भारताचे अग्निपंख विसावले
आपले लाडके राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांना एमपीएससी टॉपर्सची भावपूर्ण श्रद्धांजली
|
भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (वय ८३) यांचे २७ जुलै रोजी सायंकाळी मेघालयमधील शिलाँग येथे हृदयाघाताने निधन झाले. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’च्या (आयआयएम) कार्यक्रमासाठी ते येथे आले होते. व्याख्यान सुरू असतानाच ते व्यासपीठावर कोसळले. त्यांना तातडीने बेथानी रुग्णालयात नेण्यात आले; पण त्यांची प्राणज्योत मालविली.
निधन झाल्यानंतर २८ जुलै रोजी त्यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता रामेश्वरम येथील त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
त्यांच्या निधनामुळे केंद्र सरकारने सात दिवसांचा (२७ जुलै ते २ ऑगस्ट) दुखवटा जाहीर केला आहे तर तेलंगण सरकारने २८ जुलै रोजी सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने मात्र सुट्टी नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. आपल्या मृत्यूदिवशी देशाला सुटी देऊ नये, अशी कलाम यांची इच्छा होती. सात दिवसांच्या दुखवटा दरम्यान राष्ट्रध्वज अर्धा खाली उतरविण्यात येणार आहे.
आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी देशातील अनेक तरुण मनांना चेतना देण्याचे काम केले. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके असलेले ‘कलाम सर’ आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांचे आवडते विद्यादानाचे काम करत राहिले.
“परदेशी बनवाटची शस्त्रास्त्रे आयात करणे भारतासारख्या देशाला परवडणारे नसून, भारतीय बनावटीची आयुधे विकसित करण्याची क्षमता देशात निर्माण झाली पाहिजे.”
|
- पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
- जन्म- १५ ऑक्टोबर १९३१, (रामेश्वर, तमिळनाडू, भारत)
- वडील- जैनुलाबदिन अब्दुल
अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्या नावाने ओळखले जाते. हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते. आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले. विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजविण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता.
- प्राथमिक शिक्षण : श्वार्त्ज हायस्कूल, रामअनंतपुरम
- पदवी : सेंट जोसेफ कॉलेज, तिरुची (विज्ञान)
- व्यावसायिक : १९५४ ते ५७ मध्ये एम.आय.टी. मद्रास येथून एअरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये डी.एम.आय.टी.
कलाम यांचे ट्विटर अकाउंट सुरू राहणार
कलाम यांच्या सहकाऱ्यांनी कलाम यांचे ट्विटर अकाउंट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, ‘इन मेमरी ऑफ डॉ. कलाम’ या नावाने अकाउंट सुरू राहील. कलाम यांचे सहकारी सृजनपालसिंह यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “हे अकाउंट डॉ. कलाम यांच्या अमर झालेल्या आठवणींना समर्पित आहे. कलामांचे विचार, त्यांची शिकवण आणि त्यांच्या ध्येयाच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे अकाउंट काम करेल. मिस यू सर.” सिंह हेच या ट्विटर अकाउंटचे चालक असतील. कलामांनी दिलेली भाषणे, त्यांची पुस्तके आदींमधील महत्त्वाचे अंश ट्विटरवरून शेअर केले जाणार आहेत.
|
कार्य
- १९५८ साली डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिकाचे सहायक म्हणून नोकरी.
- भारताचे पहिले हलके विमान होवर क्राफ्ट विकसित करणाऱ्या चमूच्या प्रमुखपदी नियुक्ती. होवर क्राफ्ट विकसित.
- १९६३ ते १९८० या कालावधीत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्रो) काम.
- १९८० : इंदिरा गांधी यांनी इंटिग्रेटेड, गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला. याचे सतीश धवन पहिले संचालक होते. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी योजनेची जबाबदारी डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडे सोपविण्यात आली आणि भारताने क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात स्वयंसिद्ध होण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली.
- ११ व १३ मे १९९८ : पोखरण येथे दोन यशस्वी अणुचाचण्या घेण्यात आल्या. यात अब्दुल कलाम यांची भूमिका महत्त्वाची होती.
- १७ जुलै २००२ ते २४ जुलै २००७ : भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. (त्यांच्या कार्यामुळे ते आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती ठरले.)
बिहार सरकारने डॉ. कलाम यांना अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी किशनगंज कृषी विद्यापीठाचे नाव बदलून ते डॉ. कलाम कृषी विद्यापीठ असे करण्याचा निर्णय घेतला आहे.
|
पुरस्कार | |
---|---|
१९८१ |
पद्मभूषण
|
१९९० |
पद्मविभूषण
|
१९९७ |
भारतरत्न
|
१९९७ |
इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता
|
१९९८ |
वीर सावरकर पुरस्कार
|
२००० |
रामानुजम पुरस्कार
|
२००७ |
ब्रिटिश रॉयल सोसायटीतर्फे किंग चार्ल्स (द्वितीय) पदक
|
२००७ |
वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी
|
२००९ |
अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स संस्थेतर्फे हूवर पदक
|
२००९ |
अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
|
२०१० |
वॉटलू विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग
|
२०११ |
एस. गुजराथी विद्यापीठाचा डॉक्टर ऑफ सायन्स
|
२०११ |
इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर संस्थेचे मानाचे सभासदत्व
|
२०१२ |
डॉक्टर ऑफ लॉ (सिमॉन फ्रेजर विद्यापीठ)
|
२०१४ |
डॉक्टर ऑफ सायन्स (एबिनबर्ग विद्यापीठ, इंग्लंड)
|
२०१० मध्ये संयुक्त राष्ट्राने अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक विद्यार्थी दिन’ घोषित केला.
तसेच महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कलाम यांना श्रद्धांजली वाहताना १५ ऑक्टोबर हा कलाम यांचा जन्मदिन राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. |
ग्रंथसंपदा | |
---|---|
डेव्हलपमेंट इन फ्ल्यूइड मेकॅनिक्स अॅण्ड स्पेस टेक्नोलॉजी (१९८८)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रोद्दाम नरसिम्हा
|
इंडिया २०२०: ए व्हिजन फॉर दी न्यू मिलेनियम (१९९८)
|
डॉ. एपीजे कलाम आणि वाय. एस. राजन
|
विंग्ज ऑफ फायर (मराठीत अनुवाद - अग्नपिंख) (१९९९)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि अरुण तिवारी
|
इग्नायटेड माईंड्स: अनलिशिंग दी पॉवर विदिन इंडिया (२००२)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
|
दी ल्यूमिनस स्पार्क्स (२००४)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
|
मशिन इंडिया (२००५)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
|
इन्स्पायरिंग थॉट्स (२००७)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
|
इनडॉमटिेबल स्पिरीट्स (२००७)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
|
एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन
|
डॉ. एपीजे कलाम आणि सिवाथानू पिल्लई
|
यू आर बॉर्न टू ब्लॉसम : टेक माय जर्नी बियाँड (२०११)
|
डॉ. एपीजे कलाम आणि अरुण तिवारी
|
टर्निंग पॉईंट्स : ए जर्नी थ्रु चॅलेंजेस (२०१२)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
|
टार्गेट थ्री बलियिन (२०११)
|
डॉ. एपीजे कलाम आणि श्रीजन पाल सिंग
|
माय जर्नीः ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन्टू अॅक्शन्स (२०१३)
|
डॉ. एपीजे कलाम आणि व्ही. पोनराज
|
ए मॅनीफेस्टो फॉर चेंज : ए सिक्वेल टू इंडिया २०२० (२०१४)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
|
ट्रान्सेंडिंग माय स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स विथ प्रमुख स्वामीजी (२०१५)
|
डॉ. एपीजे अब्दुल कलाम
|
रिइग्नायटेड : सायंटिफकि पाथवेज टू ए ब्रायटर फ्यूचर (२०१५)
|
डॉ. एपीजे कलाम आणि श्रीजन पाल सिंग
|
देश २०२०च्या दिशेने झेपावत आहे. देशातील ५४ कोटी तरुण या बदलात सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. यात तुम्हीही सहभागी होऊ शकता. त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने किमान ५ वृक्ष लावावे.
|
दिले जिज्ञासेचे पंख..
नागपूर विद्यापीठाच्या शतकी दीक्षांत समारंभात पदवीधरांच्या जिज्ञासेला डॉ. कलाम यांनी पंख दिले. अग्निपंखासमान हे जिज्ञासेचे पंखही युवकांना प्रेरित करणारे ठरले. त्यांची प्रेरणादायी कविता त्यांच्याच शब्दांत....
आय विल फ्लाय,
आय एम बॉर्न विथ पोटेंशिअल,
आय एम बॉर्न विथ गुडनेस
आय एम बॉर्न विथ आयडियाज् अॅण्ड ड्रीम्स
आय एम बॉर्न विथ ग्रेटनेस
आय एम बॉर्न विथ कॉन्फिडन्स
आय एम बॉर्न विथ विंग्स
सो, आय एम नॉट मेड फॉर क्रॉलिंग
आय हॅव विंग्स
आय विल फ्लाय, फ्लाय, फ्लाय....
शून्यातून सुरुवात करताना तरुण सहकाऱ्यांना हाताशी धरून अग्नीस पृथ्वी, आकाश, त्रिशूळ, नाग अशा दीर्घ पल्ल्याच्या प्रखर क्षेपणास्त्रांची निर्मिती केली. अंतरिक्ष आणि क्षेपणास्त्र संशोधनासाठी उच्च प्रतीचे अस्सल स्वदेशी तंत्रज्ञान त्यांनी सिद्ध केले. वडिलांकडून घेतलेले मुस्लीम रीतिरिवाज, रामेश्वरम देवस्थानच्या पंडित लक्ष्मण शास्त्रींकडून मिळविलेले हिंदु धर्माचे ज्ञान आणि ख्रिश्चन संस्थेत घेतलेले औपचारिक शिक्षण या त्रिवेणी धर्मनिरपेक्ष संगमातून घडलेल्या या वैज्ञानिकाने अलौकिक कर्तबगारीने तरुण पिढ्यांच्या मनात दुर्दम्य आत्मविश्वासाची ज्योत निरंतर तेवती ठेवली.
|