Header Ads

प्रश्नसंच - १३ [इतिहास]

प्र.१.  'सुर्यसिद्धांताचा' निर्माता कोण होता ?

A. वराह मिहिर
B. चरक
C. सुश्रुत
D. आर्यभट्ट


D. आर्यभट्ट

प्र.२.  जगप्रसिद्ध वेरुळचे दगडात खोदलेले कैलास मंदिर कोणत्या राजवटीत बांधले गेले ?

A. राष्ट्रकुट
B. चालुक्य
C. होयसाळ
D. चोल


A. राष्ट्रकुट

प्र.३.  भारतात दशमान पद्धतीचा विकास इसवी सनाच्या कोणत्या शतकात झाला ?

A. पाचव्या शतकात
B. सहाव्या शतकात
C. आठव्या शतकात
D. नवव्या शतकात


A. पाचव्या शतकात

प्र.४.  'विक्रमशीला' विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?

A. गोपाल
B. धर्मपाल
C. वदनपाल
D. देवपाल


B. धर्मपाल

प्र.५. भारताला भेट देणारा 'मार्को पोलो' हा प्रवासी कोणत्या देशाचा होता ?

A. चीन
B. पोर्तुगाल
C. इटली
D. फ्रांस


C. इटली

प्र.६.  'तमिळ रामायण' कोणी लिहिले ?

A. अप्पर
B. कंबन
C. रामानुज
D. शक्किरर


B. कंबन

प्र.७.  खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] दंतीदुर्ग हा राष्ट्रकुट घराण्याचा संस्थापक होता.
ब] महाराष्ट्रीतील पैठण हि राष्ट्रकुटांची राजधानी होती.

पर्याय
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


A. फक्त अ योग्य

प्र.८.  रामानुज खालीलपैकी कोणत्या मंदिराचे मुख्य पुजारी होते ?

A. द्वारका
B. शृंगेरी
C. पुरी
D. श्रीरंगम


D. श्रीरंगम

प्र.९.  खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] भीम दुसरा हा गुजरात राज्याचा शासक होता.
ब] भीम दुसरा याने महंमद घोरीचा पराभव केला.

पर्याय
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

प्र.१०. शंकराचार्य यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अध्यात्मिक केंद्राची स्थापना केली ?

अ] बद्रीनाथ ब] पुरी क] मथुरा
ड] द्वारका इ] उज्जैन फ] शृंगेरी

पर्याय
A. अ, ब, क आणि ड
B. ब, क, ड आणि इ
C. अ, क, इ आणि फ
D. अ, ब, ड आणि फ


D. अ, ब, ड आणि फ