Header Ads

प्रश्नसंच - ९ [इतिहास]

प्र.१} विवेक सिंधू साहित्याची रचना कोणत्या भाषेत करण्यात आली आहे ?

A. आसामी
B. मराठी
C. प्राकृत
D. संस्कृत


B. मराठी

प्र.२} मौर्य काळात विष्ठी हि संज्ञा कशाकरिता वापरली गेली ?

A. प्रदेश
B. जिल्हा
C. सक्तीचे कामगार
D. ऋतूंची परिस्थिती


C. सक्तीचे कामगार

प्र.३} मौर्यांच्या अवंतीरथ या प्रदेशाची राजधानी कोणती होती ?

A. पाटलीपुत्र
B. तक्षशीला
C. उज्जैन
D. तोशाली


C. उज्जैन

प्र.४} कांची येथील कैलासनाथ मंदिराची स्थापना कोणी केली ?

A. नरसिंह वर्मन दुसरा
B. नरसिंह वर्मन पहिला
C. नंदीवर्मन
D. कृष्ण पहिला


A. नरसिंह वर्मन दुसरा

प्र.५} राजग्रीह येथील पहिल्या बुद्ध परिषदेचा अध्यक्ष पुढीलपैकी कोण होते ?

A. पार्श्वका
B. अशोक
C. वसुमित्र
D. महाकश्यप


D. महाकश्यप

प्र.६} खालीलपैकी कोण एक जण इतर तिघांच्या समकालीन नाही ?

A. बिम्बिसार
B. गौतमबुद्ध
C. मिलिंद
D. प्रसेनजीत


C. मिलिंद

प्र.७} सातकर्णी प्रथम संदर्भात योग्य विधान ओळखा.

A. तो वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता.
B. हा सातवाहन घराण्याचा शेवटचा राजा होय.
C. हा सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा होता.
D. तो अतिशय पराक्रमी आणि मुत्सद्दी नव्हता.


A. तो वैदिक धर्माचा पुरस्कर्ता होता.

प्र.८} अलाहाबाद येथील स्तंभालेख खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे ?

A. महापद्म नंद
B. समुद्रगुप्त
C. चंद्रगुप्त मौर्य
D. सम्राट अशोक 


B. समुद्रगुप्त

प्र.९} पणिनींचे 'अष्टाध्यायी', पतंजलींचे 'महाभाष्य' आणि जयादित्याचे 'कंशीक वृत्ती' कशावर भाष्य करतात ?

A. निती तत्वे
B. उच्चार तत्वे
C. व्याकरणाचे महत्व
D. भाषेची मुलतत्वे


A. निती तत्वे

प्र.१०} नवाश्मयुगाबाबत अयोग्य विधान ओळखा.

अ] दगडी नांगराने शेती करण्याचे तंत्र या काळात मानवाने अवगत केले.
ब] या काळातील मानव मुर्तीपुजक होते.
क] या काळातील माणसाला चाकाचा शोध लागला नव्हता.
ड] या काळतील मानवी जीवन भटक्या स्वरूपाचे होते.

पर्याय
A. १ आणि २
B. ३ आणि ४
C. फक्त ३
D. २ आणि ३


B. ३ आणि ४