Header Ads

चालू घडामोडी - २० जून २०१५ [Current Affairs - June 20, 2015]

२१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिन | जागतिक पितृदिन | आंतरराष्ट्रीय संगीत दिन

२१ जून : आंतरराष्ट्रीय योग दिन

  International Yoga Day Logo
 • निरोगी जीवनासाठी योगाचा प्रचार व प्रसार करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्याचे जाहीर केले आहे. याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. 
 • यानिमित्ताने आयुष मंत्रालयाने प्राणायाम व ध्यान यांचा समावेश असलेला ३३ मिनिटांचा अभ्यासक्रम तयार केला आहे.
 • योग दिनाचे ध्येय व उद्दिष्ट्ये :
  • सर्व जनतेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे आणि जीवन योगमय करणे हेच या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट आहे. समाजातील सर्व थरांपर्यंत योगाचा प्रचार व प्रसार योग्य पद्धतीने करणे, आवश्यक आहे.
  • जनतेमध्ये योगाचा प्रचार व प्रसार करणे आणि त्याचे फायदे जाणून घेणे.
  • शारीरिक आणि मानसिक क्षमता योगमार्गाने वाढविणे.
  • आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करणे.

उमेदवारांचे छायाचित्रही दिसणार मतदान यंत्रांवर

 • देशातील मतदानप्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी तसेच मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी यापुढे मतदान यंत्रणामध्ये उमेदवारांच्या नावापुढे पक्षाचे चिन्ह तसेच छायाचित्रही देण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. 
 • अशा प्रकारचा प्रयोग सर्वप्रथम केरळ, मध्य प्रदेश, मेघालय, तामिळनाडू आणि त्रिपुरा येथे २७ जून रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीदरम्यान करण्यात येणार आहे. 
 • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. मतदान यंत्रणांवर उमेदवारांचे आणि उमेदवारांच्या पक्षाचे चिन्ह यामध्ये उमेदवाराचे छायाचित्र देण्यात येणार आहे.

नेमारवर ‘कोपा अमेरिका’मध्ये बंदी

  Neymar
 • ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेत कोलंबियाविरुद्ध लढतीत ब्राझीलचा पराभव झाला होता. हा सामना संपल्यानंतर कोलंबियासाठी विजयी गोल करणारा मुरिलो याला नेमारने ढुशी दिली होती.
 • या घटनेनंतर समोर आलेल्या पुराव्यांवरून शिस्तपालन समितीने नेमारवर कडक कारवाई करत ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी बंदी घातली. (सुरवातीला नेमावर एका सामन्याची बंदी घातली होती.)
 • याच घटनेनंतर नेमारला रोखताना कोलंबियाच्या कार्लोस बॅंकाने त्याला जोरात ढकलले होते. त्याच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
 • नेमारवर बंदी घातल्यामुळे ‘कोपा अमेरिका’च्या साखळीतील अखेरच्या सामनाही तो खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बंदीशिवाय नेमारला १० हजार डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

टांझानियातील गॅस क्षेत्राचा भारत विकास करणार

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत भेटीवर आलेले टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जकाया मृशो किक्वेते यांच्यात १९ जून रोजी द्विपक्षीय मुद्यांवर व्यापक चर्चा झाली. 
 • टांझानियातील नैसर्गिक वायू क्षेत्र विकासासाठी मदतीचा प्रस्ताव भारताने यावेळी ठेवला, शिवाय आफ्रिकी देशातील लोकांना ई-पर्यटन व्हिसा सुविधा देण्याचा निर्णयही जाहीर केला.
 • मोदी-किक्वेते यांच्यातील चर्चेदरम्यान उभय देशांनी दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात परस्पर सहकार्यासाठी एक संयुक्त कृती समूह गठित करण्याचा निर्णय घेतला. 
 • तसेच विविध क्षेत्रातील द्विपक्षीस संबंध दृढ करण्यासाठी आठ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.

‘ऑपरेशन डोगा’

 • आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त येत्या २१ जून रोजी राजपथवर होणाऱ्या समारंभादरम्यान कडेकोट सुरक्षा बंदोबस्तासाठी सशस्त्र दलातर्फे विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याचे नामकरण ‘डोगा’असे करण्यात आले आहे.
 • ऑपरेशन डोगाअंतर्गत दिल्लीतील हा संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात येईल आणि सुरक्षा बंदोबस्तात प्रशिक्षित श्वान तैनात केले जातील.
 • निमलष्करी दल आयटीबीपीचे श्वानपथक यात महत्त्वाची भूमिका वठविणार आहे. त्यामुळे ‘डॉग’आणि ‘योग’ या दोन शब्दांचा मेळ घालून ‘डोगा’ (DOGA) असे नाव देण्यात आले आहे. 
 • इंडिया गेट ते राजपथ या मार्गावरील मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅबिनेट मंत्र्यांसह ४०,००० लोक सहभागी होणार आहेत.
 • आयटीबीपीच्या श्वानपथकाने यापूर्वीही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

विजेवर चालणाऱ्या विमानाची निर्मिती

  China's Electronic aircrafts
 • जगात विजेवर चालणाऱ्या पहिल्या विमानाची निर्मिती चीनने केली असून त्याला हवाई उड्डाण सक्षमतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. बीएक्स १ इ असे या विमानाचे नाव असून त्याचे पंख १४.५ मीटर लांब आहेत तर त्यातून २३० किलो वजन वाहून नेता येते. 
 • हे विमान तीन हजार मीटर उंचीवरून उडते. दोन तासांत विमानाचे चार्जिग होते व नंतर ते ४५ मिनिटे ते १ तास उडू शकते, या विमानाचा ताशी वेग १६० कि.मी. आहे.
 • शेनयांग एरोस्पेस युनिव्हर्सिटी व लायोनिंग जनरल अ‍ॅव्हिएशन अ‍ॅकॅडमी यांनी हे विमान तयार केले आहे. पहिली दोन विमाने लायोनिंग रूक्सीयांग जनरल अ‍ॅव्हिएशन लि या कंपनीला विकण्यात आली आहेत. 
 • वैमानिक प्रशिक्षण, पर्यटन, हवामानशास्त्र व मदतकार्य या क्षेत्रात या विमानाचा उपयोग होऊ शकतो. या विमानाची किंमत १० लाख युआन म्हणजे १,६३,००० डॉलर्स आहे. आतापर्यंत अशा २८ विमानांची मागणी नोंदण्यात आली आहे.

‘हाय ऑन योगा अॅट ३५००० फीट’

 • ‘स्पाईसजेट’ या हवाई सेवा पुरविणाऱ्या कंपनीने विमान प्रवासादरम्यान योगासने करण्याची योजना तयार केली आहे. विशेष म्हणजे या निवडक विमानांमधील प्रवाशांना ३५ हजार फूटांवर योग करण्याची संधी मिळणार आहे.
 • ‘हाय ऑन योगा अॅट ३५००० फीट’ नावाच्या या उपक्रमातंर्गत स्पाईसजेटच्या विमानांमधील कर्मचारी वर्ग आणि इशा फाऊण्डेशनचे योग प्रशिक्षक प्रवाशांना ‘उपयोग’ शिकवणार आहेत. 
 • ‘उपयोग’ हा विशेषत: हवाई प्रवासात करावयाचा योगाचा प्रकार आहे. या योगामुळे सांधे, स्नायू यांना बळकटी मिळते.
 • विमानप्रवासात योग करणारी स्पाईसजेट ही एकमेव कंपनी आहे. 
 • स्पाईसजेटचे एमडी : अजय सिंग

उत्तेजकसेवनात भारत तिसऱ्या स्थानावर

 • क्रीडा क्षेत्राला काळिमा असलेल्या उत्तेजक सेवन प्रकरणांमध्ये भारताला जगात तिसरे स्थान देण्यात आले आहे. 
 • जागतिक उत्तेजक द्रव्यसेवनविरोधी संस्था (वाडा) ने २०१३ वर्षांसाठीच्या मांडलेल्या अहवालात सर्वाधिक उत्तेजक सेवन क्रीडापटूंच्या यादीत रशिया अव्वल तर टर्की दुसऱ्या स्थानी आहे.
 • २०१३मध्ये भारताचे ९१ खेळाडू उत्तेजक सेवन चाचणीत दोषी सापडले होते. राष्ट्रीय उत्तेजक सेवन विरोधी संघटनेकडे उत्तेजक सेवनाची ९३ प्रकरणे आली होती. यापैकी ९० प्रकरणांमध्ये क्रीडापटू दोषी असल्याचे ‘वाडा’च्या सखोल परीक्षणानंतर स्पष्ट झाले.
 • ‘वाडा’ने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय व्यापक असा अहवाल तयार केला आहे. उत्तेजक सेवन संदर्भातील हा सगळ्यात अद्ययावत अभ्यास आहे. 
 • भारत आणि इंग्लंड संयुक्त युद्धसरावादरम्यान अपघात

 • इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड संयुक्त युद्धसरावादरम्यान झालेल्या अपघातामध्ये २१ भारतीय जवान आणि २ ब्रिटिश सैनिक जखमी झाले आहेत.
 • भारत आणि इंग्लंड सैन्यादरम्यान सकारात्मक लष्करी संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने भारत-ब्रिटन संयुक्त लष्करी सराव ‘अजेय वॉरीयर २०१५’ १३ जून ते २८ जून २०१५ दरम्यान इंग्लंडमधील सॅलिसबरी प्लेन वेस्टडाऊन कॅम्प येथे आयोजित करण्यात आला आहे.
 • या सरावानंतर सॅलिसबरी प्लेन येथून परत येत असताना लष्कराच्या दोन वाहनांमध्ये १७ जून रोजी हा अपघात झाला आहे.
 • भारत आणि यूके सैन्यादरम्यान सकारात्मक लष्करी संबंधांना प्रोत्साहन देणे तसेच दहशतवादाचा संयुक्तपणे सामना करण्यासाठी प्रयत्न करणे हा या सरावाचा प्रमुख उद्देश आहे.

अमेरिकेतील दहा डॉलरच्या नोटेवरील जागा आता एक महिला घेणार

 • अमेरिकेतील दहा डॉलरच्या नोटेवरील अलेक्झांडर हॅमिल्टन यांची जागा आता एक महिला घेणार आहे.
 • अमेरिकेचे अर्थमंत्री जेकब ल्यू यांनी याबाबतची घोषणा केली असून, 2020 मध्ये ही नोट अमेरिकेच्या बाजारपेठेत येणार आहे.
 • या निर्णयामुळे गेल्या शंभर वर्षांत पहिल्यांदाच डॉलरच्या नोटेवर महिला दिसणार आहे.
 • तसेच यासाठी thenew10.treasury.gov या वेबसाइटवर या संदर्भात मते नोंदविण्याचे आवाहन ल्यू यांनी केले.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या संचालकपदी अर्चना रामसुंदरम

 • वरिष्ठ आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची केंद्रीय अन्वेषण विभागातून (सीबीआय) उचलबांगडी करण्यात आली असून, त्यांना राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचे (एनसीआरबी) संचालक करण्यात आले आहे.
 • Archana Ramasundaram त्या 1980 च्या तामिळनाडू तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत.गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात त्यांची 'सीबीआय’च्या अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीवर वाद निर्माण झाला होता आणि त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
 • त्यांची नियुक्ती बेकायदा आणि नियमाविरुद्ध असल्याचे दिसून येत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सीबीआयच्या अतिरिक्त संचालकपदावर काम करण्यास मनाई केली होती.

‘दि राइट ब्रदर्स’ पुस्तक प्रकाशित

 • पुलित्झर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक डेव्हिड मॅककुलॉघ यांनी ‘दि राइट ब्रदर्स’ नावाचे पुस्तक लिहिले असून  त्यामध्ये विमानाचा शोध लावणाऱ्या राइट बंधूंची कथा नव्या रूपात मांडण्यात आली आहे.
 • Right Brother : प्रत्यक्षात राइट बंधूंना विमानाची कल्पना कधी सुचली. कसलेही आधुनिक तंत्रज्ञान हाताशी नसताना त्यांनी कशा पद्धतीने विमानाची चाचणी घेतली आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनातील नाट्यमयता या नव्या पुस्तकातून लोकांसमोर येणार आहे.
 • ‘सिमन अँड शुश्टर’ या प्रकाशन संस्थेने ही राइट बंधूंची संशोधन गाथा प्रसिद्ध केली आहे. या ग्रंथाच्या लेखनासाठी मॅककुलाघ यांनी राइट बंधूंच्या खासगी डायऱ्या, वह्या, स्क्रॅपबुक आणि त्यांनी परस्परांना लिहिलेली शेकडो पत्रे चाळली. त्यातून एक नवे भावविश्व त्यांच्या हाती लागले. आता हीच संशोधनगाथा पुस्तक रूपाने वाचकांच्या हाती येईल.

एनएल बेनो जेफिन - देशातील पहिली अंध आयएफएस अधिकारी

 • तामिळनाडूची एनएल बेनो जेफिन देशाची पहिली दृष्टिहीन आयएफएस अधिकारी बनली आहे. बेनोने देशातील सगळ्यात कठिण यूपीएससी परिक्षेत 353 रँक मिळविला आहे.
 • सध्या बेनो स्टेट बँक ऑफ इंडियात प्रोबेशनरी अधिकारीच्या पदावर काम करत आहे. गेल्या काही वर्ष बेनो या परीक्षेची तयारी करत होती.
 • 2013 च्या परिक्षेच्या निकालाचे परिणाम आल्यावर बेनोने नवीन इतिहास रचला आहे.
 • बेनो तामिळनाडू भारतियार यूनिवर्सिटीतून इंग्रजीमध्ये पीएचडी करत आहे. पीएचडी चालू असताना बेनोने सिविल सर्विसची तयारी सुद्धा केली.

सविस्तर वाचा ........... आंखों में रौशनी न सही, जीवन में उजाला तो है !!

दिनविशेष :

 •     1869 - किर्लोस्कर उद्योगसमूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म.
 •     1921 - पुणे येथे टिळक विद्यापीठाची स्थापना.
 •     1960 - महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना.
 •     1977 - पुण्यात देशातील पहिल्या कीर्तन महाविद्यालयाचे उद्घाटन.

!!! जय महाराष्ट्र !!!