PSI पूर्व परीक्षा - चालू घडामोडीवरील प्रश्नोत्तरे - भाग १ [PSI Pre Exam - Current Affairs]

२० जून २०१० ला झालेल्या PSI पूर्व परीक्षेतील चालू घडामोडीवरील प्रश्नांची उत्तरे व त्या अनुषंगाने इतर माहिती ( भाग -१ )

  • आय.पी.एल 2009 चा विजेता संघ कोणता? ---> डेक्कन चार्जर्स हैदराबाद
  • आय.पी.एल 2008 चा विजेता --> राजस्थान रॉयल्स
  • आय.पी.एल 2010 चा विजेता --> चेन्नई सुपरकिंग्स
  • आशिया खंडातील सर्वात लांब रेल्वे बोगदा या जिल्यात आहेत?--> रत्नागिरी (करबुडे :लांबी 6 .5 कि.मी.)
  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची करणे शोधण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष -->डॉ. नरेंद्र जाधव 
  • राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषणा :-->डॉल्फिन
  • यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुठे आहे--> नाशिक
  • (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ : नागपूर ;
    कर्मयोगी गाडगे महाराज विद्यापीठ : अमरावती ;
    स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ: नांदेड)
  • दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष : मंगेश पाडगावकर
    (ठिकाण :दुबई )
    तिसरे लंडन येथे होणार आहे. 
  • भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : शिव शंकर मेनन (4 थे सुरक्षा सल्लागार)
    या पूर्वी एम. के. नारायणन होते. ते सध्या प. बंगालचे राज्यपाल आहेत .
  • स्वाईन फ्लू ची साथ 2009 मध्ये सर्वप्रथम कोणत्या देशात सुरु झाली..> मेक्सिको
    स्वाईन फ्लू --> H1N1
    बर्ड फ्लू --- > H5N1
  •  स्वाईन फ्लचा  भारतातील पहिला रुग्ण कोठे सापडला -->हैदराबाद
  • कानू सन्याल कशाशी संबधित होते?---> कष्टकरी -कामगार चळवळ (साम्यवादी विचारसरणीचे कानू सन्याल हे नक्षलबारी येथील उठावाचे प्रमुख नेते होते . हीच चळवळ पुढे नक्षलवादी चळवळ बनली. त्यांनी अलीकडेच आत्महत्या केली .)
  • भोपाळ येथील कारखान्यातील मिथिल आयसो साईनाईड च्या विषारी वायुगळतीमुळे हजारोंचे बळी गेले.
    (1984 ला झालेली दुर्घटना. संबधित कंपनी: युनियन कार्बाइड इंडिया लिमिटेड .- कीटकनाशक बनवारणी कंपनी .
    प्रमुख :वार्रेन अंडरसन)
  •   हॉकी विश्वचषक सलामी सामन्यात ......या खेळाडूवर 3 सामन्यांची बंदी घातली गेली --> शिवेंद्र सिंग
    (हॉकी विश्वचषक स्पर्धा संपन्न झाली : नवी दिल्ली येथे.
    भारताचे स्थान : 8 वे.
    विजेता संघ : ऑस्ट्रेलिया; उपविजेता संघ: जर्मनी
Previous Post Next Post