Header Ads

प्रश्नसंच - ३ [भूगोल]

प्र.१.  महाराष्ट्रात सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते ?

A. रायगड
B. रत्नागिरी
C. सिंधुदुर्ग
D. ठाणे


A.रायगड

प्र.२.  सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

A. झेलम
B. रावी
C. चिनाब
D. बियास


C. चिनाब

प्र.३.  भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला ?

A. उत्तर प्रदेश
B. केरळ
C. तामिळनाडू
D. महाराष्ट्र


B. केरळ

प्र.४.  देशातील सर्वात मोठे सुती वस्त्रोत्पादक राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. पश्चिम बंगाल
D. केरळ


A. महाराष्ट्र

प्र.५.  कोणत्या नदीला ट्रान्स हिमालयीन नदी असेही संबोधले जाते ?

A. गंगा
B. सतलज
C. सियाचिन ग्लेशियर
D. सिंधू

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 
B. सतलज

प्र.६.  खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] एकाच प्रकारचे खडक व त्यांची समान रचना असलेल्या भागात वृक्षाकार जलप्रणाली आढळते.
ब] जेथे मुख्य नदीला उपनद्या काटकोनात मिळतात तेथे आयताकार जलप्रणाली आढळते.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही


C. वरील दोन्ही

प्र.७.  खालील वने [गट १] आणि त्या संबंधित पर्जन्य प्रमाण [गट २] यांच्या योग्य जोड्या लावा.

[गट १]
अ] मान्सून वने.
ब] उष्ण कटिबंधीय सदाहरित वने.
क] उष्ण कटिबंधीय आद्र पानझडी वने.
[गट २] (सेमी)
I] २०१-२५०
II] २५१-३००
III] १०१-२००

पर्याय
A. अ-I, ब-II, क-III
B. अ-III, ब-II, क-I
C. अ-III, ब-I, क-II
D. अ-II, ब-I, क-III


A. अ-I, ब-II, क-III

प्र.८.  खालील विधाने लक्षात घ्या व अयोग्य विधाने ओळखा.

अ] मारवाड पठार खनिज समृद्ध आहे.
ब] द्वीपकल्पीय भारतात भूकंप होत नाहीत.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही 


D. वरीलपैकी एकही नाही

प्र.९.  खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.

अ] बंगळूरला मंगलोरपेक्षा अधिक पाऊस पडतो.
ब] बंगळूरला नैऋत्य मौसमी वारे व परतीच्या पावसाचा फायदा मिळतो.

A.फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही


B. फक्त ब

प्र.१०.  विधान :- अ] उत्तर व वायव्य भारतात डिसेंबर-जानेवारी महिन्यात कधी कधी पाऊस पडतो.
स्पष्टीकरण :- ब] नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास हिवाळ्यात चालू होतो.

पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे,
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर


B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.