प्रश्नसंच - ६ [इतिहास]

प्र.१. १९४२ च्या आंदोलनात 'सुरुंगे' व 'तुरुंगे' म्हणून अनुक्रमे कोण ओळखले जात ?

A. भूमिगत चळवळ आंदोलक आणि अटक झालेले क्रांतिकारक
B. भूमिगत चळवळ आंदोलक आणि इंग्रज
C. क्रांतिकारक आणि गांधीच्या आदेशान्वये कैद पत्करणारे
D. भूमिगत चळवळ आंदोलक आणि गांधीच्या आदेशान्वये कैद पत्करणारे


D. भूमिगत चळवळ आंदोलक आणि गांधीच्या आदेशान्वये कैद पत्करणारे

प्र.२.  राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अध्यक्षाने १९४२च्या क्रिप्स आणि वेव्हेल योजनेसंबंधी वाटाघाटी घडवून आणल्या ?

A. मौलाना आझाद
B. पंडित नेहरू
C. जे.बी.कृपलानी
D. सी.राजगोपालाचारी


A. मौलाना आझाद

प्र.३.  नारायण गुरु यांनी कोणत्या जमातीसाठी कार्य केले ?

A. इझावा
B. विणकर
C. धनगर
D. माडिया गोंड


A. इझावा

प्र.४.  खालील विधाने वाचा आणि योग्य विधाने ओळखा.

अ] अरुणा असफअली  महिला स्वयंसेवक गटाच्या संस्थापक होत्या.
ब] अमृतबाझार पत्रिका १८६८ मध्ये सुरु करण्यात आली.

पर्याय
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


B. फक्त ब योग्य

प्र.५. १७७८ साली स्थापन झालेल्या विल्यम जोन्स यांच्या 'एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया'चे प्रमुख उद्दिष्ट काय होते ?

A. भारतीय कायद्यांमध्ये इंग्रजी नागरी सेवेतील अधिकार्यांना प्रशिक्षण देणे.
B. भारतीय भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे.
C. पुरातत्वीय उत्खनन व सर्वेक्षण करणे.
D. भारतामध्ये पाश्चिमात्य चालीरीती रुजविणे.


B. भारतीय भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देणे.

प्र.६. खालीलपैकी कोणत्या उदारमतवादी नेत्यांनी पहिल्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली ?

अ] तेज बहाद्दूर सप्रू
ब] व्ही.एस.श्रीनिवास
क] एम.आर.जयकर
ड] सी.वाय चिंतामणी

पर्याय
A. अ आणि ब
B. अ, ब आणि क
C. ब, क आणि ड
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र.७. लॉर्ड डलहौसी खालीलपैकी कशाला कारणीभूत होता ?

अ] पंजाब खालसा केले.
ब] पंजाबमध्ये सुधारणा घडवून आणल्या.
क] ठगांचा बिमोड केला.

पर्याय
A. फक्त अ
B. अ आणि ब
C. अ आणि क
D. वरील सर्व


B. अ आणि ब

प्र.८.  लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री  स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि _ _ _ _ _ _ _?

A. असहकार
B. जहालवाद
C. राजकारण
D. राष्ट्रीय शिक्षण


D. राष्ट्रीय शिक्षण

प्र.९.  'मॅरेज ऑफ हिंदू विडोज' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. ईश्वरचंद्र विद्यासागर
B. विष्णुशास्त्री चिपळूणकर
C. म.गो.रानडे
D. पंडिता रमाबाई


A. ईश्वरचंद्र विद्यासागर

प्र.१०.  ग्रामीण भागात शिक्षण प्रसारासाठी १९३६ साली ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ संस्था कोणी सुरु केली ?

पर्याय
A. बाळशास्त्री जांभेकर
B. नाना शंकरशेठ
C. धोंडो केशव कर्वे
D. डॉ. आंबेडकर


C. धोंडो केशव कर्वे
Previous Post Next Post