Header Ads

प्रश्नसंच - ४५ [पंचायत राज]

प्र १.} स्थानिक स्वराज्य संस्था सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. उत्तर प्रदेश
C. मध्य प्रदेश
D. राजस्थान


D. राजस्थान

प्र २.} द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. वसंतराव नाईक समिती
B. अशोक मेहता समिती
C. बलवंतराय मेहता समिती
D. एन.डी.चेलय्या समिती


B. अशोक मेहता समिती

प्र ३.} त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला बलवंतराय मेहता समितीने जास्त महत्व दिले ?

A. जिल्हा परिषद
B. ग्रामपंचायत
C. पंचायत समिती
D. ग्रामसभा


C. पंचायत समिती

प्र ४.} त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला वसंतराव नाईक समितीने जास्त महत्व दिले ?

A. जिल्हा परिषद
B. ग्रामपंचायत
C. पंचायत समिती
D. ग्रामसभा


A. जिल्हा परिषद

प्र ५.} 'पंचायत राजच्या विकासासाठी पंचायत समितीचे अस्तित्व आवश्यक आहे. त्यामुळे ती बरखास्त करण्यात येऊ नये' अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. बलवंतराय मेहता समिती
B. पी.बी.पाटील समिती
C. ल.ना.बोंगिरवार समिती
D. वसंतराव नाईक समिती


C. ल.ना.बोंगिरवार समिती

प्र ६.} 'ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे नियंत्रण असावे' अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. बलवंतराय मेहता समिती
B. पी.बी.पाटील समिती
C. ल.ना.बोंगिरवार समिती
D. वसंतराव नाईक समिती


A. बलवंतराय मेहता समिती

प्र ७.} ‘सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे असू नये’ अशी शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. अशोक मेहता समिती
B. बलवंतराय मेहता समिती
C. हनुमंतय्या समिती
D. वसंतराव नाईक समिती


A. अशोक मेहता समिती

प्र ८.} न्यायपंचायत संपुष्टात आणण्याची शिफारस कोणत्या समितीने केली ?

A. बाबुराव काळे समिती
B. ल.ना.बोंगिरवार समिती
C. पी.बी.पाटील समिती
D. एल.एम.सिंघवी समिती


B. ल.ना.बोंगिरवार समिती

प्र ९.} ला.ना.बोंगिरवार समितीच्या शिफारशीबाबत खालील विधाने लक्षात घ्या.

अ] ५०० पेक्षा कमी लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करू नये.
ब] नियोजन कार्यासाठी उपमुख्य कार्यकारी हे पद निर्माण करण्यात यावे.
वरीलपैकी कोणती शिफारस ला.ना.बोंगिरवार समितीने केली नाही?

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. वरीलपैकी एकही नाही


D. वरीलपैकी एकही नाही

प्र १०.} प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्याशिफारसी केल्या होत्या ?

अ] पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा या स्तराला जास्त महत्व असावे.
ब] ग्रामसभेच्या वर्षातून किमान २ बैठका व्हाव्यात.
क] ग्रामपंचायतीचे सदस्य हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असावे.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त अ व ब
C. फक्त अ व क
D. वरील सर्व


D. वरील सर्व