा सलग सेटमध्ये 6-4, 6-1 असा 77 मिनिटांत पराभव केला.
 • मिश्र दुहेरीच्या उपांत्य सामन्यात पेस-मार्टिनाने भारतीय खेळाडू रोहण बोपन्ना तसेच चायनिज-तैपेईची यंग जान चान यांच्यावर सलग सेटमध्ये 6-2, 7-5 ने 61 मिनिटांत विजय साजरा केला.
 • हिंगीसने यंदा विम्बल्डनमध्ये पेससोबत मिश्र आणि सानियासोबत महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले होते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत अनुकूल नसल्याचे संशोधन :

 • ज्येष्ठ नागरिकांसाठी भारत हे ठिकाण फारसे अनुकूल नसल्याचे अलिकडेच करण्यात आलेल्या एका संशोधनातून समोर आले आहे.
 • "हेल्पएज" या संस्थेने साऊथहॅंप्टन विद्यापीठाच्या संशोधनाने 'ग्लोबल एजवॉच इंडेक्‍स‘बाबत संशोधन केले आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
 • या संशोधनात जगातील विविध देशांमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी असलेल्या अनुकूल परिस्थितीनुसार मानांकन देण्यात आले आहे.
 • त्यामध्ये स्वित्झर्लंड सर्वांत वरच्या क्रमांकावर आहे.
 • तर एकूण 96 देशांमध्ये भारत 71 व्या क्रमांकावर आहे.
 • प्रत्येक देशामधील ज्येष्ठांसाठी आवश्‍यक ती सामाजिक, आर्थिक परिस्थितीचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे.
 • स्वित्झर्लंडनंतर नॉर्वे आणि स्विडनचा क्रमांक लागतो. तर जर्मनी चौथ्या क्रमांकावर तर कॅनडा पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर नेदरलॅंड, आईसलॅंड, जपान, युएस, युके आणि डेन्मार्कचा क्रमांक लागतो.

अ‍ॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी रायचौधरी यांच्या नियुक्ती :

 • अ‍ॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी एचटी मीडिया लिमिटेडचे संचालक बिनॉय रायचौधरी यांच्या नियुक्तीची घोषणा गुरुवारी नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात पत्रकार परिषदेत करण्यात आली.
 • रायचौधरी यांचा कार्यकाळ 2015-16 असा एक वर्षाकरिता असेल.
 • तसेच अ‍ॅडर्व्हटायझिंग स्टँडर्ड्स काऊन्सिल ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी आर.के. स्वामी बीबीडीओ प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष श्रीनिवासन. के. स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • तर मीडिया ब्रँड्स प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिधर सिन्हा यांची खजिनदारपदी नियुक्ती झाली आहे.

अ‍ॅपलने केले iPhone 6S व iPhone 6S + सादर :

 • अ‍ॅपलने सन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित एका खास समारोहात आयफोन 6 एस (iPhone 6S)आयफोन 6 एस प्लस (iPhone 6S +) सादर केले.
 • यासोबतच अ‍ॅपलने आयपॅड प्रो याचेदेखील लाँचिंग केले आहे.
 • 'ओरिजनल आयपॅड'नंतर आयपॅडशी संबंधित असलेली ही सर्वांत मोठी बातमी असल्याचे सांगितले आहे.
 • नव्या आयफोनची प्री-ऑर्डर बुकिंग या शनिवारपासून 12 सप्टेंबर सुरू होणार आहे.
 • कंपनी नव्या उत्पादनाला 12 देशात 25 सप्टेंबरपासून विक्रीसाठी पाठविणे सुरू करणार आहे.
 • 'आयफोन 6एस' व ‘आयफोन '6एस प्लस' या दोन्ही डिव्हाईसची किंमत मागील वर्षी लाँच केलेल्या मॉडेल एवढीच ठेवण्यात आली आहे.

युवा राष्ट्रकुल स्पर्धेत प्राची आणि टेनिसच्या मुकुंद व वेणुगोपाल सुवर्णपदक :

 • युवा राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंदाजीमध्ये महिलांच्या गटात भारताच्या प्राची सिंगने रिकर्व्ह प्रकारात आणि टेनिसच्या मिश्र दुहेरीत शशिकुमार मुकुंद व धृती टी. वेणुगोपाल यांनी धडाकेबाज खेळ करून सुवर्णपदक जिंकले.
 • भारतीय संघाने एकूण 17 पदकांसह पदकतालिकेत सहावे स्थान पटकावले आहे.

रिलायन्स एनर्जीने विविध सेवा देणारे मोबाइल अ‍ॅप सुरू :

 • 28 लाखाहून अधिक ग्राहक असलेल्या रिलायन्स एनर्जीने वीजशुल्क भरण्यापासून तक्रारी नोंदवण्यापर्यंत विविध सेवा देणारे मोबाइल अ‍ॅप सुरू केले आहे.
 • सध्या हे अ‍ॅप अ‍ॅण्ड्राइडवर उपलब्ध असून नोव्हेंबरपासून ओएसवर उपलब्ध होऊ शकेल.
 • कागदाचा कमीत कमी वापर, ग्राहकांना एका ठिकाणी सर्व प्रकारच्या सोयी, तसेच एका बटनाच्या क्लिकवर वीजशुल्क भरण्याची सोय देणाऱ्या या अ‍ॅपमधून इतरही सुविधा मिळणार आहेत.
 • मीटर रीडिंग, वीजशुल्काची प्रत डाऊनलोड करणे, मागील महिन्यांमधील वीजवापर, शुल्कप्रतीमधील भाषा बदलणे, यासोबतच वीजशुल्क भरण्याची सोयही या अ‍ॅपमध्ये करण्यात आलेली आहे.
 • याशिवाय वीज खंडित झाल्याच्या तक्रारी, नोंदणी केलेल्या तक्रारींचा मागोवा या अ‍ॅपमधून घेता येईल.
 दिनविशेष : 
 • कॅटेलोनिया राष्ट्र दिन
 • लॅटिन अमेरिका शिक्षक दिन
 • अमेरिका राष्ट्रभक्त दिन
 • 1792 : होप हिरा चोरला गेला.
 • 1906 : महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह हा शब्द पहिल्यांदा वापरला.
 • 1940 : दुसरे महायुद्ध - जर्मनीने केलेल्या बॉम्बफेकीत बकिंगहॅम पॅलेसची पडझड.
 • 1941 : अमेरिकेने पेंटेगॉन बांधायला सुरुवात केली.
 • 1942 : सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेनेजन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.
 • 1961 : वर्ल्ड वाइल्डलाइफ फंडची स्थापना.
 • 1980 : चिलीने नवीन संविधान अंगिकारले.
 • 1997 : नासाचे मार्स ग्लोबल सर्व्हेयर हे अंतराळयान मंगळावर पोचले.

Friday, September 11, 2015

चालू घडामोडी - १० सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 10, 2015]

डॉ. ‌विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार

  Dr. Vikas Amte
 • विविध क्षेत्रात राहून विदर्भाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्यांना दरवर्षी 'नागभूषण पुरस्कार' देऊन सन्मानीत केले जाते. याद्वारे एकप्रकारे विदर्भाच्या आंतरराष्ट्रीय लौकिकाचा सन्मान केला जातो. यंदाचा हा पुरस्कार डॉ. ‌विकास आमटे यांना जाहीर झाला आहे.
 • राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. याद्वारे विदर्भासाठी भरघोस कार्य केलेल्यांचा सन्मान केला जातो.
 • १ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह असे स्वरुप असलेल्या या पुरस्कारासाठी यंदा कुष्ठरोग्यांसाठी आपले जीवन वेचलेल्या डॉ. विकास आमटे यांची निवड करण्यात आली आहे.
 • वडील बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेत सेवारत असलेले डॉ. विकास आमटे हे वरोऱ्याच्या महारोगी सेवा समितीचे सचिव आहेत. आतापर्यंत त्यांना संयुक्त राष्ट्रांसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यात आता नागभूषण पुरस्काराची भर पडली आहे. 
 • आतापर्यंत हा पुरस्कार स्व.आर. के. पाटील, नितीन गडकरी, भंते सुरेई ससाई, जी. एम. टावरी, स्व.प्राचार्य राम शेवाळकर, डॉ.प्रकाश व मंदाताई आमटे, मारुती चितमपल्ली, महेश एलकुंचवार, स्व.कवी ग्रेस, राजकुमार हिराणी, ठाकूरदास बंग, अॅड. व्ही.आर. मनोहर व पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

वूमन्स-२०

 • आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी जी-२० समुहाने वूमन्स-२० गटाची स्थापना केली आहे.
 • जी २० च्या सध्या अंकारा (तुर्कस्थान) येथे झालेल्या असलेल्या बैठकीत वूमन्स-२० ची घोषणा करण्यात आली या बैठकीला सर्व सदस्य देशाचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकेचे गव्हर्नर उपस्थित होते
 • गुल्डेन तुर्कटॅन यांची वूमन्स-२० च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
 • वूमन्स-२० ची पहिली परिषद इस्तुंबूल येथे ऑक्टोबर मध्ये होणार आहे
 वूमन्स-२० चे स्वरूप 
 • जी २० समुहात असणाऱ्या २० देशातील महिला वूमन्स २०मधील प्रतिनिधी राहतील
 • त्या त्या देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज महिला
 • सामाजिक व शैक्षणीक संस्थातील महिला
 • राजकीय क्षेत्रातील महिला किंवा महिला मंत्रीयाचा समावेश राहील

सदस्य देश

 • अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया , दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, इंग्लंड, अमेरिका आणि यूरोपीयन युनियन
 जी-२० काय आहे? 
 • आशियात १९९९ मध्ये आलेल्या मोठ्या आर्थिक संकटानंतर विविध देशातील अर्थमंत्री मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांच्या बैठकीत जी-२० ची स्थापना झाली.
 • जागतिक आर्थिक विकासात सहकार्य या सूत्राने जगातील विकसित विकसनशील असे २० देश एकत्र येऊन बनलेला हा एक मुख्य गट आहे.
 • जागतिक सकल उत्पादनाचे (जीडीपी) ८५ टक्के प्रतिनिधित्व करणारा हा जी-२० गट आहे.

ब्रिटनच्या राणीचा विश्वविक्रम

  Queen Elizabeth
 • ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी ब्रिटीश सत्तेमध्ये ६३ वर्षे (२३,२२७ दिवस) महाराणी पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. वयाच्या २५व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ आता ८९ वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असाही विक्रम त्यांनी बनविला आहे.
 • ९ सप्टेंबर रोजी त्यांना ब्रिटिश राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. या सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले.
 अन्य विक्रम 
 • सर्वाधिक काळ सत्ताधीश राहिलेली महिला.
 • एलिझाबेथ यांचा विवाह समारंभ अधिक काळ चालला. 
 • सर्वाधिक देशांच्या नाण्यांवर एलिझाबेथ यांची प्रतिमा 
 • सर्वांत प्राचीन राजघराणे सांभाळणारी महिला.
 • राणीपदावर असताना ११६ देशांना २६५ भेटी दिल्या.
 • अमेरिकेच्या गेल्या १३ राष्ट्राध्यक्षांपैकी त्यांनी १२ राष्ट्राध्यक्षांची भेट. व्हाइट हाउसलादेखील भेट.
 • विन्स्टन चर्चिल, अँथनी एडन, हेरॉल्ड मॅकमिलन, अ‍ॅलेक डग्लस होम, हेरॉल्ड विल्सन, एडवर्ड हिथ, मार्गारेट थॅचर, जॉन मेजर, टोनी ब्लेअर, गॉर्डन ब्राऊन यांच्यासह आताचे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कार्यकाळाच्या त्या साक्षीदार आहेत.

‘जाटिया हाऊस’वर बिर्लांची मोहोर

 • दक्षिण मुंबईतील जाटिया हाऊस नावाच्या बंगल्याची प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी तब्बल ४२५ कोटी रुपयांना (म्हणजे १,८०,००० रुपये प्रति चौरस फूट दराने) खरेदी केली आहे.
 • मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीतील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आर्थिक व्यवहार आहे.
 • उद्योगपती व केम मॅक कंपनीचे यशवर्धन जाटिया यांच्या मालकीचा हा बंगला २५००० चौरस फुटांच्या परिसरात पसरला आहे. जाटिया यांनी ७० च्या दशकात एम. सी. वकील यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता.

फोर्ब्ज मासिकाच्या दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय

 • फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतील दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे. उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन १३ देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
 • त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या 'इन्फोसिस'च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिक दानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
 • नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला ५२ लाख डॉलरची मदत केली आहे. त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.
 • त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.

भारतीय वंशाच्या मुलाने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली

 • भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकली.
 • या स्पर्धेचे बक्षीस ५० हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही १० हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे.
 • तमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे जन्मलेल्या अनिरुद्धची स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे की, तो दररोज सरासरी दहा नवीन इंग्रजी शब्द आत्मसात करतो.

डीआरडीओच्या महासंचालकपदी जे. मंजुळा यांची नियुक्ती

  J-Manjula
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर’ या विभागाची सूत्रे स्वीकारली. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
 • या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंजुळा यांनी बंगळूरमधील ‘डिफेन्स ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला. 
 • हैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात २६ वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. यात त्यांनी सेना, वायु सेना, नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत.
 • मंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व २०११ मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला आहे.

Thursday, September 10, 2015

चालू घडामोडी - ९ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 9, 2015]

सीरियामधील जझल हा अखेरचा तेलप्रकल्पही इसिसच्या ताब्यात

 • सीरियामधील सरकारच्या नियंत्रणात असलेला जझल हा अखेरचा तेल प्रकल्पही हस्तगत करण्यात इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने यश मिळविले आहे.
 • पालमिरा या सीरियामधील ऐतिहासिक शहराच्या वायव्येस जझल तेल प्रकल्प आहे. सीरियामधील नैसर्गिक वायुच्या मुख्य क्षेत्रापासूनही हे ठिकाण जवळच आहे.
 • सीरियामध्ये सध्या बाशर अल असद यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या फौजा इसिसच्या हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी शर्थ करीत आहेत. राक्का या इसिसचे सध्या मुख्यालय असलेल्या शहरावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १६ दहशतवादी ठार झाले आहेत.
 • सीरियामध्ये मार्च २०११ मध्ये सुरु झालेल्या संघर्षानंतर लक्षावधी नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर या संघर्षामुळे सीरियन निर्वासितांचा लोंढा युरोपकडे वाहू लागला आहे.
 • सीरियाचे राष्ट्राध्यक्ष : बाशर अल असद

पाक, बांगलादेशमधील निर्वासितांना भारतात आश्रय

 • युरोपातील निर्वासितांचा प्रश्न जगभर गाजत असतानाच पाकिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांक समुदायांचा भारतातील प्रवेश आणि वास्तव्य अधिकृत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 
 • सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे ३१ डिसेंबर २०१४ रोजी किंवा त्यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या आणि भारतातील निवासाची वैधता संपलेल्या किंवा वैधतेचा कोणताही पुरावा नसलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) कायदा-१९४६ आणि परदेशी कायदा-१९४६ यामधून वगळण्यात आले आहे. 
 • त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायातील निर्वासित त्यांच्या व्हिसाची वैधता संपल्यानंतरही भारतामध्ये वास्तव्य करू शकणार आहेत.
 • हा निर्णय मानवीयतेच्या भावनेने घेण्यात आला आहे. या दोन्ही देशातील हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, पारशी आणि बुद्धिस्ट धर्माच्या निर्वासितांनी सुरक्षिततेसाठी भारताचा आश्रय घेतला होता.

काळ्या पैशांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव

 • परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशांची भारत सरकारच्या वतीने चौकशी सुरू असून इंदूरस्थित वस्त्रोद्योग कंपनी निओ कॉर्प इंटरनॅशनल लि. या कंपनीबाबतची माहिती देण्याची विनंती भारत सरकारने स्विस सरकारला केली आहे.
 • निओ कॉर्प ही १९८५ मध्ये छोटी कंपनी सुरू करण्यात आली आणि आता ती बहुराष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग समूह असल्याचा दावा केला जात आहे. कर चुकविल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या विविध संकुलांवर छापे टाकले होते.
 • भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशासकीय सहाय आणि माहितीची देवाणघेवाण याबाबतचा करार करण्यात आला असून त्याचा एक भाग म्हणून भारताने विविध कंपन्या आणि व्यक्ती यांच्याबद्दलची सविस्तर माहिती मागितली आहे.
 • स्विस सरकारच्या अधिकृत पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतीय कंपन्यांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.

निर्वासितांसाठी ऑस्ट्रिया-जर्मनीच्या सीमा खुल्या

 • सिरियातील यादवीमुळे हजारो निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे युरोपीय देशांच्या दिशेने येत आहेत. या निर्वासितांना हंगेरीतील सरकारने रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता हंगेरीहून येणाऱ्या हजारो निर्वासितांसाठी सीमा खुल्या केल्याची घोषणा ऑस्ट्रिया आणि जर्मनी यांनी केली आहे. 
 • जर्मनी इराक व सीरियातून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी ६ अब्ज युरो (६.७ अब्ज डॉलर्स) इतका निधी येत्या वर्षभरात उपलब्ध करणार आहे. स्थलांतरितांची काळजी घेण्यासाठी हा निधी देण्याचा घेतला आहे.
 • गेले काही आठवडे व महिने जर्मनी हे स्थलांतरितांचे आश्रयस्थान ठरले आहे. जर्मनी हा युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश असून, दुसऱ्या महायुद्धानंतर तेथे प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने निर्वासित येत आहेत.
 • एकूण आठ लाख निर्वासित येणे अपेक्षित असून, ही संख्या गेल्या वर्षीच्या चार पट असेल. त्यासाठी १० अब्ज युरो खर्च येणार आहे.
 • या आठवडाअखेरीस बावरिया ओलांडून १७ हजार स्थलांतरित येण्याची शक्यता आहे. जर्मनीत काही प्रमाणात स्थलांतरितांविरोधात निषेध मेळावे झाले असून काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. विशेष करून पूर्व जर्मनीत हे घडत आहे.

डॉ. ‌विकास आमटे यांना नागभूषण पुरस्कार

  Dr. Vikas Amte
 • विविध क्षेत्रात राहून विदर्भाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्यांना दरवर्षी 'नागभूषण पुरस्कार' देऊन सन्मानीत केले जाते. याद्वारे एकप्रकारे विदर्भाच्या आंतरराष्ट्रीय लौकिकाचा सन्मान केला जातो. यंदाचा हा पुरस्कार डॉ. ‌विकास आमटे यांना जाहीर झाला आहे.
 • राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहराच्या त्रिशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने नागभूषण अवॉर्ड फाऊंडेशनची स्थापना करण्यात आली. याद्वारे विदर्भासाठी भरघोस कार्य केलेल्यांचा सन्मान केला जातो.
 • १ लक्ष रुपये व सन्मानचिन्ह असे स्वरुप असलेल्या या पुरस्कारासाठी यंदा कुष्ठरोग्यांसाठी आपले जीवन वेचलेल्या डॉ. विकास आमटे यांची निवड करण्यात आली आहे.
 • वडील बाबा आमटे यांच्यापासून प्रेरणा घेत सेवारत असलेले डॉ. विकास आमटे हे वरोऱ्याच्या महारोगी सेवा समितीचे सचिव आहेत. आतापर्यंत त्यांना संयुक्त राष्ट्रांसह अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. त्यात आता नागभूषण पुरस्काराची भर पडली आहे. 
 • आतापर्यंत हा पुरस्कार स्व.आर. के. पाटील, नितीन गडकरी, भंते सुरेई ससाई, जी. एम. टावरी, स्व.प्राचार्य राम शेवाळकर, डॉ.प्रकाश व मंदाताई आमटे, मारुती चितमपल्ली, महेश एलकुंचवार, स्व.कवी ग्रेस, राजकुमार हिराणी, ठाकूरदास बंग, अॅड. व्ही.आर. मनोहर व पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांना प्रदान करण्यात आला आहे.

वूमन्स-२०

 • आर्थिक क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व कमी करण्यासाठी व लिंग समावेशकता येण्यासाठी जी-२० समुहाने वूमन्स-२० गटाची स्थापना केली आहे.
 • जी २० च्या सध्या अंकारा (तुर्कस्थान) येथे झालेल्या असलेल्या बैठकीत वूमन्स-२० ची घोषणा करण्यात आली या बैठकीला सर्व सदस्य देशाचे वित्तमंत्री व केंद्रीय बँकेचे गव्हर्नर उपस्थित होते
 • गुल्डेन तुर्कटॅन यांची वूमन्स-२० च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
 • वूमन्स-२० ची पहिली परिषद इस्तुंबूल येथे ऑक्टोबर मध्ये होणार आहे
 वूमन्स-२० चे स्वरूप 
 • जी २० समुहात असणाऱ्या २० देशातील महिला वूमन्स २०मधील प्रतिनिधी राहतील
 • त्या त्या देशातील उद्योग क्षेत्रातील दिग्गज महिला
 • सामाजिक व शैक्षणीक संस्थातील महिला
 • राजकीय क्षेत्रातील महिला किंवा महिला मंत्रीयाचा समावेश राहील

सदस्य देश

 • अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया , दक्षिण आफ्रिका, सौदी अरेबिया, दक्षिण कोरिया, तुर्कस्थान, इंग्लंड, अमेरिका आणि यूरोपीयन युनियन
 जी-२० काय आहे? 
 • आशियात १९९९ मध्ये आलेल्या मोठ्या आर्थिक संकटानंतर विविध देशातील अर्थमंत्री मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांच्या बैठकीत जी-२० ची स्थापना झाली.
 • जागतिक आर्थिक विकासात सहकार्य या सूत्राने जगातील विकसित विकसनशील असे २० देश एकत्र येऊन बनलेला हा एक मुख्य गट आहे.
 • जागतिक सकल उत्पादनाचे (जीडीपी) ८५ टक्के प्रतिनिधित्व करणारा हा जी-२० गट आहे.

ब्रिटनच्या राणीचा विश्वविक्रम

  Queen Elizabeth
 • ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ (द्वितीय) यांनी ब्रिटीश सत्तेमध्ये ६३ वर्षे (२३,२२७ दिवस) महाराणी पदावर राहण्याचा विक्रम केला आहे. वयाच्या २५व्या वर्षी राजगादीवर आलेल्या एलिझाबेथ आता ८९ वर्षांच्या असून, ब्रिटिश राजवंशातील सर्वाधिक काळ जगलेल्या व्यक्ती असाही विक्रम त्यांनी बनविला आहे.
 • ९ सप्टेंबर रोजी त्यांना ब्रिटिश राजसत्तेचे प्रमुखपद हातात घेऊन ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. या सहा दशकांच्या कालावधीत त्यांनी ब्रिटिश संसदेत अनेक पंतप्रधानांचा कार्यकाळ, अनेक आशियाई, आफ्रिकन देशांचे स्वातंत्र्यही पाहिले.
 अन्य विक्रम 
 • सर्वाधिक काळ सत्ताधीश राहिलेली महिला.
 • एलिझाबेथ यांचा विवाह समारंभ अधिक काळ चालला. 
 • सर्वाधिक देशांच्या नाण्यांवर एलिझाबेथ यांची प्रतिमा 
 • सर्वांत प्राचीन राजघराणे सांभाळणारी महिला.
 • राणीपदावर असताना ११६ देशांना २६५ भेटी दिल्या.
 • अमेरिकेच्या गेल्या १३ राष्ट्राध्यक्षांपैकी त्यांनी १२ राष्ट्राध्यक्षांची भेट. व्हाइट हाउसलादेखील भेट.
 • विन्स्टन चर्चिल, अँथनी एडन, हेरॉल्ड मॅकमिलन, अ‍ॅलेक डग्लस होम, हेरॉल्ड विल्सन, एडवर्ड हिथ, मार्गारेट थॅचर, जॉन मेजर, टोनी ब्लेअर, गॉर्डन ब्राऊन यांच्यासह आताचे ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या कार्यकाळाच्या त्या साक्षीदार आहेत.
‘जाटिया हाऊस’वर बिर्लांची मोहोर
 • दक्षिण मुंबईतील जाटिया हाऊस नावाच्या बंगल्याची प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांनी तब्बल ४२५ कोटी रुपयांना (म्हणजे १,८०,००० रुपये प्रति चौरस फूट दराने) खरेदी केली आहे.
 • मुंबईतील घरांच्या खरेदी-विक्रीतील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा आर्थिक व्यवहार आहे.
 • उद्योगपती व केम मॅक कंपनीचे यशवर्धन जाटिया यांच्या मालकीचा हा बंगला २५००० चौरस फुटांच्या परिसरात पसरला आहे. जाटिया यांनी ७० च्या दशकात एम. सी. वकील यांच्याकडून हा बंगला खरेदी केला होता.

फोर्ब्ज मासिकाच्या दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय

 • फोर्ब्ज मासिकाच्या ताज्या आशिया आवृत्तीतील दानशूर व्यक्तींच्या यादीत सात भारतीय दानशूरांचा समावेश आहे. उल्लेखनीय दातृत्वाची दखल घेऊन १३ देशांतील दानशूर व्यक्तींचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
 • त्यात सेनापती गोपालकृष्णन, नंदन नीलेकणी आणि एस. डी. शिबुलाल या 'इन्फोसिस'च्या तीन सहसंस्थापकांचाही समावेश आहे. आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या वैयक्तिक दानाची दखल घेऊन त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.
 • नारायणमूर्ती यांचा मुलगा रोहन याने प्राचीन भारतीय साहित्याच्या प्रसार-प्रचारासाठी हार्वर्ड विद्यापीठाला ५२ लाख डॉलरची मदत केली आहे. त्यामुळे त्याचे नावही या यादीत आहे.
 • त्या व्यतिरिक्त मूळचे केरळमधील असलेले दुबईतील व्यावसायिक सनी वार्की, मूळचे भारतीय असलेले लंडनस्थित उद्योजक बंधू सुरेश आणि महेश रामकृष्णन यांचाही या यादीत समावेश आहे.

भारतीय वंशाच्या मुलाने स्पेलिंग बी स्पर्धा जिंकली

 • भारतीय वंशाच्या नऊ वर्षांचा अनिरुद्ध काथिरवेलने ऑस्ट्रेलियातील ‘द ग्रेट ऑस्ट्रेलियन स्पेलिंग बी’ स्पर्धा जिंकली.
 • या स्पर्धेचे बक्षीस ५० हजार डॉलर असून, त्याच्या शाळेलाही १० हजार डॉलरचे साहित्यही देण्यात येणार आहे.
 • तमीळ कुटुंबातील आणि मेलबर्न येथे जन्मलेल्या अनिरुद्धची स्मरणशक्ती एवढी दांडगी आहे की, तो दररोज सरासरी दहा नवीन इंग्रजी शब्द आत्मसात करतो.

डीआरडीओच्या महासंचालकपदी जे. मंजुळा यांची नियुक्ती

  J-Manjula
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) महासंचालकपदी जे. मंजुळा यांची निवड करण्यात आली असून, त्यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन सिस्टीम क्लस्टर’ या विभागाची सूत्रे स्वीकारली. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला.
 • या विभागाचे महासंचालकपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. मंजुळा यांनी बंगळूरमधील ‘डिफेन्स ऍव्हिओनिक्स रिसर्च सेंटर’मध्ये संचालक म्हणून काम केले असून, संशोधक म्हणूनही त्यांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. मंजुळा यांनी के. डी. नायक यांच्याकडून पदभार स्वीकारला. 
 • हैदराबाद येथील डिफेंस इलेक्ट्रॉनिक रिसर्च लॅबोरेटरी मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वारफेअर विभागात २६ वर्षाहून अधिक काळ त्यांनी काम केले आहे. यात त्यांनी सेना, वायु सेना, नौसेना आणि अर्ध सैन्य दलासाठी काही उपकरण आणि सॉफ्टवेअर डिजाइन केले आहेत.
 • मंजुळा यांनी उस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. मंजुळा यांना यापूर्वी डीआरडीओचा सर्वोत्कृष्ट कार्य व २०११ मध्ये सर्वोत्तम शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला आहे.

Wednesday, September 09, 2015

चालू घडामोडी - ८ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 8, 2015]

अहमद जावेद मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

  New CP Ahmed Javed (L) and Rakesh Maria (R)
 • मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचा कार्यकाळ ३० सप्टेंबर रोजी संपणार असतानाच अचानक त्यांची उचलबांगडी करून महासंचालकपदी (होमगार्ड) बढती देण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी होमगार्ड विभागाचे महासमादेशक अहमद जावेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 • १९८०च्या बॅचचे आयपीएस असलेले अहमद जावेद यांनी आठ वर्षांपूर्वी मुंबईत सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे. त्यानंतर त्यांनी अपर महासंचालक (प्रशासन), नवी मुंबईचे पोलीस आयुक्त व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) काम पाहिले आहे.
 • १८ फेबु्रवारी २०१४ रोजी त्यांची महासंचालकपदी बढती मिळून होमगार्डच्या महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली होती. 
 • ते पुढच्या वर्षी ३१ जानेवारीला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांना आयुक्त म्हणून जेमतेम साडे चार महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर राज्य सरकार आपल्या अधिकारात तीन महिन्यांची मुदतवाढ देऊ शकते.

कार्मिक मंत्रालयाचा आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांसाठी नवा नियम

 • केंद्र सरकारने सनदी अधिकाऱ्यांसाठी नवी नियमावली जारी केली असून, त्यानुसार कामानिमित्त परदेशात गेलेल्या सनदी अधिकाऱ्यांवर अधिक बंधने टाकण्यात आली आहेत.
 • यानुसार पूर्वपरवानगीशिवाय सुटी लांबवणाऱ्या किंवा कामानंतर एक महिन्यापेक्षा जास्त काळ परदेशात थांबणाऱ्या आयएएस किंवा आयपीएस दर्जाच्या सनदी अधिकाऱ्यांवर त्यांची नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते.
 • कामानिमित्त परदेशात गेलेले काही अधिकारी काम पूर्ण झाल्यावरही पुन्हा देशात परतत नाहीत. त्याचवेळी काही अधिकारी वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता परदेशामध्ये राहून रजेवर जातात. या सगळ्याचा विचार करून कार्मिक मंत्रालयाने सनदी अधिकाऱयांबाबत नवी नियमावली तयार केली.
 काय आहे नवीन नियम? 
 • भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय वनसेवा, भारतीय पोलीस सेवा या व इतर भारतीय स्तरावरील सेवांमधील अधिकारी मंजूर केलेल्या सुटीपेक्षा जास्त काळ विनापरवानगी गैरहजर राहिल्यास, परदेशातील काम संपल्यावर तेथून वेळेत परत न आल्यास एक महिन्यापर्यंत वाट पाहण्यात येईल.
 • त्यानंतर संबंधित अधिकारी ज्या केडरमधून आला असेल तेथून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. या नोटिसीला जर संबंधित अधिकाऱ्याने उत्तर दिले नाही. तर राज्य सरकार त्याला नोकरीवरून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करेल आणि तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले. त्यानंतर दोन महिन्यात त्याला कामावरून कमी केले जाईल.
 • जर राज्य सरकारने ही कारवाई केली नाही, तर केंद्र सरकार स्वतःहून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकेल.

ओएनजीसीद्वारे व्हॅनकोरनेफ्टमधील १५ टक्के हिस्सा खरेदी

  ONGC Videsh Limited
 • तेल व वायू क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम ‘ओएनजीसी विदेश लिमिटेड’ने रशियातील व्हॅन्कोर तेलक्षेत्रात कार्यरत व्हॅनकोरनेफ्ट या कंपनीचे १५ टक्के भांडवली समभाग १.२६८ अब्ज डॉलर्सच्या मोबदल्यात ताब्यात घेतले आहेत.
 • रशियातील सैबेरिया क्षेत्रात क्रॅस्नोयाक प्रदेशातील तुरुखान्स्की जिल्ह्यात व्हॅन्कोर हे तेलक्षेत्र आहे. रशियातील दुसरा मोठा तेलसाठा असलेले या क्षेत्राचे त्या देशाच्या एकूण तेल उत्पादनांत त्याचे ४ टक्के योगदान आहे.
 • येथून दिवसाला ४.४२ लाख पिंप म्हणजे दरसाल अडीच अब्ज पिंपे तेल मिळविता येईल आणि त्यापैकी ३३ लाख टन उत्पादित तेल ओएनजीसी विदेशला प्रतिवर्षी प्राप्त होऊ शकेल.
 • २०१३मध्ये ‘ओएनजीसी विदेश लिमिटेड’ने मोझांबिकमधील गॅस साठ्यासाठी ४.१२५ अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजले होते. तर २००९ मध्ये २.१ अब्ज अमेरिकन डॉलर्स मोजून रशियाची इंपेरियल एनर्जी कंपनी विकत घेतली होती.

निमलष्करी आणि केंद्रीय सुरक्षा दलातील ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव

 • निमलष्करी दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील ३३ टक्के जागा यापुढे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घोषणा केली.
 • ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा अकादमीच्या दीक्षांत समारोहात बोलत होते. सध्याच्या घडीला सुरक्षा दलांमध्ये महिलांचे प्रमाण फक्त ५.०४ टक्के इतके आहे.
 • केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे सीआयएसएफ हे पहिले दल आहे. सीआयएसएफमधील जवांनाची संख्या सध्या १.४७ लाख असून ती भविष्यात दोन लाख करण्याचा सरकारचा इरादा आहे.

स्नॅपडीलद्वारे सिलिकॉन व्हॅलीतील ‘रिडय़ूस डाटा’ची खरेदी

  Snapdeal
 • ई-व्यापारातील भारताची अग्रणी नवउद्यमी कंपनी स्नॅपडीलने अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीतील रिडय़ूस डाटा ही नवोद्योगी कंपनी ताब्यात घेतली आहे.
 • माउंट व्ह्य़ू येथील ही कंपनी डिजिटल जाहिरातींचे फार वेगळ्या स्वरूपाचे डिस्प्ले तयार करते. असीफ अली यांनी २०१२ मध्ये ही कंपनी स्थापन केली होती व त्यांचे ग्राहक अमेरिका, भारत व ब्रिटन या देशात आहेत.
 • स्नॅपडीलने याच वर्षांत फ्रीचार्ज, मार्टमोबी व लेटसगोमो लॅबस या कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. स्नॅपडीलचे ४ कोटी वापरकर्ते असून एकूण दोन लाख विक्रेते आहेत.
 • स्नॅपडीलचे संस्थापक : रोहित बन्सल

सीरियामधील जझल हा अखेरचा तेलप्रकल्पही इसिसच्या ताब्यात

 • सीरियामधील सरकारच्या नियंत्रणात असलेला जझल हा अखेरचा तेल प्रकल्पही हस्तगत करण्यात इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने यश मिळविले आहे.
 • पालमिरा या सीरियामधील ऐतिहासिक शहराच्या वायव्येस जझल तेल प्रकल्प आहे. सीरियामधील नैसर्गिक वायुच्या मुख्य क्षेत्रापासूनही हे ठिकाण जवळच आहे.
 • सीरियामध्ये सध्या बाशर अल असद यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या फौजा इसिसच्या हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी शर्थ करीत आहेत. राक्का या इसिसचे सध्या मुख्यालय असलेल्या शहरावर अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १६ दहशतवादी ठार झाले आहेत.
 • सीरियामध्ये मार्च २०११ मध्ये सुरु झालेल्या संघर्षानंतर लक्षावधी नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर या संघर्षामुळे सीरियन निर्वासितांचा लोंढा युरोपकडे वाहू लागला आहे.
 • सीरियाचे राष्ट्राध्यक्ष : बाशर अल असद

पाक, बांगलादेशमधील निर्वासितांना भारतात आश्रय

 • युरोपातील निर्वासितांचा प्रश्न जगभर गाजत असतानाच पाकिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्यांक समुदायांचा भारतातील प्रवेश आणि वास्तव्य अधिकृत करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 
 • सरकारने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाणे ३१ डिसेंबर २०१४ रोजी किंवा त्यापूर्वी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून भारतात आलेल्या आणि भारतातील निवासाची वैधता संपलेल्या किंवा वैधतेचा कोणताही पुरावा नसलेल्या अल्पसंख्यांक समुदायातील नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) कायदा-१९४६ आणि परदेशी कायदा-१९४६ यामधून वगळण्यात आले आहे. 
 • त्यामुळे बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक समुदायातील निर्वासित त्यांच्या व्हिसाची वैधता संपल्यानंतरही भारतामध्ये वास्तव्य करू शकणार आहेत.
 • हा निर्णय मानवीयतेच्या भावनेने घेण्यात आला आहे. या दोन्ही देशातील हिंदू, शीख, ख्रिश्चन, जैन, पारशी आणि बुद्धिस्ट धर्माच्या निर्वासितांनी सुरक्षिततेसाठी भारताचा आश्रय घेतला होता.

काळ्या पैशांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव

 • परदेशात ठेवण्यात आलेल्या काळ्या पैशांची भारत सरकारच्या वतीने चौकशी सुरू असून इंदूरस्थित वस्त्रोद्योग कंपनी निओ कॉर्प इंटरनॅशनल लि. या कंपनीबाबतची माहिती देण्याची विनंती भारत सरकारने स्विस सरकारला केली आहे.
 • निओ कॉर्प ही १९८५ मध्ये छोटी कंपनी सुरू करण्यात आली आणि आता ती बहुराष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग समूह असल्याचा दावा केला जात आहे. कर चुकविल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागाने फेब्रुवारी महिन्यात कंपनीच्या विविध संकुलांवर छापे टाकले होते.
 • भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये प्रशासकीय सहाय आणि माहितीची देवाणघेवाण याबाबतचा करार करण्यात आला असून त्याचा एक भाग म्हणून भारताने विविध कंपन्या आणि व्यक्ती यांच्याबद्दलची सविस्तर माहिती मागितली आहे.
 • स्विस सरकारच्या अधिकृत पत्रात प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतीय कंपन्यांच्या यादीत निओ कॉर्पचे नाव नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे.

निर्वासितांसाठी ऑस्ट्रिया-जर्मनीच्या सीमा खुल्या

 • सिरियातील यादवीमुळे हजारो निर्वासितांचे लोंढेच्या लोंढे युरोपीय देशांच्या दिशेने येत आहेत. या निर्वासितांना हंगेरीतील सरकारने रोखून धरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता हंगेरीहून येणाऱ्या हजारो निर्वासितांसाठी सीमा खुल्या केल्याची घोषणा ऑस्ट्रिया आणि जर्मनी यांनी केली आहे. 
 • जर्मनी इराक व सीरियातून येणाऱ्या स्थलांतरितांसाठी ६ अब्ज युरो (६.७ अब्ज डॉलर्स) इतका निधी येत्या वर्षभरात उपलब्ध करणार आहे. स्थलांतरितांची काळजी घेण्यासाठी हा निधी देण्याचा घेतला आहे.
 • गेले काही आठवडे व महिने जर्मनी हे स्थलांतरितांचे आश्रयस्थान ठरले आहे. जर्मनी हा युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश असून, दुसऱ्या महायुद्धानंतर तेथे प्रथमच इतक्या मोठय़ा संख्येने निर्वासित येत आहेत.
 • एकूण आठ लाख निर्वासित येणे अपेक्षित असून, ही संख्या गेल्या वर्षीच्या चार पट असेल. त्यासाठी १० अब्ज युरो खर्च येणार आहे.
 • या आठवडाअखेरीस बावरिया ओलांडून १७ हजार स्थलांतरित येण्याची शक्यता आहे. जर्मनीत काही प्रमाणात स्थलांतरितांविरोधात निषेध मेळावे झाले असून काही ठिकाणी हल्ले झाले आहेत. विशेष करून पूर्व जर्मनीत हे घडत आहे.

Tuesday, September 08, 2015

चालू घडामोडी - ७ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 7, 2015]

भारत पाकिस्तान दरम्यान महासंचालक स्तरीय चर्चा

  BSF-Pak Rangers meet
 • भारत पाकिस्तान दरम्यान सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालक स्तरीय पाच दिवसांच्या चर्चेला ९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.
 • लपून गोळीबार करण्यासह जम्मू- काश्मीरमधील शस्त्रसंधी भंगाच्या घटना, घुसखोरी, कच्छच्या रणमधील अतिक्रमण यांसारखे महत्त्वाचे मुद्दे यावेळी भारत उपस्थित करण्याची शक्यता आहे.
 • पाकिस्तानी रेंजर्सचे महासंचालक (पंजाब) मेजर जनरल उमर फारुक बुर्की यांच्या नेतृत्वाखाली १६ सदस्यांचे शिष्टमंडळ ८ तारखेला अटारी-वाघा सीमेवरून भारतात प्रवेश करेल आणि ९ ते १३ सप्टेंबरदरम्यान सीमा सुरक्षा दलासोबत होणाऱ्या बोलण्यांमध्ये सहभागी होण्यासाठी अमृतसरहून नवी दिल्लीला येणार आहे.
 • भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व सीमा सुरक्षा दलाचे प्रमुख देवेंद्र कुमार पाठक करतील.

आशियाई नेमबाजी क्रमवारीत नारंग अव्वल

  Gagan Narang
 • भारताचा ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज गगन नारंगने ५० मीटर रायफल प्रोन विभागात आशियाई क्रमवारीत अव्वल स्थान घेतले, तर जितू राय याने ५० मीटर पिस्तूल विभागात द्वितीय मानांकन प्राप्त केले.
 • नारंगने लंडन येथे २०१२मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवले होते. फोर्ट बेनिंग येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत नारंगने ६२६.३ गुणांसह अंतिम फेरी गाठली व अंतिम फेरीत १८५.८ गुण नोंदवत ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण केली.
 • ३२ वर्षीय नारंगचे आता ९७१ गुण झाले आहेत. चीनच्या शेंगबो झाओने ८९६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. पिस्तूल विभागात जितूने १९२९ गुण मिळविले आहेत. दक्षिण कोरियाच्या जोंगहो जिनने अव्वल स्थान घेतले आहे. 
 • ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्राने १० मीटर एअर रायफलमध्ये पाचवे मानांकन मिळवले असून नारंगने या प्रकारात सातवे स्थान घेतले आहे.
 • गुरप्रित सिंगने २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूलमध्ये पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अभिनव व गुरप्रित यांनी यापूर्वीच रिओ ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित केले आहे.

नोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस यांची मुंबईला भेट

  Muhammad Yunus
 • बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे प्रणेते आणि २००६मधील शांतता नोबेल पुरस्कार विजेते महम्मद युनुस यांनी ७ सप्टेंबर रोजी मुंबईला भेट दिली.
 • यावेळी त्यांनी गरिबी निर्मुलनाचे उद्दिष्ट साध्य करायचे असल्यास गरीबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, असे स्पष्ट मत व्यक्त केले. 
 • गरिबी निर्मुलनासाठी बांगलादेशात राबविण्यात आलेल्या विविध प्रयोगांची यावेळी महम्मद युनुस यांनी माहिती दिली. यात विशेष करुन त्यांनी राबविलेला ग्रामीण बँकेचा प्रयोग, सुक्ष्म पतपुरवठा, बचतगटांची चळवळ, सामाजिक उद्योग अशा विविध उपक्रमांबाबत विवेचन केले.
 • ते म्हणाले की, जगभरातील बहुतांश गरीब समाज आजही बँकिंग क्षेत्रापासून लांब आहे. त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना बँकांच्या लाभक्षेत्रात आणले पाहिजे. 
 • कर्जाची परतफेड ही गरिबांकडून जास्त प्रमाणात होते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना अधिकाधिक पतपुरवठा केला पाहिजे. यासाठी प्रस्थापित व्यावसायीक बँकांऐवजी गरीबांसाठी स्वतंत्र बँका स्थापन करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
 • भारतात सर्व प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. महिलांना आणि गरिबांना अधिकाधिक संधी देऊन देशाचे विकासचक्र अधिक गतिमान करता येऊ शकेल, असे त्यांनी सांगितले. 
 बांगलादेशात ग्रामीण बँक यशस्वी 
 • बांगलादेशात राबविण्यात आलेल्या ग्रामीण बँकेच्या चळवळीत ९७ टक्के गरीब महिलांचा सहभाग होता. या चळवळीत कर्जाच्या परताव्याचे प्रमाण ९९.६ टक्के इतके होते.
 • या चळवळीत महिलांना पतपुरवठ्याबरोबरच आरोग्य विमा, पेन्शन फंड, त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज असे विविध उपक्रम राबविण्यात आले. ग्रामीण बँकेमार्फत सामाजिक उद्योगाची संकल्पनाही राबविण्यात आली. महिलांच्या सहभागातून ही संकल्पनाही यशस्वी झाली. 

देशात सुमारे १२ ते १४ हजार बिबटे

  12 to 14 thousand Leopards in India
 • भारतामधील बिबट्यांची प्रथमच गणना करण्यात आली असून देशात सुमारे १२ ते १४ हजार बिबटे असल्याची माहिती समोर आली आहे. बिबट्या हा देशातील सर्वाधिक संख्या असलेला शिकारी प्राणी आहे.
 • गेल्या वर्षी करण्यात आलेल्या व्याघ्रगणनेची पद्धत वापरूनच बिबट्यांची गणनाही करण्यात आली. या पद्धतीनुसार बिबट्यांचे छायाचित्रण, त्यांच्या अस्तित्वाचा इतर पुरावा संकलित करण्यात आला आहे. 
 • व्याघ्रगणनेच्या मोहिमेचे मुख्य शास्त्रज्ञ यादवेंद्रदेव व्ही. झाला यांच्या नेतृत्वाखाली ही गणना करण्यात आली. या गणनेमुळे देशाच्या विविध भागांत विखुरलेल्या बिबट्यांची विस्तृत माहिती उपलब्ध झाली आहे.
 • शिवालिक टेकड्या, उत्तर व मध्य भारत व पश्चिम घाटाचा अंतर्भाव असलेल्या, सुमारे साडेतीन लाख कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या भागाचा अभ्यास या मोहिमेदरम्यान करण्यात आला. 

मेन्सा बुद्धय़ांक चाचणीत भारतीय वंशाच्या मुलीला १६२ गुण

 • ब्रिटनमध्ये लिडिया सेबास्टियन या भारतीय वंशाच्या मुलीला मेन्सा बुद्धय़ांक चाचणीत १६२ गुण मिळाले असून तिने अल्बर्ट आईनस्टाईन व स्टीफन हॉकिंग यांनाही मागे टाकले आहे. ती अवघी बारा वर्षांची आहे.
 • लिडियाने कॅटेल ३ बी प्रश्नपत्रिकेतील दीडशे प्रश्न सोडवले व तिला १६२ गुण मिळाले. तिने तिच्या गटात कमाल गुण मिळवले आहेत. 
 • यात अठरा वर्षांखालील मुलांना जास्तीत जास्त १६२ गुण मिळू शकतात तर प्रौढांना कमाल १६१ गुण मिळू शकतात. हॉकिंग व आईनस्टाईन यांचा बुद्धय़ांत १६० असल्याचे मानले जाते.
 • लिडिया ही इतर क्षेत्रातही हुशार आहे. वयाच्या चौथ्या वर्षांपासून तिला व्हायोलिन येते तर वयाच्या सहाव्या महिन्यात ती बोलायला शिकली.

‘इसिस प्रूफ’ रायफल  ‘क्रुसेडर’ची निर्मिती

 • अमेरिकेतील एका बंदूक निर्मात्याने ‘इसिस प्रूफ’ रायफलची रचना केली आहे, ती रायफल इसिसच्या दहशतवाद्यांना वापरता येणार नाही, त्यात बायबलमधील भाग व ख्रिश्चन चिन्हे कोरलेली आहेत.
 • एआर १५ या रायफलीचे नामकरण ‘क्रुसेडर’ असे करण्यात आले असून तिच्या एका बाजूला लेसरने नाइट्स टेम्पलर क्रॉस व दुसऱ्या बाजूला बायबलचा काही भाग कोरलेला आहे.
 • स्पाईकस टॅक्टिकल कंपनीच्या मते, मुस्लिम दहशतवादी ही रायफल वापरू शकणार नाहीत कारण त्यांची धर्मावर श्रद्धा असते व या रायफलवर ख्रिश्चन धर्माची चिन्हे आहेत.
 • या रायफलला पीस, वॉर व गॉड विल्स इट अशी तीन सेटिंग्ज आहेत. या रायफलची विक्री झाली असून तिची किंमत ९६० ते ३००० डॉलर दरम्यान आहे.
 • अमेरिकी शस्त्रास्त्रे जिहादींच्या हातात पडत आहेत अशी भीती व्यक्त होत असल्याने ही रायफल तयार केली आहे. इसिसच्या व्हिडिओत दहशतवादी एम १६ या इराकी सैनिकांकडून हिसकावलेल्या रायफली वापरलेल्या दिसत आहेत तसेत अमेरिकेने तेथे जी शस्त्रास्त्रे टाकली होती ती इसिसकडे आहेत.

Monday, September 07, 2015

चालू घडामोडी - ६ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 6, 2015]

माजी सैनिकांचे उपोषण मागे

 • ‘समान हुद्दा समान निवृत्तिवेतन’ (वन रॅंक, वन पेन्शन-ओआरओपी) योजनेतील स्वेच्छानिवृत्तीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “पंधरा वर्षे सेवा करणाऱ्या प्रत्येक जवानाला तसेच स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या जवानालाही या योजनेचा लाभ होणार आहे” असा खुलासा केला.
 • त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे माजी सैनिकांचे सुरु असलेले उपोषण मागे घेण्यात आले आहे. परंतु लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंह यांनी म्हटले.
 दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचा शुभारंभ 
  Delhi Metro Badarpur-Faridabad line
 • ६ सप्टेंबर २०१५ रोजी दिल्ली-फरीदाबाद मेट्रोचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर फरीदाबाद येथे पंतप्रधानांनी सभा घेत हरियानाच्या विकासाबाबत आणि ओआरओपीविषयी स्पष्टीकरण दिले.
 • यावेळी पंतप्रधानांनी एस्कॉर्ट्स मुजेसर स्टेशनपासून बाटा चौक पर्यत मेट्रोने प्रवास करत मेट्रो अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
 • औद्योगिक क्षेत्रासाठी प्रसिद्ध असलेल्या हरियानाला राजधानी दिल्लीला जोडण्यासाठी मेट्रो मार्गाची सुरवात करण्यात आली आहे. दिल्लीतील बदरपूर पासून फरीदाबादमधील मुजेसर स्थानकापर्यत ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे.
 • आयटीओ ते बदरपूरपर्यतच जाणारी मेट्रो आता फरीदाबाद ते मुजेसर स्टेशन म्हणजे १४ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. यादरम्यान नऊ स्थानके आहेत. याप्रकल्पासाठी तब्बल २५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. 
 • हरियाणाचे मुख्यमंत्री : मनोहरलाल खट्टर

काळा पैसा बाळगणाऱ्यांची गुप्त माहिती देणाऱ्यांना बक्षीस

 • केंद्र सरकारने काळा पैसा बाळगणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरवात केली असून, या संदर्भात केंद्रीय आयकर विभागाने नवीन मार्गदर्शिका काढली आहे.
 • यानुसार जे लोक करबुडवे, काळा पैसा बाळगणाऱ्यांची गुप्त माहिती देतील त्यांना संबंधितांच्या करवसुलीच्या दहा टक्के अथवा पंधरा लाख यापैकी जी रक्कम अधिक असेल ती बक्षीस म्हणून देण्यात येईल. अपवादात्मक परिस्थितीमध्ये केंद्रीय प्रत्यक्ष करविभागाच्या (सीबीडीटी) संमतीने बक्षीस देण्यात येईल.
 • परदेशात जाणारा काळा पैसा रोखण्याचे सीबीडीटीसमोर मोठे आव्हान आहे. या संदर्भात एक विशेष तपास पथकही केंद्र सरकारने तयार केले आहे.

राज्यातील शिक्षकांसाठी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना

 • राज्यातील शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘कॅशलेस मेडिक्लेम’ योजना लागू करण्यात येत असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केले आहे.
 • राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना आजारात या योजनेचा फायदा होईल. राज्यातील शेकडो रुग्णालये या योजनेशी जोडली जाणार आहेत.
 • सध्या आजारांवर उपचार घेतल्यानंतर मेडिकल बिल मंजूर करून घेण्यासाठी विलंब लागतो. या नवीन योजनेत शिक्षकांना मेडिकल कार्ड दिले जाणार असून, रुग्णालयात ते दाखविल्यावर पैसे न भरता उपचार घेता येतील.
 • शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष शिक्षक आमदार रामनाथ मोते व नागो गाणार यांनी ही योजना सुचवली आहे.

शेन वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

  Shane Watson
 • ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शेन वॉटसनला नुकतेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या ऍशेस मालिकेत संघाबाहेर ठेवण्यात आले होते.
 • वॉटसनने आतापर्यंत कसोटी कारकिर्दीत ५९ कसोटी सामने खेळले आहे. त्याने शेवटची कसोटी इंग्लंडविरुद्ध ऍशेस मालिकेत खेळली होती. मायकेल क्लार्क, ख्रिस रॉजर्स यांच्यानंतर आता वॉटसननेही निवृत्ती जाहीर केली आहे.
 • वॉटसनने एक कसोटी आणि नऊ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आहे.

‘गोंडवाना’च्या कुलगुरुपदी डॉ. नामदेव कल्याणकर

 • गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. नामदेव कल्याणकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीचा कार्यकाळ पाच वर्षांचा राहील. गेल्या दीड वर्षांपासून विद्यापीठासाठी पूर्णवेळ कुलगुरूंचा शोध सुरू होता.
 • डॉ. विजय आईंचवार यांच्या नियुक्तीची मुदत संपल्यानंतर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा प्रभार डॉ. एम. डी. चांदेकर यांच्याकडे होता.
 • पूर्णवेळ कुलगुरूंच्या निवडीसाठी न्या. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीत महिला व बालकल्याण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार आणि गोव्याचे डॉ. रेड्डी यांचा समावेश होता.
 • चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या शैक्षणिक विकासासाठी २०११ मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.

चीन आणि पाकिस्तानचा संयुक्त युध्दसराव

 • चीन आणि पाकिस्तानच्या हवाई दलाने संयुक्त सरावाला ६ सप्टेंबर २०१५ रोजी सुरवात केली. या सरावामध्ये दोन्ही देशांच्या लढाऊ विमानांनी सहभाग घेतला.
 • हा सराव किती काळ चालणार आणि कोठे सुरू आहे, याबाबत माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. याआधी पाकिस्तानमध्ये २०११, चीनमध्ये २०१३ आणि पुन्हा पाकिस्तानमध्ये २०१४ मध्ये असा सराव झाला होता.

इटालियन ग्रां. प्री.मध्ये लुइस हॅमिल्टन विजेता

 • लुइस हॅमिल्टनने इटालियन ग्रां. प्री. शर्यत जिंकून विश्वविजेतेपदाकडे आगेकूच करताना ५३ गुणांची आघाडी घेतली. हॅमिल्टनचे हे फॉर्म्युला-वन शर्यतीचे ४०वे जेतेपद आहे. या जेतेपदामुळे हॅमिल्टनच्या खात्यात एकूण २५२ गुण जमा झाले आहेत.
 • या शर्यतीत सबेस्टीयन वेटेलने दुसरे स्थान तर विल्यम्सच्या फेलिपे मासाने तिसरे स्थान पटकावले.
 • विश्वविजेतेपदाच्या शर्यतीत १९९ गुणांसह मर्सिडिजचा निको रोसबर्ग दुसऱ्या स्थानावर, तर १७८ गुणांसह फेरारीचा सेबॅस्टियन वेटेल तिसऱ्या स्थानावर आहे.

अपूर्वी चंडिलाला रौप्यपदक

  ISSF World Cup Finals Apurvi Chandela wins silver
 • जयपूरची युवा भारतीय नेमबाज अपूर्वी चंडिलाने आयएसएसएफ रायफल आणि पिस्तुल विश्वचषक स्पर्धेतील १० मीटर रायफल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदक जिंकण्याची किमया साधली.
 • इराणच्या अहमदी ईलाहेने सुवर्णपदक जिंकले तर सर्बिच्या आंद्रीया अर्सोव्हिकने कांस्यपदक मिळवले.
 • एप्रिल महिन्यात चँगवॉन (कोरिया) येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी (रायफल/पिस्तुल) स्पर्धेतील १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्य पदकाची कमाई करून अपूर्वीने आधीच रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत स्थान मिळवले आहे. 
 • तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकही पटकावले आहे. वर्षभरातील चार विश्वचषक नेमबाजी स्पर्धामधील १० सर्वोत्तम गुण ग्राह्य धरून विश्वचषक अंतिम फेरीसाठी स्पर्धकांची निवड होते.

व्हिलर बेटाचे कलाम बेट म्हणून नामांतर

 • क्षेपणास्त्र चाचणीसाठी वापरले जाणारे व्हिलर बेटाचे (Wheeler Island) आता कलाम बेट (A P J Abdul Kalam Island)  म्हणून नामांतराची अधिकृत घोषणा ओडिशा सरकारने केली आहे. देशातील तरुणाईला हे बेट आपली शक्ती विकासकामासाठी वापरण्याकरिता सतत प्रेरणा देईल.
 • ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बीजू पटनायक यांच्या कार्यकाळात १९९३ मध्ये सरकारने व्हिलर बेट डीआरडीओच्या ताब्यात दिले. कलाम यांच्या नेतृत्वाखाली डीआरडीओने या बेटावर देशाच्या संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या विविध क्षमतेच्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरु केल्या.
 • ऑगस्ट महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम (८३) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने मेघालय येथे निधन झाले होते. कलाम यांना श्रद्धांजली म्हणून दिल्लीतील औरंगजेब रस्त्याचे नामकरण कलाम रोड असे करण्याच्या निर्णय स्थानिक पालिकेने घेतला. या नामांतरानंतर आता व्हिलर बेटाचे कलाम बेट असे नामांतर करण्यात आले आहे.
 • ओडिशाचे मुख्यमंत्री : नवीन पटनायक

भ्रष्टाचारच्या निपटाऱ्यासाठी आठ वर्षे : सीव्हीसी

  Central Vigilance Commission
 • सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्धची भ्रष्टाचार; तसेच शिस्तभंगाच्या प्रकरणांचा अंतिम निपटारा होण्यासाठी सरासरी आठ वर्षांचा कालावधी लागत असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) केलेल्या नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे.
 • भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतील तपास अहवालांवर फर्स्ट स्टेज अॅडव्हाइस (एफएसए) दिला जातो, तर सुनावणी पूर्ण करून अंतिम निकाल होण्यापूर्वी 'सेकंड स्टेज अॅडव्हाइस' (एसएसए) दिला जातो. दर वर्षी सुमारे पाच हजार प्रकरणांत हे अॅडव्हाइस मागविले जातात.
 • अनियमितता झाल्याच्या तारखेपासून भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रकरणांमध्ये अंतिम निपटारा होण्यासाठी सरासरी आठ वर्षे लागतात, तर अनियमिततेचा शोधण्यासाठी सरासरी दोन वर्षे लागतात.
 • तीन सदस्यांच्या समितीने हा अभ्यास केला आहे. निष्पाप अधिकाऱ्यांना त्रास होऊ नये, तसेच दोषी अधिकाऱ्यांना मोकळे रान मिळू नये यासाठी भ्रष्टाचार व अनियमिततेच्या प्रकरणांचा वेळेत निपटारा होण्याची गरज आहे, असे समितीने म्हटले आहे.

मालवाहतुकीच्या वाहनांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी सस्ताभाडा.कॉम

 • प्रवासी वाहतुकीसाठी बुक केल्या जाणाऱ्या वाहनांप्रमाणेच आता मालवाहतुकीच्या वाहनांचेही ऑनलाईन बुकिंग करता यावे यासाठी www.sastabhada.com या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर मालवाहतूक करणाऱ्या सर्व वाहतूक धारकांची नोंद करण्यात येणार आहे.  इंब्युलीयन्स इन्फोवेब कंपनीच्या मदतीने www.sastabhada.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. सस्ताभाडा या संकेतस्थळावरून ट्रक किवा टेम्पो बुक केल्यास गाडीच्या मालकासह वाहन बुक करणाऱ्या व्यक्तीलाही त्याचा फायदा होणाच्या विश्वास संकेतस्थळाच्या निर्मात्यांनी व्यक केला आहे.
 • इंब्युलीयन्स इन्फोवेब प्रायवेट लिमिटेडने यासाठी एक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या प्रणाली मुळे कोणतीही जीपीएस प्रणालीचा वापर न करता किवा वाहकाकडे कोणतेही साधन न देताही वाहने ट्रॅक होऊ शकतात. 
 • सध्या ही कंपनी राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, दिल्ली व महाराष्ट्र या राज्यांमध्ये कार्यरत आहे.

Sunday, September 06, 2015

चालू घडामोडी - ५ सप्टेंबर २०१५ [Current Affairs - September 5, 2015]

दिनविशेष

 • ५ सप्टेंबर : राष्ट्रीय शिक्षक दिन
  भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस

‘एक श्रेणी एक वेतन’ योजना लागू

  One Rank One Pension
 • तब्बल चार दशकांपासून रखडलेली माजी सैनिकांची ‘एक श्रेणी एक वेतन’ ची (वन रँक वन पेन्शन-ओआरओपी) मागणी मान्य करत संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी ही बहुप्रतिक्षित योजना लागू करण्याची ऐतिहासिक घोषणा केली.
 • समान पदावर आणि समान काळ काम करणाऱ्या व्यक्तीला समान निवृत्तीवेतन मिळावे. हे वेतन देताना निवृत्तीची तारीख विचारात घेतली जाऊ नये, अशी निवृत्त सैनिकांची मागणी होती.
 • गेल्या ४२ वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत दिले होते. मात्र, भाजप सत्तेवर येऊन १५ महिने उलटल्यानंतरही यावर काहीच निर्णय होत नसल्याचं पाहून माजी सैनिकांनी आंदोलन पुकारले होते.
 • चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर अखेर सरकारने ‘वन रँक वन पेन्शन’ ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला. संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी एका पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. या निर्णयामुळं देशाच्या तिजोरीवर दरवर्षी ८ ते १० हजार कोटींचा बोजा पडणार आहे.
 अशी लागू होईल योजना... 
 • १ जुलै २०१४ पासून लागू होणार ‘वन रँक वन पेन्शन’
 • २०१३ हे वर्ष या योजनेचे आधार वर्ष (बेस इयर) असेल.
 • दर पाच वर्षांनी एक सदस्य समितीद्वारे योजनेचा आढावा घेतला जाईल.
 • माजी सैनिकांना मागील थकीत पेन्शन पुढील दोन वर्षांत चार हप्त्यांमध्ये विभागून देणार.
 • शहीद व मृत सैनिकांच्या विधवांना थकबाकीची रक्कम एकरकमी देणार.
 • स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्या सैनिकांना ही योजना लागू होणार नाही.
 • निवृत्तीवेतनाच्या पुनर्मुल्यांकनासाठी एक सदस्यीय न्यायालयीन समिती नेमणार.
 निवृत्ती वेतनासाठीचे नियम 
 • सेवा निवृत्तिवेतन : अखेरच्या पगाराच्या ५० टक्के. (यासाठी अधिकारीपदावर असलेल्या व्यक्तीची २० वर्षे, तर त्या दर्जाखालील व्यक्तीची १५ वर्षे सेवा आवश्यक)
 • विशेष कुटुंब निवृत्तिवेतन (कर्तव्यावर असताना मृत्यू झाल्यास)  : अखेरच्या पगाराच्या ६० टक्के. कमीत कमी ७ हजार रुपये.
 • सामान्य कुटुंब निवृत्तिवेतन (व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास) : अखेरच्या पगाराच्या ३० टक्के. कमीत कमी ३,५०० रुपये
 • अपंग निवृत्तिवेतन (शंभर टक्के अपंग असल्यास) : अखेरच्या पगाराच्या ३० टक्के. कमीत कमी ३,१०० रुपये 
 • उदार कुटुंब निवृत्तिवेतन (अधिकारी अथवा जवान हुतात्मा झाल्यास) : अखेरच्या पगाराइतके.
 • युद्धजखमी निवृत्तिवेतन (युद्धात जखमी होऊन शंभर टक्के अपंगत्व आल्यास) : शेवटच्या पगाराइतके.
 माजी सैनिकांचा खालील धोरणांना विरोध 
 • सरकारने जाहीर केलेल्या धोरणानुसार ही योजना सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेणाऱ्यांना लागू होणार नाही. 
 • तसेच पाच वर्षांनी एक सदस्यीय समिती पेन्शनच्या रकमेत बदल करण्याबाबत विचार करणार आहे.
 • पेन्शन आढावा समितीला प्रत्येकवेळी सहा महिन्यांची मुदत देणार आहे.
 सैनिकांच्या मागण्या 
 • १ एप्रिल २०१४ पासून योजना लागू करावी.
 • चाळीस टक्के सैनिक सैन्य दलातून स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याने स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) घेणाऱ्यांना ओआरओपी लागू केलीच पाहिजे.
 • पेन्शनचा आढावा घेऊन रकमेत बदल करण्याबाबतचे निर्णय घेण्यासाठी तीन माजी सैनिक, एक कार्यरत सैनिक आणि एक सरकारी प्रतिनिधी अशी पाच जणांची समिती स्थापन करावी.
 • पेन्शन आढावा समितीला सहा ऐवजी एकाच महिन्याची मुदत द्यावी.
 • कोणत्याही परिस्थितीत ज्युनिअर सैनिकाला सिनिअर सैनिकापेक्षा जास्त पेन्शन देऊ नये.
सरकारच्या ‘वन रँक वन पेन्शन’ बाबतच्या धोरणात बदल होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे माजी सैनिकांच्या संघटनेने जाहीर केले आहे.

चौथ्या विश्व साहित्य संमेलनाला सुरुवात

  Fourth Vishva Marathi Sahitya Sammelan
 • ५ सप्टेंबर २०१५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या चौथ्या विश्व संमेलनाची सुरुवात पोर्ट ब्लेअर (अंदमान) येथे झाली.
 • स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमान येथे ‘विश्व साहित्य संमेलन’  भरविण्यात येणार आले आहे.
 • टोरंटोच्या विश्व साहित्य संमेलनासाठी ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर यांची निवड करण्यात आली होती. परंतु, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे या संमेलनासाठी प्रा. शेषराव मोरे यांची अध्यक्षपदी निवड झाली.
 चौथ्या विश्व साहित्य संमेलनाबद्दल... 
 • अध्यक्ष : प्रा. शेषराव मोरे
 • कालावधी : ५ व ६ सप्टेंबर २०१५
 • आयोजक : ‘ऑफबीट डेस्टिनेशन’ आणि ‘महाराष्ट्र मंडळ’
 • उद्घाटक : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
 • स्वागताध्यक्ष : खासदार राहुल शेवाळे
 • विशेष उपस्थिती : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, खासदार संजय राऊत, अंदमान निकोबारचे नायब राज्यपाल निवृत्त लेफ्टनंट जनरल ए. के. सिंह
संमेलनातील इतर कार्यक्रम
 • सावरकरांच्या ‘तेजस्वी तारे’ या पुस्तकावर आधारीत कार्यक्रम
 • निकोबारच्या आदिवासी मुलींचे नृत्य
 • सेल्युलर जेलच्या क्युरेटर डॉ. रशीदा इक्बाल, अर्चना हर्षे यांचे व्याख्यान
 • ‘मला उमगलेले सावरकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावरील परिसंवाद
 • उद्घाटनापूर्वी सेल्युलर जेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहादरम्यान सनई चौघड्याच्या निनादात, रांगोळीच्या पायघड्या अशा पारंपरिक पद्धतीने ग्रंथदिंडी काढली गेली.
यापूर्वीची विश्व मराठी साहित्य संमेलने
वर्ष
ठिकाण
अध्यक्ष
पहिले (२००९)
सॅनफ्रॅन्सिको
डॉ. गंगाधर पानतावणे
दुसरे (२०१०)
दुबई
मंगेश पाडगांवकर
तिसरे (२०११)
सिंगापूर
महेश एलकुंचवार

कॉलड्रॉपसाठी नुकसाभरपाई देण्याची ‘ट्राय’ची सूचना

  Telecom Regulatory Authority in India
 • मोबाइलवर कॉल सुरू असताना, तो अचानक मध्येच बंद होण्याची (कॉलड्रॉप) गंभीर दखल घेऊन दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) अशा सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकांना नुकसाभरपाई द्यावी, असे सुचवले आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कॉलड्रॉपविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर ‘ट्राय’ने एक सल्लापत्रक प्रसिद्ध केले असून, त्यावर २८ सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागवल्या आहेत.
 • सेवेची गुणवत्ता चांगल्या दर्जाची नसेल, तर अशा मोबाइल सेवा पुरवठादार कंपनीला ‘ट्राय’ दंड आकारते. एखाद्या मोबाइल नेटवर्कवरून केलेल्या एकूण कॉलपैकी कॉलड्रॉपचे प्रमाण २ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असे ‘ट्राय’चे म्हणणे आहे.
 • ‘ट्राय’ने सुचविल्यानुसार कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये. मात्र पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. अशी भरपाई देताना शेवटची पल्स गृहित धरण्यात येऊ नये.

पाकव्याप्त काश्मिरमध्ये पाच देशांच्या मदतीने प्रकल्प उभारणी

 • पाकव्याप्त काश्मिरातील मुझफ्फराबाद शहरातील विकासकामाच्या नावाखाली, पाकिस्तान सरकारने पाच देशांच्या माध्यमातून प्रकल्प उभारणी सुरू केली आहे. या पाच देशांमध्ये चीनबरोबरच दक्षिण कोरिया, सौदी अरेबिया, कुवेत आणि तुर्कस्तानचा समावेश आहे.
 • काश्मीर खोऱ्यात २००५मध्ये झालेल्या भूकंपामध्ये मुजफ्फराबादचे मोठे नुकसान झाले होते. त्याच्या पुनर्बांधणीसाठी या देशांची मदत घेण्यात आली आहे.
 • या शहरामध्ये चीनचे ३००० आणि दक्षिण कोरियाचे ३०० कामगार दाखलही झाले आहेत. या परिसरात जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहेत.
 • या प्रदेशामध्ये दक्षिण कोरियाने १०० मेगावॉटचे दोन, ८९ मेगावॉटचा एक जलविद्युत प्रकल्प पूर्ण केला आहे, तर चीनच्या मदतीने झेलम नदीवर ११०० मेगावॉटचा प्रकल्प पूर्ण करण्यात येत आहे. पाकिस्तानच्या प्रशासनाकडून नीलम-झेलम जलविद्युत प्रकल्प बांधण्यात येत आहे. ९६९ मेगावॉट क्षमतेचा हा प्रकल्प आहे.
 • या परिसरात सौदी अरेबिया विद्यापीठ बांधत असून, हे विद्यापीठ तात्पुरत्या स्वरूपात एका इमारतीत सुरू झाले आहे.

झुम्पा लाहिरी यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचे राष्ट्रीय मानवतावादी पदक

  Jhumpa Lahiri
 • पुलिस्त्झर पारितोषिक विजेत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका झुम्पा लाहिरी यांची अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय मानवतावादी पदकासाठी (National Humanities Medal) निवड करण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते लाहिरी यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.
 • मानवतावादी लेखनावर भर दिल्यामुळे लाहिरी यांची या पदकासाठी निवड करण्यात आली आहे. लाहिरी यांनी भारत अमेरिकेतील वितुष्ट आणि आपलेपणावर आधारित सुरेख लिखाण केल्याचे व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आले.
 • पहिले राष्ट्रीय मानवतावादी पदक १९९६ मध्ये प्रदान करण्यात आले होते. तेव्हापासून आतापर्यंत १७५ जणांना हे प्रतिष्ठेचे पदक देण्यात आले आहे. यापूर्वी भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांना हे पदक मिळाले आहे.
 झुम्पा लाहिरी यांच्याबद्दल... 
 • झुम्पा लाहिरी या भारतीय वंशाच्या अमेरिकन लेखिका आहेत. त्यांचा जन्म लंडनमध्ये एका बंगाली कुटुंबामध्ये झाला आहे.
 • या लेखिकेची इंटरप्रिटर ऑफ मालदीवज, द नेमसेक, द लोलॅंड इत्यादी पुस्तके भारतात आणि परदेशात ‘बेस्टसेलर’ ठरली आहेत.
 • त्यांना 'इंटरप्रीटर्स ऑफ मेलडीज' या पुस्तकासाठी 'कादंबरी' गटात पुलित्झर पुरस्कार इ.स. २००० मध्ये मिळाला. तसेच त्यांच्या 'द नेमसेक' या कादंबरीवर मीरा नायर यांनी चित्रपट बनवला आहे.

फिफाच्या क्रमवारीमध्ये भारत १५५व्या स्थानावर

 • फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीमध्ये भारताने एका स्थानाने आगेकूच केली असून भारत १५५व्या स्थानावर पोहोचले आहेत.
 • फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीमध्ये भारताला दोन सलग पराभवांचा सामना करावा लागला होता, त्यामुळे जुलै महिन्यामध्ये त्यांची १५६व्या स्थानावर घसरण झाली होती.
 • कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावलेला अर्जेटिनाचा संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर कायम आहे. बेल्जियमचा संघ दुसऱ्या स्थानावर असून विश्वविजेता जर्मनीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे.

ओडिशातील व्हिलर द्विपला डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव

 • जनतेचे राष्ट्रपती असलेल्या अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली म्हणून ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील व्हिलर द्विपचे नाव बदलून त्याला माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्याचा निर्णय ओडिशा सरकारने घेतला आहे.
 • बीजू पटनाईक यांनी १९९३ मध्ये कलाम यांच्या सांगण्यावरून व्हिलर द्विप संरक्षण मंत्रालयाच्या ताब्यात दिला होता.
 • व्हिलर बेट ओडिशा राज्याच्या किनारपट्टीवर चांदीपूरच्या दक्षिणेला सुमारे ७० किमी अंतरावर स्थित आहे. या बेटाचा वापर भारताच्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्यासाठी केला जातो.
 • ओडिशाचे मुख्यमंत्री : नवीन पटनाईक

सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन

 • सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे ५ सप्टेंबर २०१५ रोजी कॅन्सरच्या आजारामुळे निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. मागील काही वर्षांपासून त्यांना कॅन्सरच्या विकारानं ग्रासलं होतं.
 • आदेश श्रीवास्तव यांनी आपल्या संगीतच्या कारर्किदीत रसिकांच्या मनावर अधिराज्य केले.  ‘चलते चलते’, ‘बाबुल’, ‘बागबान’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘राजनीति’, ‘देव’ यासरख्या  जवळजवळ १०० चित्रपटास त्यांनी संगीत दिले आहे.