Header Ads

प्रश्नसंच - ७ [अर्थशास्त्र]

प्र.१.  रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पतनियंत्रणाचे गुणात्मक साधन कोणते ?

A. नैतिक समजावणी
B. रिव्हर्स रेपो दर
C. बँकदर
D. रेपो दर


A. नैतिक समजावणी

प्र.२. १९७० साली कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार भारताने प्रथमच निर्यात धोरण जाहीर केले ?

A. एस.चक्रवर्ती समिती
B. नरसिंहन समिती
C. मुदलियार समिती
D. राजा चेलय्या समिती


C. मुदलियार समिती

प्र.३.  विकसनशील देशांमध्ये मुख्यत्वे कोणत्या प्रकारची बेरोजगारी आढळते ?

A. संरचनात्मक बेरोजगारी
B. खुली बेरोजगारी
C. हंगामी बेरोजगारी
D. प्रच्छन्न बेरोजगारी


A. संरचनात्मक बेरोजगारी

प्र.४.  संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) १९९३ साली कोणत्या दोन योजनांचे एकत्रीकरण करून सुरु करण्यात आली ?

A. इंदिरा आवास योजना + जवाहर रोजगार योजना
B. जवाहर ग्रामसमृद्धी योजना + पंतप्रधान रोजगार योजना
C. जवाहर ग्रामसमृद्धी योजना + आश्वासित रोजगार योजना
D. जवाहर रोजगार योजना + आश्वासित रोजगार योजना


C. जवाहर ग्रामसमृद्धी योजना + आश्वासित रोजगार योजना

प्र.५.  भारत निर्माण योजना खालीलपैकी कोणत्या धोरणावर आधारित आहे ?

A. शहरीकरण घडवूया
B. खेड्याकडे एक पाऊल
C. इंडिया शायनिंग
D. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रगती घडवूया

उत्तरासाठी येथे क्लिक करा. 
B. खेड्याकडे एक पाऊल

प्र.६.  राजकोषीय तुट म्हणजे काय ?

A. महसुली जमा वजा भांडवली जमा
B. भांडवली जमा वजा महसुली जमा
C. सरकारवर कर्जे निर्माण करणारी जमा
D. वरीलपैकी एकही नाही


C. सरकारवर कर्जे निर्माण करणारी जमा

प्र.७.  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक हि महाराष्ट्रात शिखर बँक आहे तिचे प्रादेशिक कार्यालय कोठे नाही ?

A. लातूर
D. औरंगाबाद
C. पुणे
D. नागपूर


B. अ आणि ब

प्र.८. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेअंतर्गत दर १० वर्षांनी केले जाणारे सर्वेक्षण कोणते आहे ?

A. ग्राहक खर्च संरक्षण
B. सामाजिक उपभोग सर्वेक्षण
C. जमीन व प्राणीजीव सर्वेक्षण
D. रोजगार व बेरोजगारी सर्वेक्षण


A. ग्राहक खर्च संरक्षण

प्र.९.  NSDL व CDSL संबंधी योग्य पर्याय निवडा.

A. वस्तू रोखे बाजार
B. डिपॉझिटरी
C. नवरोखे बाजार
D. गृहनिर्माण संस्था


B. डिपॉझिटरी

प्र.१०.  चलनवाढीसंबंधी खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा.

अ] चलनाची खरेदीशक्ती कमी होते.
ब] रोजगार निर्मिती क्षमता कमी होते.
क] धनकोंना याचा फायदा तर ऋणकोंना तोटा होता.
ड] वस्तू व सेवांची मागणी वाढते.

पर्याय
A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. फक्त क आणि ड
D. वरील सर्व


B. फक्त ब आणि क