चालू घडामोडी - ०१ नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 01, 2015]
bySunil Jadhavar•
0
जीडीपी 11.5 अब्ज रुपयांचा वाटा
या वर्षी झालेल्या आठव्या आयपीएल स्पर्धेने भारताच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नात (जीडीपी)11.5 अब्ज रुपयांचा वाटा उचलला असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिली.
भारताच्या अर्थव्यवस्थेतील आयपीएलच्या उत्पन्नाचा प्रभाव किती याचे सर्वेक्षण करण्यासाठी बीसीसीआयने 'केपीएमजी'या क्रीडा सल्लागार समूहाची नियुक्ती केली होती.
आठव्या आयपीएल स्पर्धेत आठसंघ 44दिवसांत देशातील 12 शहरांमधील 13 केंद्रांवर एकूण 60 सामने खेळले.
आठव्या मोसमातील स्पर्धेत एकूण 193 क्रिकेटपटूंनी सहभाग घेतला.
आयपीएलच्या सामन्यातून अंदाजे 26.5 अरब रुपयांची आर्थिल उलाढाल झाली असल्याचे या सर्वेक्षणावरून स्पष्ट झाल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
ग्रामीण भारतामध्ये 100 ठिकाणी वाय फाय यंत्रणा उभी करणार
देशामध्ये डिजिटल क्रांतीत सहभागी होण्यासाठी फेसबुक आणि बीएसएनल ग्रामीण भारतामध्ये 100 ठिकाणी वाय फाय यंत्रणा उभी करणार आहेत.
तसेच बीएसएनएनकडून बँडविड्थ विकत घेण्यासाठी फेसबुक दरवर्षी पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
वायफाय उपलब्ध करून देण्यासाठी लागणा-या सामग्रीसाठीही गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे वृत्त बीएसएनलच्या अधिका-यांच्या हवाल्याने इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.
फेसबुकने 100 गावांची निवड केलेली असून प्रत्येक गावासाठी वर्षाला 5 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
आत्तापर्यंत चाचणीसाठी दक्षिण व पश्चिम भारतातल्या 25 गावांची निवड करण्यात आली आहे.
येत्या दोन वर्षात ही संख्या वाढवण्यात येणार आहे.
ग्राहकांना पहिल्या अर्ध्या तासासाठी वाय फाय मोफत मिळेल आणि एकाचवेळी साधारणपणे 2000 ग्राहक ही सुविधा वापरू शकतिल असे बीएसएनएलच्या अधिका-यांनी सांगितले.
बीएसएनलने स्वत: आत्तापर्यंत 450 वाय फाय हॉटस्पॉट उभारले असून मार्च 2016 पर्यंत ही संख्या 2,500 करण्याचे उद्दिष्ट्य आहे.
डिजिटल इंडिया या केंद्र सरकारच्या धोरणानुसार वाय फायला चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे बीएसएनलच्या अधिका-यांनी सांगितले आहे.
देशातील किमान 93 टक्के प्रौढांनी स्वेच्छेने आधारकार्ड घेतले
देशातील किमान 93 टक्के प्रौढांनी स्वेच्छेने आधारकार्ड घेतले आहे, असे एका नव्या पाहणीत दिसून आले आहे.
युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) या संस्थेने लोकांना आधारकार्ड देण्याचे काम केले आहे.
आताच्या आकडेवारीनुसार 93 टक्के प्रौढांनी स्वेच्छेने आधारकार्ड घेतली आहेत, असे एका निवेदनात म्हटले आहे.
आता मुलांनाही आधारकार्ड नोंदणीत समाविष्ट केले जाणार असून यूआयडीएआय पहिले आधारकार्ड 29 सप्टेंबर 2010 रोजी देण्यात आले.
त्यानंतर आजपर्यंत पाच वर्षांत 92.68 कोटी आधारकार्ड देण्यात आली आहेत व त्या योजनेच्या संकेतस्थळानुसार 92.86 कोटी आधारकार्ड देण्यात आली आहेत.
सरे विद्यापीठाचे संशोधन
दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असून त्याचे भौगोलिक स्थान, कमी कार्यक्षमतेच्या ऊर्जास्रोतांचा वापर व प्रतिकूल हवामान हे अनेक घटक त्याला कारणीभूत आहेत, असे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
या संशोधनात भारतीय वैज्ञानिकांचाही समावेश आहे.
सरे विद्यापीठाने याबाबत केलेल्या संशोधनानुसार दिल्लीचे हवामान, वीज वापराची संस्कृती, वाढती शहरी लोकसंख्या यामुळे सूक्ष्म कणांच्या रूपातील प्रदूषके वाढली असून ती मानवी आरोग्यास धोकादायक ठरत आहेत.
विषारी हवाप्रदूषकांचे मिश्रण दिल्लीतील हवेत असल्याने ते जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर ठरले आहे.
दिल्लीत हवा प्रदूषणाने जास्त लोक मृत्यू पावतात, असे सरे विद्यापीठाचे डॉ. प्रशांत कुमार यांनी म्हटले आहे.
वाहनांचा वाढता वापर, औद्योगिक प्रदूषण व वाढती लोकसंख्या ही त्याची कारणे असली तरी तेथील हवेत प्रदूषण करणाऱ्या घटकांचे वेगळेच मिश्रण आहे.
जगात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरात दिल्ली हे एक असून तेथील लोकसंख्या 25.8 दशलक्ष आहे व ती वाढत आहे.
तेथील वाहनांची संख्या 2010 मध्ये 47 लाख होती ती 2030 मध्ये 26 दशलक्ष होईल.
ऊर्जेचा वापर 2001 ते 2011 दरम्यान 57 टक्के वाढला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या गेल्यावर्षीच्या मे महिन्यातील अहवालानुसार दिल्ली हे जगात सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.
तेथे पीएम 2.5 कणांचे प्रमाण 153 मायक्रोग्रॅम तर पीएम 10 कणांचे प्रमाण 286 मायक्रोग्रॅम आहे.
हे प्रमाण जागतिक प्रमाणित पातळीपेक्षा खूपच जास्त आहे.