जम्मू-काश्मीरसाठी ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा
- नव्या काश्मिरच्या पुनर्निर्माणाची सुरवात असल्याचे आणि हा शेवट नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरसाठी तब्बल ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.
- गेल्या वर्षी खोऱ्यातील पुराच्या आपत्तीनंतर राज्याला भेट दिली होती.
- दरम्यान, या दौऱ्यात मोदींच्या हस्ते उधमपूर-रामबान तसेच रामबान-बानिहाल या ४ हजार ३०६ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गांचा कोनशिला समारंभ झाला.
- त्याचप्रमाणे त्यांनी रामबान जिल्ह्यातील वीज प्रकल्पाचे उद्घाटनही केले.
- जम्मू-काश्मीरला देण्यात आलेल्या ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधून पश्चिम पाकिस्तानातून आलेल्यांचे आणि काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन होणार.
- त्याशिवाय भारतीय राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या स्थापन करणार असून, यातून ४ हजार युवकांना रोजगार मिळेल.
वन रॅंक वन पेन्शन" योजनेची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना जारी
- बहुप्रतिक्षित "वन रॅंक वन पेन्शन"योजनेची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे.
- निवृत्त सैनिकांसाठीच्या या योजनेची अंमलबजावणी दिवाळीपूर्वी करण्याची घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली होती.
- केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वीच ही योजना जाहीर केली होती.
- मात्र, सरकारने जाहीर केलेल्या योजनेमध्ये अद्यापही त्रुटी असल्याचे कारण सांगत काही निवृत्त सैनिकांनी अद्यापही आंदोलन सुरूच ठेवले आहे.
भारत चीनपेक्षा कमी भ्रष्ट देश
- अठरा वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत चीनपेक्षा कमी भ्रष्ट देश ठरला आहे.
- भ्रष्टाचारविरोधी "ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल" या संस्थेने केलेल्या वार्षिक पाहणीतून हे स्पष्ट झाले.
- या संस्थेने जगातील १७५ देशांमध्ये पाहणी करून क्रमवारी तयार केली होती.
- त्यानुसार भारत ८५व्या स्थानी असून, चीनला शंभरावे स्थान मिळाले आहे.
- या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या भ्रष्टाचार पूर्वानुमान निर्देशांकानुसार डेन्मार्क (९२०)हा सर्वात कमी भ्रष्ट देश असून, सोमालिया आणि उत्तर कोरिया सर्वांत भ्रष्ट देश ठरले आहेत.
ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
- भारतीय लष्कराने आज जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली.
- या चाचणीमुळे पुन्हा एकदा ब्राह्मोसची मारक क्षमता स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
- मोबाईल ऍटोनॉमस लॉंचरच्या (माल) माध्यमातून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले.
- या क्षेपणास्त्राने लष्कराने निश्चित केलेली सर्व उद्दिष्ट्ये प्राप्त केली आहेत.
- सध्या भारतीय लष्कराच्या शस्त्रागारामध्ये तीन ब्राह्मोस क्षेपणास्त्रे असून ती सर्व ब्लॉक -३ श्रेणीमधील आहेत.
- त्यांची या वर्षी ८ आणि ९ मे रोजी चाचणी घेण्यात आली होती.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र मध्ये भारतीय लष्करात दाखल झाले होते.