प्रश्नसंच - १८ [भूगोल]

प्र.१}  सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे ?

A. पंजाब
B. जम्मू काश्मीर
C. हिमाचल प्रदेश
D. उत्तराखंड


A. पंजाब

प्र.२}  कोणत्या नदीच्या वायव्येस पंजाब हिमालय पसरला आहे ?

A. सिंधू
B. सतलज
C. चिनाब
D. रावी


B. सतलज

प्र.३}  हेमवती, सिरपा, लोकपावनी, सुवर्णावती या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत ?

A. कावेरी
B. कृष्णा
C. गोदावरी
D. इरावती


A. कावेरी

प्र.४}  जारवा हि जमात कोठे आढळते ?

A. निकोबार
B. छोटे अंदमान
C. अरुणाचल प्रदेश
D. लक्षद्वीप


B. छोटे अंदमान

प्र.५} खालील नद्यांचे खोरे त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लावा.

अ] गंगा नदी खोरे
ब] महानदी खोरे
क] कृष्णा नदी खोरे
ड] नर्मदा नदी खोरे

पर्याय
A. अ-ब-क-ड
B. अ-क-ब-ड
C. अ-क-ड-ब
D. ड-ब-क-अ


B. अ-क-ब-ड

प्र.६} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.

अ] ऑस्ट्रेलियाकडून भारताला खाद्यतेलाची आयात करावी लागते.
ब] महाराष्ट्र व पश्चिम बंगाल हे वृत्तपत्रांच्या कागद निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.

पर्याय
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


C. दोन्ही योग्य

प्र.७}  खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.

अ] रावतभाटा हा औष्णिक विद्युत प्रकल्प राजस्थान राज्यात आहे.
ब] कुदनकुलम प्रकल्पाला अमेरिकेचे सहाय्य लाभले आहे.

पर्याय
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


D. दोन्ही अयोग्य

प्र.८} खालीलपैकी कोणते वृक्ष हिमालयात आढळत नाहीत ?

अ] फर
ब] महोगनी
क] स्प्रुस

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. फक्त क
D. वरील सर्व


B. फक्त ब

प्र.९} कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या वनांशी संबंधित आहे ?

A. उष्णकटिबंधीय आर्द्र वने
B. उष्ण निम वाळवंटी वने
C. उष्णकटिबंधीय शुष्क वने
D. उष्णकटिबंधीय उपआर्द्र वने


D. उष्णकटिबंधीय उपआर्द्र वने

प्र.१०} उष्णप्रदेशीय पानझडी वनांच्या बाबतीत अयोग्य विधान निवडा.

अ] या वनांत साग, साल, पळस हे वृक्ष आढळतात.
ब] २०० सेमी पर्यंत पाउस पडतो.
क] यांना "मौसमी वने" असेही म्हणतात.
ड] जहाजबांधणीसाठी यांचा उपयोग होतो.

पर्याय
A. अ अयोग्य
B. ब अयोग्य
C. अ, ब आणि क  अयोग्य
D. वरीलपैकी एकही नाही.


D. वरीलपैकी एकही नाही.
Previous Post Next Post