प्रश्नसंच - ६८ [इतिहास]

प्र १.}  भारतीय शिक्षणाचा मॅग्ना चार्ट कशाला म्हणतात ?

A. राधाकृष्णन आयोग
B. हंटर आयोग
C. वूड्सचा खलिता
D. मॅकोलेचा सिद्धांत


C. वूड्सचा खलिता

प्र २.}  भारतीय राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली ?

A. राजा राममोहन रॉय
B. म.गो.रानडे
C. लोकमान्य टिळक
D. गोपाळ कृष्ण गोखले


B. म.गो.रानडे

प्र ३.}  योग्य विधाने ओळखा.

अ] कुतुबुद्दीन ऐबक हा तुर्की गुलाम होता.
ब] चौगन हा खेळ खेळत असताना घोड्यावरून पडून त्याचा मृत्यू झाला.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. एकही नाही


C. वरील दोन्ही

प्र ४.}  १८७२च्या नागरी विवाह कायद्याद्वारे विवाहप्रसंगी मुलींचे वय कमीत कमी किती ठरविण्यात आले ?

A. १६ वर्षे
B. १२ वर्षे
C. १४ वर्षे
D. १८ वर्षे


C. १४ वर्षे

प्र ५.}  तराईची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली ?

A. ११९०
B. ११९१
C. ११९२
D. ११९३


B. ११९१

प्र ६.}  नालंदाच्या प्रसिद्ध बौद्ध विहारांचा विध्वंस कोणी केला?

A. कुतुबुद्दीन ऐबक
B. याल्दुज
C. बख्तियार खिलजी
D. घियासुद्दिन खिलजी


C. बख्तियार खिलजी

प्र ७.}  ख्रिश्चन धर्मप्रचारकांनी स्त्री शिक्षणाच्या उद्देशाने सर्वप्रथम १८१९मध्ये कोणती संस्था स्थापन केली?

A. एल्फिन्स्टन कॉलेज
B. सेंट जॉर्ज ख्रिश्चन मिशन
C. कलकत्ता युवा स्त्री संस्था
D. मुंबई युवा स्त्री शिक्षण संस्था


C. कलकत्ता युवा स्त्री संस्था

प्र ८.}  कलकत्ता युवा शिक्षण संस्थेच्या कार्याचा भार खालीलपैकी कोणी उचलला?

A. जे.इ.डी.बेथून
B. हेनरी कॉटन
C. ईश्वरचंद्र विद्यासागर
D. राजा राममोहन रॉय


A. जे.इ.डी.बेथून

प्र ९.}  महंमद गझनीच्या दरबारी इतिहासकार कोण होता ?

A. उत्बी
B. फिरदौसी
C. अल-बरुनी
D. मिन्हास सिराज


A. उत्बी

प्र १०.}  भारतात कोणत्या ठिकाणी अरबांनी प्रथम राज्य स्थापन केले ?

A. मुलतान
B. सिंध
C. पंजाब
D. राजस्थान


B. सिंध
Previous Post Next Post