चालू घडामोडी -२१,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 21, 2015]

‘गुगल‘ने दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातील चेतन कक्कर नोकरी देऊ केली


  • लोकप्रिय सर्च इंजिन ‘गुगल‘ने दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातील (डीटीयू) चेतन कक्कर या विद्यार्थ्याला तब्बल1 कोटी 27 लाख रुपयांच्या वार्षिक वेतनाची नोकरी
  • विद्यापीठाच्या इतिहासातील हा नवा विक्रम ठरला आहे.
  • यापूर्वी विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला 93 लाख रुपयांचे वार्षिक वेतन मिळाले होते.
  • २०१६ मध्ये त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तो कॅलिफोर्नियातील "गुगल"मध्ये रूजू होईल.

कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करावी लागणार

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, तरी त्याची अंमलबजावणी राज्यात लगेच होणार नाही.
  • राज्याच्या आर्थिक परिस्थितीत उत्पन्नाचे स्रोत आणि त्याचा तिजोरीवर पडणारा भार या बाबी तपासण्यासाठी राज्य सरकारला समिती स्थापन करावी लागणार आहे.
  • त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एक किंवा दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे वित्त विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
  • राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी १९९६ रोजी पाचवा वेतन आयोग लागू करण्यात आला.
  • सन २००६ साली सहावा आणि आता येत्या १ जानेवारी२०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
  • परंतु वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यापूर्वी राज्याची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाचे स्रोत, तिजोरीवरील अतिरिक्‍त ताण या बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन केली जाते.
  • सहावा वेतन आयोग लागू करताना हकीम समितीची नेमणूक करण्यात आली होती.
  • याच धर्तीवर आताही समिती नेमण्यात येणार आहे.
  • या समितीचा अहवाल मिळण्यासाठी वर्ष-दीड वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे.
  • या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारी २०१६ पासून राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वाती दांडेकर यांची एडीबी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

  • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकी राजकीय नेत्या स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
  • या पदाचा दर्जा राजदूताप्रमाणे असल्याचे मानले जाते.
  • ६४ वर्षीय स्वाती दांडेकर आता२०१० पासून बॅंकेचे कार्यकारी संचालक असलेले रॉबर्ट एम. आर. यांची जागा घेतील.
  • राज्य प्रतिनिधी सभेच्या सदस्य बनलेल्या स्वाती या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकी नागरिक आहेत.
  • ओबामा यांनी अन्य प्रशासकीय नियुक्‍त्यांबरोबरच अमेरिकेतील आशियाई विकास बॅंकेच्या मुख्य पदासाठी स्वाती यांच्या निवडीची घोषणा केली.
  • कनिष्ठ सभागृहासाठी झालेली निवडणूक जिंकणाऱ्या स्वाती या भारतात जन्मलेल्या पहिल्या अमेरिकी नागरिक आहेत.
  • त्यांनी २००३ ते २००९ या कालावधीत राज्याच्या प्रतिनिधी सभागृहात सदस्य म्हणून काम केले आहे.
  • त्याशिवाय२००९ ते २०११ या काळात त्या राज्य सीनेटच्याही सदस्य होत्या.

"भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने"ला मंजुरी

  • राज्यातील१६ आदिवासी जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणाऱ्या "भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने"ला गत आठवड्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून ही योजना येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
  • अनुसूचित क्षेत्रातील आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे.
  • या पार्श्वभूमीवर या स्त्रियांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत चौरस आहार देण्यात येणार आहे.
  • यासाठी अंगणवाडी सेविका आपापल्या क्षेत्रातील गरोदर तसेच स्तनदा मातांची यादी तयार करतील.
  • गावपातळीवर ग्रामसभेकडून आहार समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार.
  • या समितीवर एक गरोदर महिला तसेच स्तनदा मातेचीही निवड करण्यात येणार आहे.
  • गहू तांदूळ, अंडी, सोयाबिन, हिरव्या पालेभाज्या, आयोडिनयुक्त मीठ, गूळ आदींची खरेदी ही सीमती करणार आहे. याशिवाय लाभार्थ्यांची उपस्थिती, आहाराचा दर्जा, स्वच्छता यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या समितीवर राहील.

‘आयएमएफ’ने कृत्रिम चलनाची निर्मिती केली

  • परदेशांशी व्यापार करण्यासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी ‘आयएमएफ’ला परकी चलनसाठा निर्माण करण्याची आवश्‍यकता भासली.
  • त्यामुळे ‘आयएमएफ’ने कृत्रिम चलनाची निर्मिती केली.
  • याला ‘स्पेशल ड्रॉयिंग राइट्‌स’ (एसडीआर) म्हटले जाते.
  • एसडीआरमध्ये जगभर ‘मुक्तपणे वापरण्यायोग्य’ चलनांचा समावेश करण्यात आला.
  • सध्या त्यात अमेरिकी डॉलर, युरो, पाउंड आणि जपानी येन या चार चलनांचा समावेश आहे.
  • आता या चार चलनांमध्ये युआनचा समावेश करण्याचा प्रस्ताव चीनने आयएमएफपुढे ठेवला आहे.
  • आयएमएफनेदेखील सध्या तरी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. आयएमएफमार्फत चलनांचा पंचवार्षिक आढावा घेतला जातो.
  • चालू वर्षाच्या शेवटी वर्षाच्या ‘एसडीआर’चा कालावधी संपत असल्याने 30 नोव्हेंबरला बैठक होणार आहे.
  • आयएमएफच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मते पडली तर युआनचा एसडीआरमध्ये समावेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • तसे झाल्यास कर्जरचनेत देखील बदल होणार आणि याचा फायदा ग्रीसला देखील होण्याची शक्‍यता आहे.
  • ग्रीस अधिक कर्ज मिळवू शकतो.
  • सध्या ग्रीसवर रु.११.१४ लाख कोटींचे कर्ज आहे, जे त्यांच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १७६ टक्के आहे.

आधार कार्डाची मदत घेऊन सार्वजनिक वितरण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आधार कार्डाची मदत घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी एक नवी पद्धती सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
  • सरकारी योजनेचे लाभार्थी ओळखण्यासाठी २०१६ पर्यंत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानात आधार कार्डावर आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन पद्धत अवलंबविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर केंद्र सरकारने काम सुरू केले आहे.
  • राज्य सरकारच्या मदतीने केंद्राने दिल्लीतील४४ दुकानांसह देशातील ५०हजार वितरण केंद्रावर बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन पद्धत (जैविक वैशिष्ट्यावरुन ओळख पटविण्याचे तंत्र) कार्यान्वित केली आहे.
  • देशात सुमारे ५लाख स्वस्त धान्य दुकाने आहेत.
  • डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत देशातील सर्व धान्य वितरण केंद्रावर बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन पद्धत सुरू करण्यासाठी संगणकीय यंत्रणा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

नासाच्या वैज्ञानिकांचे संशोधन

  • पृथ्वीबाहेर जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्याच्या हेतूने नासाच्या वैज्ञानिकांनी रसायने ओळखणारा केमिकल लॅपटॉप विकसित केला असून तो सहज कुठेही नेता येण्यासारखा आहे.
  • त्याच्या मदतीने अवकाशात कुठेही असलेली अमायनो आम्ले व मेदाम्ले ओळखता येतात.
  • नासाच्या कॅलिफोíनयातील पॅसेडेनात असलेल्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत या लॅपटॉपची निर्मिती सुरू आहे.
  • या लॅपटॉपच्या मदतीने अवकाशातील रासायनिक नमुन्यांचे विश्लेषण करता येते.
  • नासाच्या जेसिका क्रीमर यांनी सांगितले की, हा लॅपटॉप अवकाशात पाठवला जाणार असून आतापर्यंत पृथ्वीवरून पाठवण्यात आलेले ते सर्वात संवेदनशील यंत्र असणार आहे, ते अमायनो आम्ले व मेदाम्ले यांचे विश्लेषण करू शकेल.
  • स्टार ट्रेकमधील ट्रायकॉर्डरप्रमाणे हा लॅपटॉप असणार असून तो आकाराने लहान असणार आहे.
  • कालांतराने हा लॅपटॉप मंगळ ग्रह किंवा युरोपा उपग्रहावरही पाठवता येईल.
  • नेहमीच्या लॅपटॉपइतका त्याचा आकार असला तरी त्याची जाडी मात्र अधिक आहे कारण रासायनिक विश्लेषणासाठी ती जागा आवश्यक आहे.
  • हा रासायनिक लॅपटॉप मात्र रसायनांचे विश्लेषण करणार आहे.

सीरिया, इराकमधून येणाऱ्या शरणार्थीना प्रतिबंध करणारे विधेयक अमेरिकेत मंजूर

  • रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या अमेरिकी प्रतिनिधिगृहात सीरिया व इराकमधून येणाऱ्या शरणार्थीना अमेरिकेत प्रवेश देणे तूर्त थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
  • या शरणार्थीना पॅरिस हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर कठोर तपासणीशिवाय देशात प्रवेश देऊ नये अशी भूमिका यात घेण्यात आली आहे.
  • अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी हे विधेयक नाकारण्याचा इशारा देऊनही ते संमत झाले आहे.
  • इराक व सीरियातून येणाऱ्या शरणार्थीना तूर्त प्रवेश बंदी व त्यांच्यावर कडक तपासणी र्निबध लादणारे हे विधेयक २८९ विरूद्ध १३७ मतांनी मंजूर झाले आहे.

मानवी हक्कांच्या पायमल्लीबाबत उत्तर कोरियाविरोधात ठराव मंजूर

  • उत्तर कोरियात मानवी हक्कांचे जे उल्लंघन होत आहे त्याचा निषेध करणारा ठराव विक्रमी बहुमताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मंजूर करण्यात आला आहे.
  • आता आमसभेच्या पूर्ण अधिवेशनात त्यावर पुढील महिन्यात मतदान होणार आहे.
  • बाकी जगापासून स्वत:ला वेगळे ठेवणाऱ्या उत्तर कोरियात मोठय़ा प्रमाणात मानवी हक्क उल्लंघन होत आहे.
  • त्याबाबतचा ठराव ११२ देशांच्या पाठिंब्याने मंजूर झाला आहे. गेल्यावर्षी तो १११ मतांनी मंजूर झाला होता.
Previous Post Next Post