प्रश्नसंच - ५९ [अर्थशास्त्र]

प्र १.} देशाच्या स्थूल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्र राज्याचा वाटा किती आहे ?

A. १४.९%
B. २०.१%
C. ०२.०२%
D. १८.९%


A. १४.९%

प्र २.} २००९-१० मधील निकषानुसार भारताचे दरडोई प्रतिमाह ग्रामीण आणि शहरी उत्पन्न अनुक्रमे [अंदाजे] किती आहे ?

A. ३०० रु. , ४०० रु
B. ५६५ रु. , ८७९ रु.
C. ६७२ रु. , ८५९ रु
D. ९५४ रु. , १००४ रु.


C. ६७२ रु. , ८५९ रु

प्र ३.}  २००९-१० च्या सुरेश तेंडूलकर समितीच्या अहवालानुसार महाराष्ट्रात दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण किती आहे ?

A. ३८.२%
B. २४.५%
C. ४८.३%
D. १८.७%


B. २४.५%

प्र ४.} कोणत्या योजनेमध्ये बदल करून जवाहर ग्राम समृद्धी योजना सुरु करण्यात आली ?

A. जवाहर रोजगार योजना
B. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना
C. १ आणि २ दोन्ही
D. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना


A. जवाहर रोजगार योजना

प्र ५.} १ एप्रिल १९९९मध्ये  सहा योजनांचे एकत्रीकरण करून स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरु करण्यात आली. खालीलपैकी कोणती योजना त्या ६ योजनांपैकी नाही.

A. IRDP
B. TRYSEM
C. DWCRA
D. ICDS


D. ICDS

प्र ६.}  योग्य विधाने ओळखा.

अ] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत देशाच्या मानव विकास निर्देशांकात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
ब] १९९९-२००० ते २००७-०८ या कालावधीत महाराष्ट्राच्या मानव विकास निर्देशांकात १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. एकही नाही
D. वरील दोन्ही


D. वरील दोन्ही

प्र ७.} सहस्त्रकालीन चिकास उद्दिष्ठासंबंधी अयोग्य विधाने ओळखा.

अ] १९९० ते २०१५ दरम्यान राष्ट्रीय दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण निम्म्यावर आणणे.
ब] १९९० ते २०१५ दरम्यान पाच वर्षाखालील बालमृत्यूचे प्रमाण दोन तृतीयांशने कमी करणे.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. एकही नाही
D. वरील दोन्ही


C. एकही नाही

प्र ८.}  अयोग्य विधाने ओळखा.

अ] राज्य शासनाने २००५ साली राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन अधिनियम पारित केला.
ब] मागील काही वर्षांमध्ये महसुली तुटीचे स्थूल राज्य उत्पन्नाशी असलेले प्रमाण २००७-०८ वर्षी सर्वात कमी होते.

पर्यायः-
A. फक्त अ
B. फक्त ब
C. एकही नाही
D. वरील दोन्ही


C. एकही नाही

प्र ९.}  महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ खालीलपैकी कोणते कार्य करते ?

अ] हस्तकला कारागिरांना मदत.
ब] लघु उद्योगांना आयात निर्यातीसाठी मदत.
क] पैठण व येवला येथे दोन पैठणी केंद्र चालवते.

पर्यायः-
A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व


D. वरील सर्व

प्र १०.}  भांडवल बाजारासंबंधी योग्य विधाने ओळखा.

अ] भांडवल बाजारात मध्यमकालीन तसेच दीर्घकालीन कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालतात.
ब] या बाजारात उद्योजक व्यावसायिक या बाजारात शेअर्स, बॉन्डस वगैरे विकून भांडवलाची उभारणी
करतात.
क] भांडवल बाजार हा फक्त शुक्रवारी जिल्ह्याच्या ठिकाणी भरतो.

पर्यायः-
A. फक्त अ आणि ब
B. फक्त ब आणि क
C. फक्त अ आणि क
D. वरील सर्व


A. फक्त अ आणि ब
Previous Post Next Post