प्रश्नसंच - ३६ [इतिहास]

प्र १.} 'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा व सेवाभाव धरा’ असे कोणी म्हटले आहे ?

A. विनोबा भावे
B. पंजाबराव देशमुख
C. महात्मा फुले
D. वि.रा.शिंदे


B. पंजाबराव देशमुख

प्र २.} डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याबद्दल अयोग्य विधान ओळखा.

A. ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले.
B. १९५२ ते १९६२ या दरम्यान ते अर्थमंत्री होते.
C. ते भारताचे पहिले कृषीमंत्री होते.
D. १९५५ मध्ये त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली.


B. १९५२ ते १९६२ या दरम्यान ते अर्थमंत्री होते.

प्र ३.} 'वैदिक वाङ्ग्मयातील धर्माचा उद्ग२म आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख यांना कोणत्या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली ?

A. कोलंबिया
B. ऑक्सफर्ड
C. एडीम्बरो
D. मराठवाडा


A. कोलंबिया

प्र ४.} महात्मा फुलेंवर कोणत्या संस्कृत ग्रंथाचा प्रभाव होता ?

A. वज्रसुची
B. मनुस्मृती
C. भगवतगीता
D. वज्रापती


A. वज्रसुची

प्र ५.} महात्मा फुलेंनी पुण्यात पहिला पुनर्विवाह कधी घडवून आणला ?

A. १८५८
B. १८५९
C. १८६०
D. १८६१


C. १८६०

प्र ६.} 'महाराष्ट्राला पुढील ५ हजार वर्षात मुंबई मिळणार नाही' हे उद्गार कोणाचे ?

A. मोरारजी देसाई
B. स.का.पाटील
C. पा.वा.गाडगीळ
D. एस.एम.जोशी


B. स.का.पाटील

प्र ७.} पानिपत युद्धामध्ये मराठ्यांची गेलेली प्रतिष्ठा कोणी परत मिळवून दिली ?

A. राघोबादादा
B. माधवराव पेशवे
C. दुसरा बाजीराव
D. नानासाहेब


B. माधवराव पेशवे

प्र ८.} अयोग्य विधाने ओळखा.

अ] व्ही.डी.देशपांडे यांनी १९५२ मध्ये 'संयुक्त महाराष्ट्र' साप्ताहिकात मुंबईसह महाराष्ट्राची मागणी केली होती.
ब] फाझल अली कमिशनने आपल्या अहवालात स्वतंत्र तेलंगणा आणि स्वतंत्र विदर्भाची शिफारस केली होती.

पर्याय
A. फक्त अ
B. फक्त ब
C. अ व ब दोन्ही
D. एकही नाही


D. एकही नाही

प्र ९.} महात्मा फुले यांनी नभिकाञ्चा संप कोठे घडवून आणला ?

अ] तळेगाव
ब] हडपसर
क] ओतूर

पर्याय
A. अ आणि ब
B. ब आणि क
C. अ आणि क
D. वरील सर्व


C. अ आणि क

प्र १०.} ' रणांगण ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

A. शिवाजी सावंत
B. विश्राम बेडेकर
C. चिंतामणराव कोल्हटकर
D. दिनानाथ जोशी


B. विश्राम बेडेकर
Previous Post Next Post