Header Ads

चालू घडामोडी - २४ जून २०१५ [Current Affairs - June 24, 2015]

महाराष्ट्रामध्ये १० स्मार्ट शहरे

 • केंद्र सरकारने राज्य, केंद्रशासित प्रदेशांना स्मार्ट शहरांसाठी आणि ‘अटल मिशन फॉर रिजुविनेशन अँड अर्बन ट्रान्स्फर्मेशन स्कीम’ (अमृत) योजनेंतर्गत तयार होणाऱ्या शहरांसाठी नामांकने देण्यासाठी शहरांची संख्या सांगितली आहे. त्यावरून उत्तर प्रदेशात सर्वाधिक स्मार्ट शहरे तयार होणार असल्याचे समोर आले आहे.
 • केंद्र सरकार २५ जून रोजी स्मार्ट शहरे आणि ‘अमृत’ या योजनांना सुरुवात करणार आहे. 
 • याअंतर्गत उत्तर प्रदेशने मध्ये १३ शहरे विकसित होणार असून, ‘अमृत’ योजनेअंतर्गत ५४ शहरे निवडण्यात आली आहेत. तमिळनाडूमध्ये १२ स्मार्ट शहरे विकसित होणार असून, ३३ शहरे ‘अमृत’ योजनेंतर्गत निवडण्यात आली आहेत. महाराष्ट्रामध्ये १० स्मार्ट शहरे विकसित होण्यासाठी नामांकन करावे लागणार आहे. गुजरात आणि कर्नाटकमध्ये सहा शहरांचे नामांकन स्मार्ट शहरांसाठी करण्यास सांगितले आहे. ‘अमृत’ योजनेंतर्गत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकमध्ये अनुक्रमे ३७, ३१, २१ शहरांचा समावेश केला जाणार आहे.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ जूनला १०० स्मार्ट शहरे, ‘अमृत’ योजनेंतर्गत ५०० शहरे आणि प्रधान मंत्री आवास योजना राबवण्याची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहेत.

नवे रस्ते वाहतूक आणि सुरक्षा विधेयक

  Drunk driving may lead to fine of Rs 10000
 • केंद्र सरकारच्या नव्या रस्ते वाहतूक आणि सुरक्षा विधेयकात दारुड्या वाहन चालकांना चाप लावण्यासाठी परिवहन मंत्रालयाने जबरदस्त दंड आणि कठोर शिक्षेच्या प्रस्तावाचा समावेश आहे.
 • सध्या दारू पिऊन गाडी चालवताना आढळल्यास २ हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. नव्या विधेयकानुसार १० हजार रुपये दंड आणि सहा महिने ते एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे. तसेच एका वर्षासाठी गाडीही जप्त केली जाणार आहे.
 • परिवहन खात्यानं हा प्रस्ताव कायदा मंत्रालय आणि त्यानंतर आता राज्य सरकारांकडे पाठवला आहे.

नव्या विधेयकातील तरतुदी

 • एकापेक्षा अधिक लायसन्स बाळगणाऱ्यांना तसेच एकापेक्षा जास्त लायसन्ससाठी अर्ज करणाऱ्यांना शिक्षा. 
 • विम्याशिवाय गाडी चालवणाऱ्या चालकांना २ हजार रुपये ते एक लाखांपर्यंत दंड. 
 • वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसह वाहनांची सदोष निर्मिती अथवा चुकीचे डिझाइन असल्याचे समोर आल्यास ऑटो कंपन्यांनाही दंडात्मक शिक्षेची तरतूद. 
 • वाहनांची चुकीची डिझाइन असल्याचे आढळल्यास ५ लाखांपर्यंत दंड आणि संबंधित गाडी परत घेण्यास नकार दिल्यास तीन महिन्यांची शिक्षा अथवा गाडीच्या किमती इतकीच दंडाची तरतूद. 
 • एखाद्या मुलाच्या अपघाती मृत्यूला जबाबदार असलेल्या चालकाकडून जबरदस्त दंडवसुली. 
 • वारंवार वाहतूक नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स कायमचेच रद्द होणार.

स्टेफी ग्राफ केरळ पर्यटन व आयुर्वेदाची अँबॅसेडर

  Steffi Graf
 • महान टेनिसपटू स्टेफी ग्राफची केरळ पर्यटन व आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
 • मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केरळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. स्टेफी ग्राफ बरोबर करार करण्यासाठी केरळच्या पर्यटन मंत्रालयाने आवश्यक मंजुरी दिली आहे.
 • आता स्टेफी ग्राफ विदेशात केरळच्या आयुर्वेद उपचारांचा प्रसार आणि प्रचार करताना दिसणार आहे.
 • निर्सगाचे भरभरुन देणे लाभलेल्या केरळमध्ये आयुर्वेदीक औषधे मोठया प्रमाणावर आहेत. येथील आयुर्वेदीक उपचारांचा परिणाम लगेच दिसून येत असल्याने, देश-विदेशातून मोठया संख्येने नागरीक येथे आयुर्वेदिक उपचारांसाठी येत असतात.
 • स्टेफी ग्राफच्या नावावर २२ ग्रॅण्डस्लॅम जेतेपदे आहेत. ४६ वर्षीय स्टेफीने १९९९ मध्ये टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर ऑक्टोंबर २००१ मध्ये तिने माजी अव्वल टेनिसपटू आंद्रे आगासीबरोबर विवाह केला.

जयललिता यांच्या मुक्ततेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

  Jayalalitha
 • ज्ञात स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या मुक्ततेला कर्नाटक सरकारने २३ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 
 • कर्नाटक उच्च न्यायालयाने अलीकडेच जयललिता, त्यांच्या निकटस्थ मैत्रीण शशीकला आणि अन्य दोघांना निर्दोष ठरविले होते.
 • कर्नाटक उच्च न्यायालयाने ११ मे रोजी आकड्यांतील त्रुटींच्या आधारे जयललिता आणि अन्य तिघांना मुक्त करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तो रद्द करीत जयललिता यांना पुन्हा अपात्र घोषित केले जावे, असे कर्नाटक सरकारचे वकील जोस अ‍ॅरिस्टॉटल यांनी विशेष याचिकेत म्हटले. 
 • न्यायालयाने कर्जाची आकडेवारी जुळवताना चूक केली. जयललिता यांना उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतामार्फत मिळविलेली एकूण संपत्ती १६ कोटी १३ लाख एवढी असताना उच्च न्यायालयात केवळ २ कोटी ८२ लाख एवढीच संपत्ती दर्शविण्यात आली.

‘सेंड’ केलेला ‘जी-मेल’ करता येणार ‘अन-डू’

  G-mail send undo
 • ‘जीमेल’ने पाठविलेली ई-मेल परत घेण्याची नवी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गुगलनं त्यासाठी जी मेलच्या इनबॉक्समध्ये ‘सेंड अन-डू’ हा पर्याय दिला आहे. त्याद्वारे तुम्ही कोणताही मेल ३० सेकंदाच्या आत अन-डू करता येईल. 
 • गुगलनं हा टूल सहा वर्षांपूर्वीच विकसित केला होता. मात्र त्याचा वापर जीमेलच्या पब्लिक बीटा आवृत्तीवर मर्यादित होता. मात्र जी-मेलने आता ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. 
 • ज्या युजर्सना यापूर्वीच अशी सुविधा उपलब्ध आहे, त्यांनाही ती पुढे अशीच सुरु राहणार आहे. तसेच ज्यांना ही सुविधा उपलब्ध नाही त्यांना ‘सेटिंग’ मधून ही सुविधा सुरु करणे आवश्यक आहे. 
 • ही सुविधा २००९ मध्ये सर्वप्रथम सुरु करण्यात आली होती. त्यावेळी केवळ ५ सेकंदांसाठी पाठविलेली ई-मेल थांबविण्याची सोय देण्यात आली होती. मात्र आता युजर्सना त्यासाठी ५, १०, २० किंवा ३० सेकंदांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी जागतिक बॅंकेने ५० कोटी डॉलरचा निधी

 • भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या नेपाळच्या पुनर्बांधणीसाठी जागतिक बॅंकेने ५० कोटी डॉलरचा निधी उभारला असून, यातील वीस कोटी डॉलर हे घरांच्या उभारणीवर खर्च केले जाणार असून, अन्य दहा कोटी डॉलर थेट नेपाळ सरकारला रोख स्वरूपात दिले जाणार आहेत. आणखी दहा ते वीस कोटी डॉलरचा निधी अन्य प्रकल्पांकडून पुनर्बांधणीच्या कार्याकडे वळविला जाणार आहे. 
 • भूकंपामुळे नेपाळचे ६.६ अब्ज डॉलरचे नुकसान झाले असून, ते भरून काढण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी लागेल. 
 • जागतिक बॅंक आणि आशियायी विकास बॅंकेने नेपाळला मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद उपलब्ध करून दिली आहे. 

उत्पन्नामध्ये घसरण

 • नेपाळमधील चारपैकी एका नागरिकाचे रोजचे उत्पन्न हे १.२५ डॉलरपेक्षाही कमी आहे. तसेच भूकंपामुळे देशातील गरिबांची संख्या सात लाखांच्या घरात पोचली आहे. 
 • जागतिक बॅंकेलाही निधीची चणचण भासत असल्याने नेपाळला मिळणाऱ्या निधीचा ओघ काहीसा कमी झालेला दिसून येतो. मागील वर्षी आफ्रिकी देशांना इबोला विषाणूचा सामना करण्यासाठी जागतिक बॅंकेने चाळीस कोटी डॉलरचा निधी उपलब्ध करून दिला होता.

युरोपातील सर्वांत वृद्ध नझरसिंग यांचे निधन

 • युरोपमधील सर्वांत वृद्ध असलेले नझरसिंग (वय १११) यांचे नुकतेच निधन झाले. 
 • मात्र नझरसिंग यांचा जन्मदाखला नसल्यामुळे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ने त्यांची दखल घेतली नाही.
 • पंजाबमध्ये ८ जून १९०४ रोजी नझरसिंग यांचा जन्म झाला होता. नझरसिंग यांच्या वाढदिवसाला ब्रिटनची राणी शुभेच्छा देत असे.
 • वयाच्या १०७व्या वर्षांपर्यंत नझरसिंग बागकाम करीत होते आणि त्यांच्यावर कधी कोणती शस्त्रक्रियाही झाली नाही. १९६५ मध्ये ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. तेथे कामगार म्हणून त्यांनी काम केले.

ज्येष्ठ पत्रकार प्रफुल बिडवई यांचं निधन

 • ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रफुल बिडवई (वय ६६) यांचे २४ जून रोजी अॅमस्टरडॅम येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
 • बिडवई हे अॅमस्टरडॅम येथे एका परिषदेत सहभागी होण्यासाठी गेले होते. तिथंच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. 
 • तब्बल चार दशके पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या बिडवई यांचा राजकीय, सामाजिक व आर्थिक प्रश्नांचा दांडगा अभ्यास होता. 
 • बिडवई यांनी पर्यावरण संरक्षण, मानवी हक्क आणि वैश्विक न्याय आदी प्रश्नांवर कार्यकर्ते म्हणून मोलाचे काम केले होते. नर्मदा बचावसह देशातील अनेक महत्त्वाच्या आंदोलनात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. 
 • १९७२मध्ये त्यांनी लिहिलेल्या ‘इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल विकली’ या सदरामुळं पत्रकारितेत त्यांची ओळख निर्माण झाली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फायनान्शियल एक्स्प्रेस’, ‘बिझनेस इंडिया’सह विविध मासिकांत त्यांनी काम केले होते. 
 • राजकीय, आर्थिक, औद्योगिक धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध, अणुऊर्जा, पर्यावरण विकास, राष्ट्रवाद आणि साम्यवाद, सायन्स आणि तंत्रज्ञान आदी विषयांवर त्यांनी लिखाण केले होते.

!!! जय महाराष्ट्र !!!