Header Ads

प्रश्नसंच - ११ [भूगोल]

प्र.१} १ मे १९६० रोजी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते ?

A. ३
B. ४
C. ५
D. ६


B. ४

प्र.२} आर्द्र पानझडी वनांत प्रामुख्याने कोणती वनस्पती आढळते ?

A. तेंदू
B. नागपंचा
C. सागवान
D. बाभूळ


C. सागवान

प्र.३} भारतातील मॅंगनीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात कोठे आहे ?

A. गडचिरोली
B. भंडारा
C. यवतमाळ
D. वर्धा


B. भंडारा

प्र.४} दख्खनच्या पठाराचा मुलभूत खडक कोणता आहे ?

A. सौसर
B. बेसाल्ट
C. आर्कियन
D. कडप्पा


C. आर्कियन

प्र.५} महाराष्ट्र शासन 'एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम' कशासाठी राबवीत आहे ?

A. पुनर्वसनासाठी
B. गरिबी कमी करण्यासाठी
C. शहरी गरिबांकरिता मुलभूत सुविधा कार्यक्रम राबविण्यासाठी
D. ग्रामीण गरिबांकरिता मुलभूत सुविधा कार्यक्रम राबविण्यासाठी


A. पुनर्वसनासाठी

प्र.६} सातपुडा पर्वतरांगांच्या पूर्वेस कोणत्या टेकड्या आहेत ?

A. दरकेसा
B. हिरण्यकेशी
C. चिरोली
D. गाविलगढ


D. गाविलगढ

प्र.७} खालील विधाने लक्षात घ्या आणि योग्य विधाने ओळखा.

अ] सातपुडा पर्वतरांगांमुळे नर्मदा व तापी नदीचे खोरे अलग झाले आहे.
ब] तापी-पूर्णा खोरे हा वास्तविक पाहता गाळाचा प्रदेश आहे.

पर्याय
A. फक्त अ योग्य
B. फक्त ब योग्य
C. दोन्ही योग्य
D. दोन्ही अयोग्य


A. फक्त अ योग्य

प्र.८} खालीलपैकी कोणती क्रिया हि आंतर उष्णकटीबंधीय केंद्रीभवन पट्ट्याच्या स्थानावर अवलंबून असते ?

A. उष्ण हवेची लाट
B. आवर्ताचा मार्ग
C. थंड हवेची लाट
D. यापैकी नाही 


B. आवर्ताचा मार्ग

प्र.९} सह्याद्री पर्वताच्या बाबतीत खालील विधाने लक्षात घ्या आणि सत्य विधाने ओळखा.

अ] सह्याद्री पर्वत पूर्ववाहिनी आणि पश्चिमवाहिनी नद्यांचा जलविभाजक आहे.
ब] सह्याद्रीच्या घाटमाथ्याची उंची निरनिराळी आहे आणि प्रत्येक ठिकाणी ती जलविभाजक असेलच असे नाही.
क] नद्याच्या अपक्षण कार्यामुळे जलविभाजकांचे स्थान बदलते आहे.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त अ आणि ब
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र.१०} नैऋत्य मान्सूनच्या आवर्ताच्या मार्गास भारतीय मौसम विज्ञानात काय म्हणतात ?

A. मान्सून द्रोणी
B. नैऋत्य आवर्त
C. मान्सून आवर्त
D. ईशान्य आवर्त


A. मान्सून द्रोणी