Header Ads

प्रश्नसंच - ४८ [मराठी व्याकरण]

प्र १.} ' राजा ' या शब्दाला पर्यायी शब्द नसलेला शब्द ओळखा.

A. भूपती
B. भूर्ज
C. भूपाळ
D. भूप


B. भूर्ज

प्र २.} ' थंड फराळ करणे ' या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.

A. थंड अन्न खाणे
B. भरपूर जेवणे
C. उपाशी रहाणे
D. सावकाश जेवणे


C. उपाशी रहाणे

प्र ३.} ' मनस्ताप ' हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

A. पूर्वरूप संधी
B. पररूप संधी
C. व्यंजन संधी
D. विसर्ग संधी


D. विसर्ग संधी
{मनः + ताप = मनस्ताप}

प्र ४.} ' वहाने सावकाश चालवा.' - या वाक्यातील सावकाश या शब्दाचा प्रकार ओळखा.

A. क्रियाविशेषण
B. विशेषण
C. उभयान्वयी अव्यय
D. क्रियापद


A. क्रियाविशेषण

प्र ५.} ' मधु पुस्तक वाचतो.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.

A. कर्तरी प्रयोग
B. कर्मणी प्रयोग
C. नवीन कर्तरी प्रयोग
D. भावे प्रयोग


A. कर्तरी प्रयोग

प्र ६.} सर्व समाजात समता असावी असे म्हणणा-या व्यक्तीला _ _ _ _ _ _ _ म्हणतात.

A. सर्वजनवादी व्यक्ती
B. सौम्यवादी व्यक्ती
C. साम्यवादी व्यक्ती
D. समतोलवादी व्यक्ती


C. साम्यवादी व्यक्ती

प्र ७.} ' चित्रा आधी जेवली कारण तिला भूक लागली होती.' - या वाक्याचा प्रकार ओळखा.

A. केवळ वाक्य
B. मिश्र वाक्य
C. संयुक्त वाक्य
D. विधानार्थी वाक्य


C. संयुक्त वाक्य

प्र ८.} ' शार्दुल ' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

A. सिंह
B. हरीण
C. शहामृग
D. हत्ती


A. सिंह

प्र ९.} ' साहस हे जीवनामध्ये मिठासारखे आहे.' या वाक्यातील साहस हे _ _ _ _ _ _ _ आहे.

A. सामान्यनाम
B. विशेषनाम
C. भाववाचक नाम
D. सर्वनाम


C. भाववाचक नाम

प्र १०.} जुन्या रूढी व चालीरीती यांना अनुसरून वागणारा.....

A. निरक्षर
B. अशिक्षित
C. सनातनी
D. अंधश्रद्धाळू


C. सनातनी