लेटेस्ट चालू घडामोडी

Monday, November 30, 2015

चालू घडामोडी - ३०,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 30, 2015]

पी.व्ही.सिंधूने पटकावले मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद

  बाराव्या असलेल्या सिंधूने अप्रतिम स्ट्रोक्‍स; तसेच मोक्‍याच्या वेळी बहारदार रॅली करीत तीन गेममध्ये बाजी मारली.

 • तसेच तिने निर्णायक लढतीत जपानच्या मिनात्सु मितानी हिचा 21-9, 21-23, 21-14 असा पाडाव केला.
 • 'एक भारत श्रेष्ठ भारत' योजनेची घोषणा
  • असहिष्णुतेच्या मुद्द्यावर देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'मन की बात' या कार्यक्रमाद्वार 'एक भारत श्रेष्ठ भारत' या योजनेला मूर्त रूप देण्याची घोषणा केली.
  • पंतप्रधान मोदींनी 31 ऑक्‍टोबरला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी 'एक भारत, श्रेष्ठ भारत' अभियानाचे सुतोवाच केले होते.
  • देशात ऐक्‍याचा प्रवाह सदैव वाहता राहावा यासाठी 'एक भारत, श्रेष्ठ भारत' ही योजना राबविली जाणार आहे.
  • या योजनेची रूपरेषा, जनतेची भागीदारी याबाबतच्या सूचना, अभिप्राय 'मायजीओव्ही' या वेबसाइटवर पाठवाव्यात, असेही आवाहन केले होते.

  लोकपाल विधेयकाचा मसुदा संसदीय समितीने तयार केला

  • तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या बहुचर्चित लोकपाल विधेयकाचा मसुदा संसदीय समितीने तयार केला असून, या मसुद्याची अंतिम प्रत पुढील महिन्यात राज्यसभेत सादर करण्यात येईल.
  • काँग्रेसचे खासदार ई. एम. सुदर्शन नचिप्पन यांच्या अध्यक्षतेखालील 31 सदस्यीय जनलवाद, कायदा आणि न्यायविषयक समितीने लोकपाल, लोकायुक्त आणि अन्य दुरुस्तीविषयक विधेयक-2014 चा सखोल अभ्यास केला होता.
  • या सर्व सदस्यांचे मत लक्षात घेतल्यानंतर 10 डिसेंबरपूर्वीच यासंबंधीचा अंतिम अहवाल राज्यसभेत सादर केला जाणार आहे.
  • तसेच मागील वर्षी 18 डिसेंबर रोजी सुधारित विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर ते समितीकडे पाठविण्यात आले. यावर्षी 25 मार्चपर्यंत समितीने या विधेयकावर आपले मत नोंदविणे अपेक्षित होते. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्याकडे यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.

  पॅरिसमध्ये आजपासून जागतिक हवामान बदलांविषयक परिषदेला सुरूवात

  • पॅरिसमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या जागतिक हवामान बदलांविषयक परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह देशोदेशीचे नेते उपस्थित राहणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेसाठी पॅरिसला रवाना झाले आहेत. या परिषदेत भारत सरकार अपारंपरिक ऊर्जास्रोतांबाबत ग्रॅंड प्लॅन सादर करणार आहे.
  • परिषदेच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद यांच्यामध्ये 122 करार होणार असून, मोदी आणि बराक ओबामा यांच्यामध्येही चर्चा होणे अपेक्षित आहे.
  • तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारताने हवामान बदलांविषयीचा कृती आराखडा सादर केला होता.

  भारताची परिषदेतील भूमिका

  1. सौर महाआघाडीची स्थापना
  2. हवामानविषयक न्याय्य करार
  3. तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भागीदारीसाठी बळ देणे
  4. विकसित देशांकडून तंत्रज्ञान आणि निधी मिळविण्यावर भर
  5. परवडणाऱ्या किमतीत हवामान तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी आग्रही
  6. 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 2-3 अब्ज टनांनी घटविण्याचा प्रस्ताव
  7. परंपरा, संवर्धन आणि सुधारणांवर आधारित निरोगी आणि शाश्‍वत जगण्याचा प्रस्ताव
  8. श्रीमंत देशांकडून निधी गोळा करून त्याचा सदुपयोग करणे

  संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत

  • संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
  • वयाच्या साठीनंतर लोकांनी आपल्या निवृत्तीचा विचार करायला हवा. मी येत्या 13 डिसेंबरला साठ वर्षांचा होतोय. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच यासंदर्भात विचार करणं सुरू केलं होतं, असे मनोहर पर्रिकर गोव्यातील मापुसा शहरात लोकमान्य को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या कार्यक्रमात म्हणाले.

  जपानचे भारताला रेल्वेसाठी कर्ज देण्याचे जाहीर

  • जपानने भारताला चेन्नई व अहमदाबाद मेट्रो रेल्वेसाठी 5479 कोटी रूपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे, असे अर्थ मंत्रालयाने सांगितले.
  • दोन्ही देशांनी या करारावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या असून चेन्नई मेट्रोला 1069 कोटी तर अहमदाबाद मेट्रोला 4410 कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
  • काही वर्षांत भारत-जपान यांचे आर्थिक सहकार्य वाढले असून त्यात धोरणात्मक भागीदारीचा सहभाग वाढला आहे. भारत व जपान यांच्यात आर्थिक कामकाज सचिव एस. सेल्वाकुमार व जपानचे उपराजदूत युकाटा किकुटा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

  Wednesday, November 25, 2015

  चालू घडामोडी -२३व२४,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 23and24, 2015]

  महानगरांसाठी धोक्‍याची घंटा

  • मुंबई आणि पॅरिसमधील दहशतवादी हल्ल्यांत काही प्रमाणात साम्य असले तरी वेगळेपणा व फरकही होता.
  • एक-दोघे जण अल्जीरिया या पूर्वीच्या फ्रेंच वसाहत असलेल्या देशाचे असल्याची माहितीही मिळाली आहे.
  • महानगरी सुरक्षा व्यवस्थेचा स्वतंत्रपणे विचार करण्यास जी सुरवात झाली; तसेच त्यासाठी तज्ज्ञांशी सल्लामसलत, मार्गदर्शन आणि तत्सम सुरक्षा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबतही संबंधित राज्यांना अधिक आर्थिक मदत करण्याचे जे काम आधीपासूनच सुरू झाले आहे, त्याला गती देण्याची वेळ आली आहे.
  • सहा शहरांसाठी महानगरी पोलिस व सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, बंगळूर या शहरांचा त्यात समावेश आहे.
  • सीसीटीव्ही (क्‍लोज सर्किट टीव्ही), गोपनीय माहिती संकलन आणि विश्‍लेषण केंद्र, सुरक्षा यंत्रणांबरोबरची संपर्क यंत्रणा (उदा. पोलिस - 100 क्रमांक), हवाई टेहळणी यंत्रणा (हेलिकॉप्टर्स, मानवरहित वाहने - यूएव्ही), महामार्ग किंवा हमरस्त्यांवरील गस्त तसेच महानगरांतर्गत गस्त व देखरेख, टेहळणी व पाळत यंत्रणा, सामाजिक पोलिस व्यवस्था किंवा कम्युनिटी पोलिसिंग म्हणजेच जागरूक नागरिकांचे साह्य घेऊन समाजविरोधी व संभाव्य दहशतवाद्यांवर नजर ठेवणे, पाळत ठेवणे, पोलिस दलांना आधुनिक प्रशिक्षण, महिला पोलिस, पोलिस दलांच्या दृष्टिकोनात सुधारणा व बदल करण्याचे प्रशिक्षण असे महानगरीय सुरक्षा व्यवस्थेचे मूलभूत घटक मानले जातात.

  दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पुढच्याच वर्षी मदत

  • राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खरीप अनुदानाच्या मदतीसंदर्भात डिसेंबरअखेर केंद्र शासन घोषणा करेल.
  • जानेवारीत ही मदत शेतकऱ्यांना मिळेल, अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी रविवारी (ता. 22) पत्रकार परिषदेत दिली.
  • केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाने २०व२१ रोजी मराठवाड्यासह राज्याचा दौरा केला. राज्य शासनाने केंद्राला ४ हजार २ कोटींचा प्रस्ताव सादर केला, यानंतर तीनच दिवसांत पथक पाठविण्याचा निर्णय केंद्राने घेतला.
  • आतापर्यंतच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले. केंद्रीय पथकाकडून झालेली या वर्षातील ही पहिलीच पाहणी आहे.
  • फळपिकांचे नुकसान होणार आहे किंवा झालेले आहे, त्यांचे दोन भाग केले आहेत. त्यातील एक म्हणजे फळपिके पुनर्जीवन. त्यासाठी एक योजना तयारी केली असून केंद्राकडे निधी मागितला आहे.
  • दुसरा भाग म्हणजे पूर्ण नुकसान झालेल्यांना जूनपासून नव्याने लागवड करण्यासाठी 'मनरेगा'च्या माध्यमातून शंभर टक्‍के अनुदान शासन देईल.

  कवी जयंता महापात्रा "पद्मश्री' परत करणार

  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कवी आणि साहित्यिक जयंता महापात्रा यांनी आज देशातील वाढत्या नैतिक विषमतेविरुद्ध नाराजी व्यक्त करीत 'पद्मश्री‘ पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला.
  • विरोध दर्शविण्यासाठी मी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र पाठवून पद्मश्री पुरस्कार परत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे महापात्रा यांनी दूरध्वनीवरून वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
  • मतदारांच्या बोटावर आता मार्करचे निशाण
   • मतदान केल्यानंतर मतदाराच्या पहिल्या बोटावर खूण करण्यासाठी केला जाणारी शाई आणि ब्रशचा वापर आता लवकरच इतिहासजमा होणार असून, त्याजागी मार्करचा वापर केला जाऊ शकतो.
   • सध्या निवडणूक आयोगाकडून म्हैसूर पेंट्‌स या कंपनीने तयार केलेल्या मार्कर पेनाची चाचणी घेतली जात आहे.
   • साधारणपणे १९६२ पासून बोटावरून सहजासहजी पुसल्या जाणाऱ्या अशा शाईचा वापर केला जात आहे.
   • शाईच्या बाटल्यांपेक्षा मार्करसोबत बाळगणे आणि ते साठवून ठेवणे अधिक सोपे असल्याने निवडणूक आयोग त्यांच्या वापराबाबत आग्रही आहे.
   • याआधी अफगाणिस्तानामध्ये झालेल्या निवडणुकीत म्हैसूर पेंटने तयार केलेल्या मार्कर पेनचा वापर करण्यात आला होता.

  जोकोविचने पटकावले एटीपी वर्ल्ड टूर टायटल्सचे जेतेपद

   • एटीपी वर्ल्ड टूर टायटल्सच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररला नमवून नोवाक जोकोविचने स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.
   • या स्पर्धेचा माजी विजेता असलेल्या स्वित्झर्लँडच्या फेडररचा सर्बियाच्या जोकोविचने 6-3,6-4 असा पराभव करत पुरूष एकेरीचे जेतेपद सलग चौथ्यांदा पटकावत यावर्षाची विजयी सांगता केली.
   • सलग चार वर्ष घरी विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जाणारा जोकोविच हा ४६ वर्षातूल पहिलाच खेळाडू ठरला आहे.
   • २८ वर्षीय जोकोविचने यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या फायनलमध्ये अँडी मरेचा तर विम्बल्डन व यू.एस ओपनमध्ये रॉजर फेडररचा पराभव करत तीन ग्रँड स्लॅम स्पर्धेची विजेतेपदे पटकावली.
   • फ्रेंच ओपनमध्ये स्टॅन वावरिंकाने त्याचा पराभव केल्याने त्याचे चौथे ग्रॅंडस्लॅमपद हुकले.  

  प्रशांत दामले यांना दीनानाथ पुरस्कार जाहीर

   • प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी दिला जाणारा 'मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
   • हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
   • ‘कार्टी काळजात घुसली’चा १००वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या वेळी घोषणा करण्यात आली.
   • प्रशांत दामले हे उत्तम कलाकार आहेत आणि त्यांनी मराठी रंगभूमीची गेली तीन दशके अविरत सेवा केली आहे.
   • हा पुरस्कार देताना प्रशांत यांचे वय कमी असल्याचा मुद्दा उपस्थित झाला, पण कमी वयातही त्यांनी केलेली कामगिरी मोठी आहे. त्यामुळे पुरस्कारासाठी त्यांचीच निवड योग्य असल्याचे हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले.

  मजबूत लढाऊ ड्रोन विमानाची चीनकडून निर्मिती

   • चीनने अत्यंत मजबूत असे लढाऊ ड्रोन विमान तयार केले असून ते टेहळणीही करू शकणार आहे.
   • हे ड्रोन विमान निर्यात बाजारपेठेचे आकर्षण ठरले आहे. याच वर्षी चीनने या ड्रोन विमानाचे उड्डाण यशस्वी केले असून ते तीन हजार किलोचे वजन सहज वाहून नेऊ शकते.
   • चीनच्या लष्कराने सीएच५ हे लढाऊ व टेहळणी ड्रोन सादर केले असून ते चायना अ‍ॅकॅडमी ऑफ एरोस्पेस अँड एरोडायनॅमिक्स या संस्थेने तयार केले आहे.
   • त्याचे उत्पादन मात्र चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कार्पोरेशन या ग्वांगडाँग राज्यातील शेनझेन येथे असलेल्या कंपनीने केले आहे.
   • इतर लष्करी ड्रोनशी तुलना करता चीनचे सीएच ५ हे लष्करी ड्रोन विमान ३००० किलो वजन व ९०० किलो साधनसामग्री वाहून नेऊ शकते. इतर ड्रोन विमाने केवळ १५०० किलो वजन वाहून नेऊ शकतात.
   • त्याची वजन वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्याने जास्त टेहळणी सामग्री त्यावर ठेवता येते व ते ड्रोन विमान ८० कि.मी.च्या त्रिज्येत कुठेही फिरू शकते, असे या अ‍ॅकॅडमीचे अभियंता लॅन वेन्बो यांनी सांगितले.
   • प्रगत रडार त्यावर ठेवता येते व ते रडार जाड भिंतीमागे लपलेल्या अतिरेक्यांनाही शोधू शकते.

  चालू घडामोडी -२४,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 24, 2015]

   

  देशातील स्मार्ट शहरांसाठी इस्राईलची मदत

  • केंद्र सरकारच्या'स्मार्ट सिटी' योजनेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी मदत करणाऱ्या 'डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन सर्व्हिसेस' (डीसीएफ) आणि इस्राईलमधील तेल अविव-याफो महापालिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तेल अविव-याफो शिक्षण महाविद्यालयादरम्यान सहकार्य करार झाला आहे.
  • भारतातील शहरांचे 'स्मार्ट सिटी'मध्ये रूपांतर घडवून आणण्याच्या प्रक्रियेला आता इस्राईलच्या जगभरात नावाजल्या गेलेल्या 'स्मार्ट सिटी' प्रकल्पातील तज्ज्ञांचे सहकार्य मिळणार आहे.
  • तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवरील सार्वजनिक क्षेत्रात कामगिरी व्यवस्थापन, प्रकल्प व्यवस्थापन व देखरेख यासाठी मलेशियाच्या पंतप्रधान कार्यालयांतर्गत येणाऱ्या 'द परफॉरमन्स मॅनेजनेंट डिलिव्हरी युनिट' (पेमांडू) आणि भारताचा निती आयोग यांच्यात आज सहकार्य करार करण्यात आला.

  भारत आणि मलेशिया तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी

  • द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने पुढील पाऊल टाकत भारत आणि मलेशिया या देशांनी सायबर सुरक्षा, सांस्कृतिक देवाण-घेवाणीसह योजना आणि अंमलबजावणी अशा तीन सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब तुन रझाक यांच्या उपस्थितीत हे करार झाले.
  • भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद पथक (सर्ट-इन) आणि मलेशियामधील सायबर सुरक्षा या संस्थांमध्ये झालेल्या करारानुसार सायबर सुरक्षेसंदर्भात तांत्रिक साहाय्य करणे, सायबर हल्ल्यांची माहिती देणे, धोरणात्मक चर्चा करणे असे ठरविण्यात आले आहे.
  • दोन्ही देशांच्या सांस्कृतिक मंत्रालयांदरम्यान झालेल्या देवाण-घेवाणीच्या करारांतर्गत शिष्टमंडळाचे नियमित दौरे, कला प्रदर्शन भरविणे, तज्ज्ञ व्यक्तींचा परिषदांमधील सहभाग वाढविणे, अशा मुद्यांना मान्यता देण्यात आली आहे.

  मार्च 2016पर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू

  • तमिळनाडू वगळता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मार्च 2016पर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू करण्याची तयारी दर्शविली आहे.
  • सद्यःस्थितीत महाराष्ट्रासह केवळ चौदा राज्यांमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होत आहे.
  • देशभरातील सर्व राज्यांच्या अन्न सचिवांची परिषद आज दिल्लीत झाली.
  • 2013 मध्ये संसदेने अन्नसुरक्षा कायदा मंजूर केल्यानंतर सर्व राज्यांमध्ये लागू करण्याची मुदत आतापर्यंत तीन वेळा वाढविण्यात आली होती.
  • त्यातील शेवटची मुदत सप्टेंबरअखेर संपली.
  • त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या अन्न सचिवांच्या बैठकीमध्ये तमिळनाडू वगळता सर्व राज्यांनी मार्च 2016पर्यंत अंमलबजावणीस होकार दिला आहे.
  • यातील उत्तर प्रदेश, मेघालय, जम्मू-काश्‍मीर आणि अंदमान-निकोबारमध्ये जानेवारीअखेरपर्यंत अन्नसुरक्षा कायदा लागू होणार आहे.
  • तर उर्वरित गुजरात, केरळ, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोराम, नागालॅंड हे मार्चपर्यंत लागू करतील.
  • तमिळनाडूमध्ये सरसकट सर्वांसाठी स्वस्त दरात धान्यपुरवठा करण्याची योजना सुरू असल्याने अन्नसुरक्षा कायदा लागू करणे शक्‍य नसल्याचे या राज्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे पासवान म्हणाले.

  भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मालिका श्रीलंकेमध्ये :

  • भारत आणि पाकिस्तानमधील बहुचर्चित द्विपक्षीय क्रिकेट मालिका श्रीलंकेमध्ये घेतली जाऊ शकते, असे वृत्त 'क्रिकइन्फो'ने दिले आहे.
  • अर्थात, दोन्ही बाजूंकडून यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान हे दोघेही दुबईत आहेत.
  • यासंदर्भातील अधिकृत घोषणा २७ नोव्हेंबरला केली जाईल.
  • यापूर्वी भारताने २००६ मध्ये शेवटचा पाकिस्तान दौरा केला होता.
  • तर २००७ नंतर पाकिस्तानने द्विपक्षीय मालिकेसाठी भारताचा दौरा केलेला नाही.

  महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची भारतरत्नासाठी शिफारस

  • महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने त्यांच्या नावांची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

  सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचला सलग चौथ्यांदा विजेतेपद

  • सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेचे सलग चौथ्यांदा विजेतेपद पटकावित या मोसमाची अखेर विजेतेपदाने केली.
  • जोकोविचने अंतिम फेरीत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचा 6-3.6-4 असा पराभव केला.
  • जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या जोकोविचने आपला विजेतेपदाचा धडाका कायम ठेवला आहे.
  • एटीपी वर्ल्ड टूर फायनल्स टेनिस स्पर्धेच्या४६ वर्षांच्या इतिहासात सलग चौथ्या वर्षी विजेतेपद मिळविणारा जोकोविच हा पहिला टेनिसपटू आहे.
  • यापूर्वी पीट सॅम्प्रास आणि इव्हान लेंडल यांनी पाच वेळा आणि रॉजर फेडररने सर्वाधिक सहावेळा या स्पर्धेचे विजेतेपद मिळविलेले आहे.
  • जोकोविचचे या वर्षातील हेअकरावे विजेतेपद आहे.
  • त्याने या वर्षात खेळलेल्या ८८ सामन्यांपैकी ८२ सामन्यांत विजय मिळविलेला आहे.

  मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रशांत दामले यांना जाहीर

  • प्रदीर्घ नाट्यसेवेसाठी दिला जाणारामास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा प्रशांत दामले यांना जाहीर झाला आहे.
  • हृदयनाथ मंगेशकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली.
  • 'कार्टी काळजात घुसली'चा 100वा प्रयोग दीनानाथ नाट्यगृहात झाला. त्या वेळी घोषणा करण्यात आली.
  • पुरस्कारांचे वितरण एप्रिलमध्ये मास्टर दीनानाथ यांच्या पुण्यतिथीदिनी गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार आहे.

  कार्मिक मंत्रालयाच्या शिफारशी

  • अनुसूचित जाती-जमाती व मागास जातीतील मुलांना जातीचा व अधिवासाचा दाखला मिळण्यात असंख्य अडचणी येत असल्याने यापुढे त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावरच दलित असा शिक्का मारला जाण्याची शक्यता आहे.
  • सरकारने त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
  • सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील शाळांना अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना अधिवास व जात प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे.
  • मुले आठवीत शिकत असतानाच त्यांना शाळेने हे प्रमाणपत्र द्यायचे आहे.

  स्वीडनमधील वैज्ञानिकांचे संशोधन

  • स्वीडनमधील वैज्ञानिकांनी वनस्पतींमध्ये काही सर्किट्स (मंडले) प्रत्यारोपित करून त्यातील पोषके व जलवाहक वाहिन्यांच्या प्रणालीत बदल केले व त्यातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने गुलाबाच्या रोपाची निर्मिती करण्यात आली आहे.
  • वनस्पती व इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान यांचा संगम यात पाहण्यास मिळतो.
  • स्वीडनच्या लिंकोपिंग विद्यापीठातील वैज्ञानिकांनी वनस्पतींमध्ये डिजिटल व अ‍ॅनॅलॉग सर्किट्स प्रत्यारोपित केली आहेत.
  • या प्रकाराला सायबोर्ग वनस्पती असे म्हणता येते.
  • लॅबोरेटरी ऑफ ऑर्गनॅनिक इलेक्ट्रॉनिक्स या संस्थेचे प्राध्यापक मॅग्नस बेरग्रेन यांनी जैविक गुलाबातील काही घटक वापरून प्रथम इलेक्ट्रॉनिक मंडल (सर्किट) तयार केले.
  • त्यात वायर्स, डिजिटल लॉजिक, डिस्प्ले यांचा वापर करण्यात आला होता. वनस्पतींची रचना गुंतागुंतीची असते व त्यांच्यात आयनाच्या स्वरूपातील संदेश व संप्रेरके विशिष्ट कार्ये घडवून आणत असतात.
  • पण त्यांच्या या क्रिया फार हळूहळू चालत असतात. वनस्पतींमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किट वापरल्याने त्यांची ही कार्यक्षमता वाढली व विद्युत संदेश तसेच रासायनिक अभिक्रिया यांची सांगड वेगाने घातली जाऊ लागली.
  • वनस्पती व इलेक्ट्रॉनिक्स यांचा संबंध जोडणारे संशोधन यापूर्वी झालेले नाही.
  • सायन्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
  • यातून आगामी काळात ऊर्जा देणाऱ्या वनस्पती तयार करता येणार आहेत.

  Saturday, November 21, 2015

  चालू घडामोडी -२१,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 21, 2015]

  ‘गुगल‘ने दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातील चेतन कक्कर नोकरी देऊ केली


  • लोकप्रिय सर्च इंजिन ‘गुगल‘ने दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठातील (डीटीयू) चेतन कक्कर या विद्यार्थ्याला तब्बल1 कोटी 27 लाख रुपयांच्या वार्षिक वेतनाची नोकरी
  • विद्यापीठाच्या इतिहासातील हा नवा विक्रम ठरला आहे.
  • यापूर्वी विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याला 93 लाख रुपयांचे वार्षिक वेतन मिळाले होते.
  • २०१६ मध्ये त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तो कॅलिफोर्नियातील "गुगल"मध्ये रूजू होईल.

  कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा करावी लागणार

  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला, तरी त्याची अंमलबजावणी राज्यात लगेच होणार नाही.
  • राज्याच्या आर्थिक परिस्थितीत उत्पन्नाचे स्रोत आणि त्याचा तिजोरीवर पडणारा भार या बाबी तपासण्यासाठी राज्य सरकारला समिती स्थापन करावी लागणार आहे.
  • त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एक किंवा दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे वित्त विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे.
  • राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना एक जानेवारी १९९६ रोजी पाचवा वेतन आयोग लागू करण्यात आला.
  • सन २००६ साली सहावा आणि आता येत्या १ जानेवारी२०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
  • परंतु वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यापूर्वी राज्याची आर्थिक परिस्थिती, उत्पन्नाचे स्रोत, तिजोरीवरील अतिरिक्‍त ताण या बाबींचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून समिती स्थापन केली जाते.
  • सहावा वेतन आयोग लागू करताना हकीम समितीची नेमणूक करण्यात आली होती.
  • याच धर्तीवर आताही समिती नेमण्यात येणार आहे.
  • या समितीचा अहवाल मिळण्यासाठी वर्ष-दीड वर्षाचा कालावधी अपेक्षित आहे.
  • या पार्श्वभूमीवर येत्या एक जानेवारी २०१६ पासून राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींसाठी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

  स्वाती दांडेकर यांची एडीबी कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती

  • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी भारतीय वंशाच्या अमेरिकी राजकीय नेत्या स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे.
  • या पदाचा दर्जा राजदूताप्रमाणे असल्याचे मानले जाते.
  • ६४ वर्षीय स्वाती दांडेकर आता२०१० पासून बॅंकेचे कार्यकारी संचालक असलेले रॉबर्ट एम. आर. यांची जागा घेतील.
  • राज्य प्रतिनिधी सभेच्या सदस्य बनलेल्या स्वाती या भारतीय वंशाच्या पहिल्या अमेरिकी नागरिक आहेत.
  • ओबामा यांनी अन्य प्रशासकीय नियुक्‍त्यांबरोबरच अमेरिकेतील आशियाई विकास बॅंकेच्या मुख्य पदासाठी स्वाती यांच्या निवडीची घोषणा केली.
  • कनिष्ठ सभागृहासाठी झालेली निवडणूक जिंकणाऱ्या स्वाती या भारतात जन्मलेल्या पहिल्या अमेरिकी नागरिक आहेत.
  • त्यांनी २००३ ते २००९ या कालावधीत राज्याच्या प्रतिनिधी सभागृहात सदस्य म्हणून काम केले आहे.
  • त्याशिवाय२००९ ते २०११ या काळात त्या राज्य सीनेटच्याही सदस्य होत्या.

  "भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने"ला मंजुरी

  • राज्यातील१६ आदिवासी जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळ चौरस आहार देणाऱ्या "भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने"ला गत आठवड्यात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून ही योजना येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.
  • अनुसूचित क्षेत्रातील आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमरतेमुळे स्त्रियांमध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे.
  • या पार्श्वभूमीवर या स्त्रियांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत चौरस आहार देण्यात येणार आहे.
  • यासाठी अंगणवाडी सेविका आपापल्या क्षेत्रातील गरोदर तसेच स्तनदा मातांची यादी तयार करतील.
  • गावपातळीवर ग्रामसभेकडून आहार समितीच्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार.
  • या समितीवर एक गरोदर महिला तसेच स्तनदा मातेचीही निवड करण्यात येणार आहे.
  • गहू तांदूळ, अंडी, सोयाबिन, हिरव्या पालेभाज्या, आयोडिनयुक्त मीठ, गूळ आदींची खरेदी ही सीमती करणार आहे. याशिवाय लाभार्थ्यांची उपस्थिती, आहाराचा दर्जा, स्वच्छता यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी या समितीवर राहील.

  ‘आयएमएफ’ने कृत्रिम चलनाची निर्मिती केली

  • परदेशांशी व्यापार करण्यासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी ‘आयएमएफ’ला परकी चलनसाठा निर्माण करण्याची आवश्‍यकता भासली.
  • त्यामुळे ‘आयएमएफ’ने कृत्रिम चलनाची निर्मिती केली.
  • याला ‘स्पेशल ड्रॉयिंग राइट्‌स’ (एसडीआर) म्हटले जाते.
  • एसडीआरमध्ये जगभर ‘मुक्तपणे वापरण्यायोग्य’ चलनांचा समावेश करण्यात आला.
  • सध्या त्यात अमेरिकी डॉलर, युरो, पाउंड आणि जपानी येन या चार चलनांचा समावेश आहे.
  • आता या चार चलनांमध्ये युआनचा समावेश करण्याचा प्रस्ताव चीनने आयएमएफपुढे ठेवला आहे.
  • आयएमएफनेदेखील सध्या तरी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. आयएमएफमार्फत चलनांचा पंचवार्षिक आढावा घेतला जातो.
  • चालू वर्षाच्या शेवटी वर्षाच्या ‘एसडीआर’चा कालावधी संपत असल्याने 30 नोव्हेंबरला बैठक होणार आहे.
  • आयएमएफच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ७० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मते पडली तर युआनचा एसडीआरमध्ये समावेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.
  • तसे झाल्यास कर्जरचनेत देखील बदल होणार आणि याचा फायदा ग्रीसला देखील होण्याची शक्‍यता आहे.
  • ग्रीस अधिक कर्ज मिळवू शकतो.
  • सध्या ग्रीसवर रु.११.१४ लाख कोटींचे कर्ज आहे, जे त्यांच्या एकूण देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) १७६ टक्के आहे.

  आधार कार्डाची मदत घेऊन सार्वजनिक वितरण

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आधार कार्डाची मदत घेऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार संपविण्यासाठी एक नवी पद्धती सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.
  • सरकारी योजनेचे लाभार्थी ओळखण्यासाठी २०१६ पर्यंत देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानात आधार कार्डावर आधारित बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन पद्धत अवलंबविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेवर केंद्र सरकारने काम सुरू केले आहे.
  • राज्य सरकारच्या मदतीने केंद्राने दिल्लीतील४४ दुकानांसह देशातील ५०हजार वितरण केंद्रावर बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन पद्धत (जैविक वैशिष्ट्यावरुन ओळख पटविण्याचे तंत्र) कार्यान्वित केली आहे.
  • देशात सुमारे ५लाख स्वस्त धान्य दुकाने आहेत.
  • डिसेंबर २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत देशातील सर्व धान्य वितरण केंद्रावर बायोमेट्रिक ऑथेंटिफिकेशन पद्धत सुरू करण्यासाठी संगणकीय यंत्रणा उपलब्ध करुन देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

  नासाच्या वैज्ञानिकांचे संशोधन

  • पृथ्वीबाहेर जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्याच्या हेतूने नासाच्या वैज्ञानिकांनी रसायने ओळखणारा केमिकल लॅपटॉप विकसित केला असून तो सहज कुठेही नेता येण्यासारखा आहे.
  • त्याच्या मदतीने अवकाशात कुठेही असलेली अमायनो आम्ले व मेदाम्ले ओळखता येतात.
  • नासाच्या कॅलिफोíनयातील पॅसेडेनात असलेल्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत या लॅपटॉपची निर्मिती सुरू आहे.
  • या लॅपटॉपच्या मदतीने अवकाशातील रासायनिक नमुन्यांचे विश्लेषण करता येते.
  • नासाच्या जेसिका क्रीमर यांनी सांगितले की, हा लॅपटॉप अवकाशात पाठवला जाणार असून आतापर्यंत पृथ्वीवरून पाठवण्यात आलेले ते सर्वात संवेदनशील यंत्र असणार आहे, ते अमायनो आम्ले व मेदाम्ले यांचे विश्लेषण करू शकेल.
  • स्टार ट्रेकमधील ट्रायकॉर्डरप्रमाणे हा लॅपटॉप असणार असून तो आकाराने लहान असणार आहे.
  • कालांतराने हा लॅपटॉप मंगळ ग्रह किंवा युरोपा उपग्रहावरही पाठवता येईल.
  • नेहमीच्या लॅपटॉपइतका त्याचा आकार असला तरी त्याची जाडी मात्र अधिक आहे कारण रासायनिक विश्लेषणासाठी ती जागा आवश्यक आहे.
  • हा रासायनिक लॅपटॉप मात्र रसायनांचे विश्लेषण करणार आहे.

  सीरिया, इराकमधून येणाऱ्या शरणार्थीना प्रतिबंध करणारे विधेयक अमेरिकेत मंजूर

  • रिपब्लिकनांचे वर्चस्व असलेल्या अमेरिकी प्रतिनिधिगृहात सीरिया व इराकमधून येणाऱ्या शरणार्थीना अमेरिकेत प्रवेश देणे तूर्त थांबवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.
  • या शरणार्थीना पॅरिस हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर कठोर तपासणीशिवाय देशात प्रवेश देऊ नये अशी भूमिका यात घेण्यात आली आहे.
  • अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी हे विधेयक नाकारण्याचा इशारा देऊनही ते संमत झाले आहे.
  • इराक व सीरियातून येणाऱ्या शरणार्थीना तूर्त प्रवेश बंदी व त्यांच्यावर कडक तपासणी र्निबध लादणारे हे विधेयक २८९ विरूद्ध १३७ मतांनी मंजूर झाले आहे.

  मानवी हक्कांच्या पायमल्लीबाबत उत्तर कोरियाविरोधात ठराव मंजूर

  • उत्तर कोरियात मानवी हक्कांचे जे उल्लंघन होत आहे त्याचा निषेध करणारा ठराव विक्रमी बहुमताने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत मंजूर करण्यात आला आहे.
  • आता आमसभेच्या पूर्ण अधिवेशनात त्यावर पुढील महिन्यात मतदान होणार आहे.
  • बाकी जगापासून स्वत:ला वेगळे ठेवणाऱ्या उत्तर कोरियात मोठय़ा प्रमाणात मानवी हक्क उल्लंघन होत आहे.
  • त्याबाबतचा ठराव ११२ देशांच्या पाठिंब्याने मंजूर झाला आहे. गेल्यावर्षी तो १११ मतांनी मंजूर झाला होता.

  Friday, November 20, 2015

  ताज्या बातम्या २० नोव्हेबर

  अनीश कपूर यांची नियुक्तीची शिफारस रद्द

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला "हिंदू तालिबान" असे म्हणणारे मूळ भारतीय वंशाचे ब्रिटिश मूर्तिकार अनीश कपूर यांची जवाहर कला केंद्राच्या नियामक मंडळासाठी करण्यात आलेली नियुक्तीची शिफारस अखेर रद्द करण्यात आली आहे.
  • राजस्थानमधील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने तेथील जवाहर कला केंद्राच्या नियामक मंडळासाठी कपूर यांची शिफारस केली होती.
  • कपूर यांनी मोदी यांच्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान "गार्डीयन"मधील एका लेखात भारतातील वर्तमान सरकारला "हिंदू तालिबान शासन" असे संबोधले होते.
  • लेखामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी मोदींसोबत कोणताही करार न करण्याचा सल्लाही कपूर यांनी दिला होता.
  • तसेच, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू तालिबानचा प्रसार होत असल्याचा आरोपही त्यांनी लेखाद्वारे केला होता.
  • कपूर हे मूळ मुंबईचे असून ते ब्रिटनमध्ये प्रसिद्ध मूर्तिकार आहेत.
  • दरम्यान, नेहरू कला केंद्राच्या नियामक मंडळावरील त्यांच्या नियुक्तीची शिफारस रद्द करण्यात आली आहे.
  • त्यांच्यासह इतर११ जणांच्या नावांची १६ नोव्हेंबर रोजी नियामक मंडळासाठी शिफारस करण्यात आली होती.
  • मात्र, शिफारस करण्यात आलेली एकूण १२ जणांची यादीच रद्द करण्यात आल्याची माहिती राजस्थानचे पर्यटनमंत्री कृष्णेंद्र कौर यांनी दिली आहे.

  पश्‍चिम ओडिशातील शेतकऱ्यांसाठी३५ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

  • दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या पश्‍चिम ओडिशातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी ३५ हजार कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर केले आहे.
  • बारगड जिल्ह्यातील सोहेला येथे आयोजित कृषी मेळाव्यामध्ये पटनाईक यांनी या पॅकेजची घोषणा केली.
  • पॅकेजमधील ऐंशी टक्के रक्कम ही कृषिविकासावर खर्च केली जाणार असून, आठ हजार कोटी रुपये जलसिंचन, तेरा हजार कोटी रुपये ग्रामीण भागातील विद्युतीकरण आणि पंधरा हजार कोटी रुपये जलसिंचन प्रकल्पांच्या विकासावर खर्च केले जाणार आहे.
  • तसेच पटनाईक यांनी बारगड जिल्ह्यामध्ये दोन मध्यम स्वरूपाच्या जलसिंचन प्रकल्पांच्या उभारणीची घोषणा केली.
  • यातील एक प्रकल्प ओंग नदीवर उभारला जाणार असून, त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
  • तर दुसरा प्रकल्प जीरा नदीवर उभारण्यात येईल यासाठी तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ नोव्हेंबरपासून मलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ नोव्हेंबरपासूनमलेशिया आणि सिंगापूर दौऱ्यावर जाणार आहेत.
  • या दौऱ्यांमध्ये दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्र संघटनेच्या (आसिआन) तेराव्या शिखर परिषदेला आणि दहाव्या पूर्व आशियाई शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत.

  सर्वांत श्रीमंत व्यावसायिकांच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या दोन तरुण उद्योजकांनी स्थान पटकाविले

  • फोर्ब्ज नियतकालिकाने जाहीर केलेल्या अमेरिकेतील सर्वांतश्रीमंत व्यावसायिकांच्या यादीमध्ये भारतीय वंशाच्या दोन तरुण उद्योजकांनी स्थान पटकाविले आहे.
  • चाळिशीच्या आतील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांची यादी फोर्ब्जने प्रसिद्ध केली आहे.
  • फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्गने या यादीत अव्वल स्थान मिळविले आहे.
  • विवेक रामास्वामी (वय ३०) हा भारतीय वंशाचा तरुण ५० कोटी डॉलरचा मालक असून, तो ३३व्या स्थानावर आहे. गुंतवणूक हा त्याच्या उत्पन्नाचा स्रोत आहे, असे फोर्ब्जने म्हटले आहे.
  • अपूर्व मेहता(वय २९) हा इंस्टाकार्ट या दैनंदिन वापरातील वस्तू पुरविणाऱ्या वेब कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे.
  • त्यांची संपत्ती ४० कोटी डॉलरएवढी असून, तो ४० व्या स्थानावर आहे.

  फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्ट फॅबियस आज भारताच्या दौर्‍यावर

  • भारताने प्रस्ताव केलेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू करण्याबाबत चर्चा करण्यासाठी फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री लॉरेन्ट फॅबियस भारतात येत आहेत.
  • तसेच पॅरिसमध्ये होणाऱ्या आगामी हवामान परिषदेच्या तयारीबाबतही या वेळी सविस्तर चर्चा होणार आहे.
  • या परिषदेच्या तयारीसाठी फॅबियस यांनी आखलेल्या दौऱ्याचा भारत हा पहिला टप्पा आहे.
  • यानंतर ते दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि कॅनडाया देशांचा दौरा करणार आहेत.
  • पॅरिस हवामान परिषद ३०नोव्हेंबर ते११ डिसेंबर यादरम्यान होणार आहे.
  • या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ८० देशांनी प्रमुख सहभागी होणार आहेत.

  भारत आणि चीनने मंत्रीस्तरीय यंत्रणा तयार करण्याचे मान्य

  • सुरक्षाविषयक मुद्यांबाबत सहकार्य आणि समन्वय वाढविण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून भारत आणि चीनने मंत्रीस्तरीय यंत्रणा तयार करण्याचे मान्य केले.
  • गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या यंत्रणेद्वारे दहशतवाद, तस्करी आणि अमलीपदार्थांच्या व्यवसायासारखे प्रश्‍न हाताळण्यात येतील.
  • मंत्रीस्तरीय यंत्रणा उभारल्यानंतर त्याला कराराचे स्वरूप दिले जाऊन हा करार शेन्गुन यांच्या पुढील वर्षी होणाऱ्या भारत भेटीवेळी पूर्ण करण्यात येईल, असे राजनाथसिंह यांनी पत्रकारांना सांगितले.
  • दहशतवाद, सुरक्षा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी आणि अंमलीपदार्थ तस्करी, असे विषय यापुढे याच यंत्रणेमार्फत हाताळले जाणार आहेत.
  • ही मंत्रीस्तरीय समिती दरवर्षी भेट घेऊन झालेल्या कामाचा आढावा घेईल, असे ठरले आहे.
  • याशिवाय या समितीला दोन्ही देशांमधील सहसचिव पदावरील अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखालील एक समिती सहाय करेल.

  जनलोकपाल विधेयकाला मंजुरी

  • दिल्ली सरकारने जनलोकपाल विधेयकाला मंजुरी दिली.
  • या विधेयकामुळे आता भ्रष्टाचारविरोधी संस्थेची स्थापना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनादरम्यान सादर केलेल्या प्रस्तावानुसारच जनलोकपाल विधेयक असणार आहे, असा दावा सरकारने केला आहे.
  • दिल्ली सरकार लवकरच जनलोकपाल विधेयक विधानसभेत सादर करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.

  सांस्कृतिक मंत्रालयाची गृहमंत्रालयाकडे शिफारस

  • स्वयंपाकी आणि बल्लवाचार्य (शेफ)यांनाही आता पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा मार्ग मोकळा होण्याचे संकेत मिळाले आहेत.
  • सांस्कृतिक मंत्रालयाने या बाबतची शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठविली आहे.
  • स्वयंपाक ही एक कला असल्याने या पाककलेचा पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश करावा, असा प्रस्ताव अलीकडेच सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

  प्रभावशाली 100 महिलांच्या यादीत सात भारतीय महिलांची निवड

  • भारतीय महिलांची क्षमता आणि कर्तृत्वाचे दर्शन पुन्हा एकदा जगाला घडले आहे.
  • गायिका आशा भोसले, टेनिस खेळाडू सानिया मिर्झा, ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांच्यासह सात भारतीय महिलांची निवड बीबीसीने खूप प्रभावशाली१०० महिलांच्या यादीत केली आहे.
  • राजकारण, विज्ञान आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रभावशाली, जागतिक नेत्या असलेल्या व तुलनेने कमी लोकप्रिय परंतु महत्त्वाकांक्षी अशा १०० महिलांची यादी बीबीसी दरवर्षी करीत असते.
  • इतर भारतीय महिलांध्ये रिम्पी कुमारी (शेती), मुमताज शेख (कॅम्पेनर) स्मृती नागपाल आणि कनिका टेकरीवाल (जोखीम घेऊन उद्योग सुरू करणारा) यांचा समावेश आहे.

  Thursday, November 19, 2015

  Current Affairs - November 19, 2015

  Education took back the new draft dhoranasandarbhatala Maharashtra


      
  Maharashtra dhoranasandarbhatala draft new Education Department before the end of the state of intense schooling has taken the vaccine.
      
  Specific binding to the students of the school hours, they should be a school for 6 hours instead of 8, on the recommendation of the masudyatalya has been withdrawn after furious criticism of the draft, the new draft will be ready in the next two weeks.
      
  The new center is expected to be ready for the National Education Policy of the Government of the Ministry of Human Resource Development.
      
  They have been asked for recommendations for each state.
      
  Accordingly, the Department of School Education siksanaksetratalya expert, Head of the NGO seminar pratinidhinsobata by the National Report on the state of New Education Policy "was uploaded on the website of the Department of Education to draft such a heading.

  Google "to be a question now and easy


      
  Popular sarcainjina the "Google" to a question, and now is going to be easy.
      
  While no longer limited and will not need to use just search the word "google" search of new alternative user writing savayinusara "search" will be.
      
  That is likely to experience a new and different users.

      
  More use of words, phrases, easily searchable and difficult questions, such facilities "Google" "Search Engine" is given in.
      
  "Google" has started in 2012, "Knowledge Graph" This project is a part of.
      
  "Google Web" applications and users have been given this facility.

  Union Home Minister Rajnath Singh to visit China government sent


      
  Union Home Minister Rajnath Singh led a delegation to visit China Government left.
      
  The entire tour will be six days.
      
  Rajnath Singh and Chinese Premier Li will meet in this tour are kekviyanga.
      Also, the Chinese Minister Guo are going to discuss the bilateral sengakuna.

  'Instant flour nudalsa not disclose the sale ephaesaesaeaya allowed      
  Yoga guru Baba Ramdev's Patanjali Ayurveda submitted Monday to sell the food security of instant flour nudalsa ratio Authority (ephaesaesaeaya) was not allowed to have a newspaper revealed.
      
  But Patanjali flour noodles on the pakitam ephaesaesaeayane given license number has been been given before.
      
  Patanjali nudalsaci sales is likely to continue next month.Ravindra Jadeja a big leap in the ICC rankings

      
  South Africa is a big leap up the ICC Test rankings India's Ravindra Jadeja bowling padanarya your impressions.
      
  It has been ranked 13th in the latest Alphabetical.
      
  This is his best performance ever. South Africa's Dale Steyn still ranks first in the rankings.
      
  Jadeja 8 wickets in the first Test, but four wickets in an innings in the second Test due to the disruption.

  Indira Gandhi Memorial Award announced


      
  The awards were announced by former Prime Minister Indira Gandhi's memory.Hindi film actress Juhi Chawla awareness for mobile kiranotsargababata, runners Kavita Raut, writer-poet poetry Mahajan, actor navajuddina Siddiqui, educator Farida long, entrepreneurs will be honored with the award of the journalism and the cloud phanasalakara BHIDE Rahi for outstanding performance.1 event held at 2 pm on November 9 at Nariman Point at YB Chavan and former Lok Sabha Speaker Meira Kumar, Congress chief secretary establishment Janardana Dwivedi's Awards will be presented.As new Chief Justice of India Justice. Thakur announced the official name of tirathasinha

      
  As new Chief Justice of India Justice. Tirathasinha Thakur was named the official announcement.
      
  Justice. Thakur will be sworn in on December 3 post.
      
  Chief Justice of the existing H. L. Dattu are retiring on December 2.
      
  Justice. Thakur is the senior most judge of the Supreme Court.
      
  Justice. Thakur will be due on January 4, 2017 saranyayadhisapadaci term.

  Wednesday, November 18, 2015

  चालू घडामोडी - १८,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 18, 2015]

  केंद्र सरकारची जाम योजना

  • प्रधानमंत्री जनधन योजनेत वर्षभरात देशात अठरा कोटी बॅंक खाती उघडण्यात आली आहेत.
  • या योजनेची व्याप्ती वाढवत याला मोबाईलची जोड देण्यात येणार आहे.
  • यासाठी जनधन, आधार आणि मोबाईल यांचा एकत्रित आविष्कार असणारी जाम (JAM) योजना केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विकासमंत्री वेंकय्या नायडू यांनी दिली.
  • तसेच देशातील संपूर्ण 585 कृषी बाजार समित्यांना एकत्रित जोडण्यात येणार आहे.
  • यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास बाजाराची संकल्पना अमलात आणली आहे.
  • सर्व राज्यांना राष्ट्रीय कृषी विकास बाजार स्थापना अनिवार्य असून जानेवारीपर्यंत संपूर्ण देशात याची अंमलबजावणी होईल, असा विश्‍वास केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी व्यक्त केला.

  भारत अमेरिकेला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर

  • भारतातील इंटरनेट युजर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून डिसेंबर २०१५ अखेरीस भारत अमेरिकेला मागे टाकून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचणार असल्याची माहिती इंटरनेट ऍण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया (आयएएमएआय) आणि इंडियन मार्केट मार्केट रिसर्च ब्युरोने (आयएमआरबी) प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
  • ऑक्‍टोबर२०१५ अखेर भारतामध्ये एकूण ३७.५ कोटी इंटरनेट युजर आढळून आले आहे.
  • सध्या इंटरनेट युजर्सच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • मात्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने डिसेंबर २०१५ अखेरपर्यंत भारतामध्ये ४०.२ कोटी इंटरनेट युजर्स असण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.
  • अशाप्रकारे अपेक्षित वाढ झाली तर भारत अमेरिकेला मागे टाकणार असून जगात दुसऱ्या क्रमांकावर पोचणार आहे.
  • याबाबतीत जगामध्ये चीन सर्वांत पुढे असून तेथे ६० कोटी इंटरनेट युजर्स आहेत.
  • गेल्या दशकभरात भारतामध्ये इंटरनेट युजर्समध्ये १ कोटी वरून१०० कोटी एवढी वाढ झाली आहे.
  • तर मागील तीन वर्षात ही संख्या १०० कोटींवरून २०० कोटींवर पोचली आहे.
  • याचाच अर्थ असा की डिजीटल इंडस्ट्रीमध्ये भारत मोठी झेप घेत असून भारतामध्ये ई-कॉमर्सला मोठी संधी आहे असेही अहवालात पुढे म्हटले आहे.

  ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे निधन

  • रामजन्म चळवळीतील अग्रणी, विश्‍व हिंदू परिषदे (विहिंप) ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे निधन झाले. ते अविवाहित होते.
  • १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात कारसेवकांचा मोठा सहभाग होता.
  • सिंघल यांचा जन्म २ ऑक्‍टोबर १९२६ रोजी झाला.

  'फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया'ने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल

  • मॅगीच्या विरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये यासाठी राजकीय दबाव कार्यरत झालेले असताना केंद्र शासनाच्या 'फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया'ने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केली आहे.
  • त्यामुळे मॅगीची न्यायालयीन लढाई संपलेली नाही.
  • फूड सेफ्टी अ‍ॅथॉरिटीने अगदी सुरुवातीस म्हणजे ५ जुन रोजी मॅगीवर बंदी आणली होती.
  • तर लगेचच ६जुन रोजी राज्य सरकारने मॅगीवर बंदी आणली होती.
  • या बंदीच्या विरोधात मॅगी बनवणाऱ्या नेस्ले कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

  बेलफास्ट, लिव्हरपूल येथील विद्यापीठांचे संशोधन

  • कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे, आता पॅरिसमधील हवामान परिषदेत कार्बन उत्सर्जन कुणी किती कमी करायचे यावर तू-तू-मैं-मैं होईल, पण प्रत्यक्षात हे उत्सर्जन वातावरणात पसरू नये यासाठी एक युक्ती वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे.
  • त्यांनी एका सच्छिद्र द्रवाचा शोध लावला असून त्याच्या मदतीने कार्बन उत्सर्जन गोळा करता येते, परिणामी ते वातावरणात मिसळत नाही.
  • सच्छिद्रतेचा गुणधर्म असलेला द्रव जगात प्रथमच तयार करण्यात आला आहे.
  • ब्रिटनमधील बेलफास्टच्या क्वीन्स विद्यापीठ व लिव्हरपूल विद्यापीठाच्या संशोधकांनी तसेच त्यांच्या आंतरराष्ट्रीय भागीदारांनी हा नवीन द्रव शोधून काढला आहे.
  • त्यात खूप मोठय़ा प्रमाणावर हरितगृह वायू विरघळवता येतात.
  • हे वायू द्रवाच्या सच्छिद्रता गुणधर्मामुळे शोषले जातात.
  • अनेक पर्यावरण स्नेही रासायनिक प्रक्रिया यातून शोधता येतील.
  • सध्या कार्बन पकडून तो समुद्राच्या तळाशी गाडला जातो, त्याला कार्बन सिक्वेट्रेशन असे म्हणतात त्यापेक्षा तो सच्छिद्र द्रवाने पकडता येत असेल तर ते जास्त फलदायी आहे.

  Tuesday, November 17, 2015

  चालू घडामोडी - १७,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 17, 2015]

  शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या समाधिस्थळी स्मारकाची घोषणा

  सय्यद अकबरुद्दीन यांची यूएन कायमस्वरूपी सदस्य म्हणून नियुक्ती

  योगगुरू बाबा रामदेव यांची स्वदेशी मॅगी बाजारात

  एनएससीएन-के संघटना केंद्राने दहशतवादी संघटना म्हणून जाहीर

  ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन

  मिशेल जॉन्सन याची क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा

  आदिवासींसाठी कुपोषण निर्मूलनाची योजना

  12वी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार

  नेपाळ फुटबॉल संघाचे प्रमुख गणेश थापा 10 वर्षांसाठी निलंबित

  भाषा आकलनावर नवा प्रकाश

  Monday, November 16, 2015

  चालू घडामोडी - १६,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 16, 2015]

  रॉस टेलर याने ११२ वर्षांचा विक्रम मोडीत काढला

  • धडाकेबाज फलंदाज रॉस टेलर याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ कसोटीत धावांची खेळी करत त्यांच्या देशात सर्वाधिक वैयक्तिक धावा बनविण्याचा ११२वर्षांचा विक्रम मोडीत काढला आहे.
  • यापूर्वी १९०३ साली इंग्लंडच्या टीप फॉस्टर्सने सिडनी कसोटीत २८७ धावा केल्या होत्या.
  • कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ऑस्ट्रेलियात खेळताना सर्वाधिक धावा बनविण्याचा फॉस्टर्स यांचा विक्रम आतापर्यंत अबाधित होता.
  • ऑस्ट्रेलियाविरुद्ध आतापर्यंत सर्वाधिक वैयक्तिक धावा बनविण्याचा विक्रम इंग्लंडच्याच लेन ह्युटन्स यांच्या नावावर आहे.
  • त्यांनी १९३८ मध्ये लॉर्ड्स मैदानावर ३६४ धावा केल्या होत्या.

  जी-20 परिषदेत सहभागी होत असलेले सर्व देश फ्रान्सच्या बाजूने

  • पॅरिसवर ‘इसिस‘नेकेलेला हल्ला हा मानवतेवरील हल्ला असल्याचे सांगून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी जी-२० परिषदेत सहभागी होत असलेले सर्व देश फ्रान्सच्या बाजूने असल्याचे सांगितले.
  • तसेच हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना शासन करण्यासाठी फ्रान्सला सर्वप्रकारचे साह्य करण्यास तयार असल्याचेही ते म्हणाले.
  • जी-20 परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर तुर्कस्तानचे पंतप्रधान तयिप एर्दोगान यांच्याबरोबर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

  'ऍलस्टॉम‘ला लाच दिल्याप्रकरणी रू.५१०० कोटींचा दंड

  • अमेरिकेने बहुराष्ट्रीय फ्रेंच कंपनी ‘ऍलस्टॉम‘ला लाच दिल्याप्रकरणी रू.५१०० कोटींचा दंड केला आहे.
  • अमेरिकी न्यायालयाने बहुराष्ट्रीय कंपनीस सुनावलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा दंड आहे.
  • अभियांत्रिकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या ‘ऍलस्टॉम‘वर इंडोनेशिया, सौदी अरेबिया, इजिप्त आणि तैवानमध्ये देखील लाच दिल्याचा आरोप आहे.
  • अमेरिकी न्यायालयाने ‘ऍलस्टॉम‘ला रू.५१०० कोटींचा दंड भरण्याचा आदेश दिला आहे.

  प्राप्तीकर विभाग एक मोबाइल अॅप तयार करणार

  • प्राप्तीकर विभाग एक मोबाइल अॅप तयार करत असून, ज्याचा उपयोग प्राप्तीकराचा भरणा करण्यासाठी (आयटी रिटर्न) होणार असल्याची, माहिती अर्थ मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली.
  • सुरक्षिततेबाबत काही गोष्टींची पडताळणी करणे सुरू आहे.
  • सुरक्षेबाबत काही समस्यांचे निराकरण झाल्यानंतर अॅप उपलब्ध करून देण्यात येईल.
  • सरकारने यंदा आधार नंबर, इंटरनेट बॅंकिंग, एटीएम इत्यादींचा वापर करून ऑनलाइन व्हेरिफिकेशनची सुविधा दिली होती.
  • त्यामुळे ऑनलाइन रिटर्न भरणार्यांची संख्या वाढली आहे.
  • यंदा ई-फायलिंगच्या शेवटच्या दिवशी तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त विवरणपत्रे अपलोड करण्यात आली होती.
  • सरकारने चालू आर्थिक वर्षात ७.९८ लाख कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर संकलनाचे लक्ष्य ठेवले आहे.
  • प्राप्तिकर कायदे आणि नियम अधिक सोपे आणि सुलभ करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आर व्ही ईश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

  फसव्या ई-मेलचा अलर्ट मिळणार

  • जी-मेल अकाउंटमधील माहितीची चोरी, दुरुपयोग, पाळत ठेवणाऱ्या फसव्या ई-मेलचा अलर्ट मिळणार आहे.
  • "अनक्रिप्टेड कनेक्‍शन"द्वारे आलेल्या ई-मेलचे नोटिफिकेशन मोफत मिळणार आहे.
  • सुरक्षेबाबतचा अलर्ट काही महिन्यांत मिळेल, अशी माहिती गुगलने ब्लॉगपोस्टवरून दिली आहे.
  • या अलर्टमुळे जी-मेलचा वापर करणाऱ्यांना कोणताही अडथळा येणार नाही, असे गुगलने स्पष्ट केले.
  • पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ब्रिटनमधील कंपन्यांशी झालेल्या करारामुळे हातभार लागणार
   • पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प महत्त्वाचा आहे.
   • त्याची प्रभावी अंमलबजावणी होत असताना, ब्रिटनमधील कंपन्यांशी झालेल्या करारामुळे त्याला हातभार लागणार आहे.

  मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र अग्रेसर

   • पुत्ररत्न प्राप्तीसाठी देशात स्त्रीभ्रूणहत्या होत असतानाच मूल दत्तक घेणारी दाम्पत्ये मात्र मुलींना प्राधान्य देत असून, यात महाराष्ट्र अग्रेसर आहे.
   • त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो.
   • या वर्षी एप्रिल ते जून या कालावधीत देशभरात दत्तक घेण्यासाठीचे अर्ज करण्यात आले असून, त्यापैकी अर्जांमध्ये मुलगी दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली आहे.
   • याउलट मुलाला पसंती देणारे केवळ ७१८ अर्ज आहेत.
   • हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्ये मुलामुलींच्या प्रमाणात प्रचंड तफावत असताना तेथेही दत्तक घेण्यास इच्छुक निपुत्रिक दाम्पत्ये मुलांच्या तुलनेत मुलींनाच प्राधान्य देत आहेत.

  लंडनमधील अर्धपुतळ्याचे अनावरण

   • घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लंडन मुक्कामात वास्तव्य केलेल्या घरामध्ये त्यांच्या संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
   • मोदींनी तेथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याचेही अनावरण केले.
   • या प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते.
   • संग्रहालयात डॉ. आंबेडकरांचे निवडक लेखन, छायाचित्रे, दस्तावेज आणि अन्य माहिती उपलब्ध आहे.

  Sunday, November 08, 2015

  चालू घडामोडी - ०८,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 08, 2015]

  जम्मू-काश्‍मीरसाठी ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा

  • नव्या काश्‍मिरच्या पुनर्निर्माणाची सुरवात असल्याचे आणि हा शेवट नसल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्‍मीरसाठी तब्बल ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.
  • गेल्या वर्षी खोऱ्यातील पुराच्या आपत्तीनंतर राज्याला भेट दिली होती.
  • दरम्यान, या दौऱ्यात मोदींच्या हस्ते उधमपूर-रामबान तसेच रामबान-बानिहाल या ४ हजार ३०६ कोटी रुपये खर्चाच्या राष्ट्रीय महामार्गांचा कोनशिला समारंभ झाला.
  • त्याचप्रमाणे त्यांनी रामबान जिल्ह्यातील वीज प्रकल्पाचे उद्‌घाटनही केले.
  • जम्मू-काश्‍मीरला देण्यात आलेल्या ८० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधून पश्‍चिम पाकिस्तानातून आलेल्यांचे आणि काश्‍मिरी पंडितांचे पुनर्वसन होणार.
  • त्याशिवाय भारतीय राखीव पोलिस दलाच्या पाच तुकड्या स्थापन करणार असून, यातून ४ हजार युवकांना रोजगार मिळेल.

  वन रॅंक वन पेन्शन" योजनेची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना जारी

  • बहुप्रतिक्षित "वन रॅंक वन पेन्शन"योजनेची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना संरक्षण मंत्रालयाने जारी केली आहे.
  • निवृत्त सैनिकांसाठीच्या या योजनेची अंमलबजावणी दिवाळीपूर्वी करण्याची घोषणा संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केली होती.
  • केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वीच ही योजना जाहीर केली होती.
  • मात्र, सरकारने जाहीर केलेल्या योजनेमध्ये अद्यापही त्रुटी असल्याचे कारण सांगत काही निवृत्त सैनिकांनी अद्यापही आंदोलन सुरूच ठेवले आहे.

  भारत चीनपेक्षा कमी भ्रष्ट देश

  • अठरा वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारत चीनपेक्षा कमी भ्रष्ट देश ठरला आहे.
  • भ्रष्टाचारविरोधी "ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल" या संस्थेने केलेल्या वार्षिक पाहणीतून हे स्पष्ट झाले.
  • या संस्थेने जगातील १७५ देशांमध्ये पाहणी करून क्रमवारी तयार केली होती.
  • त्यानुसार भारत ८५व्या स्थानी असून, चीनला शंभरावे स्थान मिळाले आहे.
  • या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या भ्रष्टाचार पूर्वानुमान निर्देशांकानुसार डेन्मार्क (९२०)हा सर्वात कमी भ्रष्ट देश असून, सोमालिया आणि उत्तर कोरिया सर्वांत भ्रष्ट देश ठरले आहेत.

  ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

  • भारतीय लष्कराने आज जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या ब्राह्मोस या क्षेपणास्त्राची राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी चाचणी घेतली.
  • या चाचणीमुळे पुन्हा एकदा ब्राह्मोसची मारक क्षमता स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
  • मोबाईल ऍटोनॉमस लॉंचरच्या (माल) माध्यमातून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले.
  • या क्षेपणास्त्राने लष्कराने निश्‍चित केलेली सर्व उद्दिष्ट्ये प्राप्त केली आहेत.
  • सध्या भारतीय लष्कराच्या शस्त्रागारामध्ये तीन ब्राह्मोस क्षेपणास्त्रे असून ती सर्व ब्लॉक -३ श्रेणीमधील आहेत.
  • त्यांची या वर्षी ८ आणि ९ मे रोजी चाचणी घेण्यात आली होती.
  • जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारे ब्राह्मोस क्षेपणास्त्र मध्ये भारतीय लष्करात दाखल झाले होते.

  Saturday, November 07, 2015

  चालू घडामोडी - ०७,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 07, 2015]

  15 नोव्हेंबरपासून अर्धा टक्का उपकर लागू होणार

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी आता अर्धा टक्का स्वच्छता उपकर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • दिवाळीनंतर १५ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
  • त्यामुळे विमान प्रवास, दूरध्वनीवरील संभाषण, हॉटेलांतील जेवण आणि बँकिंग सेवा आदी महाग होणार आहे.
  • या निर्णयामुळे केंद्राच्या तिजोरीत चार हजार कोटी रुपयांची भर पडणार आहे.
  • अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आवश्यकता भासल्यास सर्वच किंवा विशिष्ट सेवांवर दोन टक्के स्वच्छ भारत उपकर लागू करण्याचे संकेत दिले होते.
  • तसेच या उपकराच्या माध्यमातून जमा झालेला निधी स्वच्छ भारत अभियानासाठीच वापरला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

  ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठाचे संशोधन

  • तंबाखूवर्गातील प्राचीन वनस्पतीमध्ये असलेले असे जनुक शोधले आहे की, त्याचा वापर करून मंगळासारख्या दूरच्या ग्रहावरही प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकणारी पिके व इतर वनस्पती आंतरजनुकीय तंत्राने तयार करणे शक्य होणार आहे.
  • क्वीन्सलँड तंत्रज्ञान विद्यापीठातील वनस्पती जनुकशास्त्राज्ञ प्रा. पीटर वॉटरहाऊस यांनी सांगितले की, मूळ आदिवासी जमातींमध्ये प्रचलित असलेल्या तंबाखूच्या एका देशी रोपात म्हणजे निकोटियाना बेनथामियाना या पिटज्युरी नावाने ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीत हे जनुक सापडले आहे.
  • पिटज्युरी ही तंबाखू वनस्पती आहे, तिचा इतिहास शोधताना हे जनुक सापडले आहे.
  • या वनस्पतीचा उपयोग जनुकशास्त्रज्ञ विषाणू व लशीची चाचणी घेण्यासाठी प्रारूप म्हणून करीत असतात.
  • वनस्पतींमधील पांढरा उंदीर म्हणजे ज्याच्यावर प्रयोग केले जातात असा जैविक घटक असे या वनस्पतीला म्हणावे लागेल.
  • या वनस्पतीत अनेक आश्चर्यकारक गुण असल्याचे दिसून आले आहे. या वनस्पतीचा जनुकीय आराखडा तयार केला आहे.
  • ही वनस्पती पश्चिम ऑस्ट्रेलिया व उत्तर सीमेकडील असल्याचे सांगण्यात येते.
  • रेणवीय घड्याळाच्या व जीवाश्म नोंदीच्या आधारे वैज्ञानिकांनी या वनस्पतीचे आताचे रूप शोधून काढले आहे.
  • साडेसात लाख वर्षांपूर्वीची ही वनस्पती असून ती जंगली स्वरूपातील होती.
  • वनस्पती जैवतंत्रज्ञानावर मोठा परिणाम करणारे हे संशोधन असल्याचे संशोधक श्रीमती ज्युलिया बॅली यांनी सांगितले.
  • या वनस्पतीने प्रतिकारशक्ती गमावली असली तरी ती पटकन वाढते, फुलोरा लगेच येतो व कमी पावसातही उगवते.
  • दुष्काळातही ही वनस्पती तग धरते, त्यामुळेच इतकी वष्रे ती टिकून राहिली आहे. अवकाशात रोगमुक्त वनस्पतींच्या निर्मितीसाठी या वनस्पतीचा अभ्यास उपयुक्त आहे.

  तामिळनाडूतील संस्था नोंदणी कार्यालयाची नोंदणी रद्द केल्याचा दावा

  • तामिळनाडूतील संस्था नोंदणी कार्यालयाने स्वयंसेवी संस्था म्हणून असलेली आपली नोंदणी रद्द केल्याचा दावा ग्रीनपीस इंडिया सोसायटीने केला.

  अ‍ॅपलने स्मार्ट घडय़ाळांची विक्री भारतात केली सुरू

  • अमेरिकेतील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असलेल्या अ‍ॅपलने स्मार्ट घडय़ाळांची विक्री भारतात सुरू केली असून, त्यातील सर्वात चांगले मॉडेल १४ लाख रुपयांना आहे.
  • या घडय़ाळाच्या किमती ३०,९९० ते १४ लाख दरम्यान आहे.
  • देशातील १०० अ‍ॅपल प्रीमियम स्टोअर्समधून ही घडय़ाळे विक्रीस आहेत. वेगवेगळय़ा डिस्प्ले आकारात म्हणजे ३८ मि.मी. व ४२ मि.मी.मध्ये ती उपलब्ध आहेत.
  • अ‍ॅपल घडय़ाळे १८ कॅरट रोज गोल्ड, व्हाइट स्पोर्ट्स बँड,४२ मि.मी. डिस्प्ले या स्वरूपात उपलब्ध आहेत.
  • त्यांची किंमत ९.९लाख रुपये आहे. ४२ मि.मी. डिस्प्लेचे दोन प्रकार अ‍ॅल्युमिनियम केस व स्पोर्ट्स बँड असे असून त्यांच्या किमती ३४९०० रुपये आहेत.
  • अ‍ॅपल घडय़ाळाचे उपयोग : कॉल घेणे,  छायाचित्रे काढणे,  संगीत श्रवण, इन्स्टाग्राम छायाचित्रांचे व्यवस्थापन, शरीराच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवणे,

  दिवाळीपूर्वी वन रँक वन पेन्शंन योजना लागू होणार :

  • दिवाळीपूर्वी वन रँक वन पेन्शंन अर्थात OROP योजना लागू होणार असल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
  • OROP संर्दभातील सर्व मागण्या मान्य होत नाहीत त्यामुळे सरकारच्या विरोधात आज सर्व माजी सैनिकांनी मेडल वापसी करणार असल्याचे जाहीर केले होते.
  • जर वन रँक वन पेन्शंन योजना सरकारने लागू नाही केली तर दिवाळी साजरी करणार नाही असेही माजी सैनिकांने सांगीतले होते.
  • निवृत्त सैनिकांसाठी असलेली निवृत्तीवेतन योजना (OROP)  १ जुलै २०१४ पासून लागू केली होती पण सरकार आणि अंदोलनकर्ते (माजी सैनिक) यांच्यातील तिढा कायम होता.

  भारताकडून अफगाणिस्तानला चार लढाऊ हेलिकॉप्टर देण्याचा करार

  • भारताकडून अफगाणिस्तानला चार लढाऊ हेलिकॉप्टर देण्याचा करार लवकरच अंतिम होण्याची शक्‍यता असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे.
  • अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हानिफ अत्मर भारत दौऱ्यावर येत असून, त्याचवेळी करारावर स्वाक्षरी होण्याची शक्‍यता आहे.
  • भारताने आतापर्यंत अफगाणिस्तानला फक्त पायाभूत सुविधांसंदर्भात मदत करण्यापर्यंत स्वतःला मर्यादित ठेवले होते.
  • मात्र, दहशतवादाशी झुंजत असल्याने लष्करी मदतही पुरवण्याची अफगाणिस्तानकडून सातत्याने मागणी होत होती.
  • हे चार हेलिकॉप्टर पुरविण्यामुळे त्यांची ही मागणी पूर्ण होण्यास सुरवात झाली असल्याचे मानले जाते.
  • लढाऊ हेलिकॉप्टर्सबरोबरच साध्या हेलिकॉप्टर्सची मागणीही अफगाणिस्तानने केली आहे.
  • डेल्टा सिग्मा पाय ची न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी मध्ये स्थापना
  •  नासा तर्फे मार्स ग्लोबल सर्व्हेयरचे प्रक्षेपण

  Friday, November 06, 2015

  चालू घडामोडी - ०६,नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 06, 2015]

  वर्ण बचत खाते, सुवर्ण रोखे या योजनांचा प्रारंभ

  • सोन्याची आयात कमी करण्याबरोबरच घरांमध्ये वापरात नसलेले सोने अर्थव्यवस्थेत आणण्यासाठी केंद्राने जाहीर केलेल्या सुवर्ण बचत खाते (गोल्ड मॉनिटायझेशन), सुवर्ण रोखे या योजनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला.
  • याचबरोबर अशोकचक्र आणि महात्मा गांधी यांची छबी असलेल्या सुवर्ण नाण्यांचेही पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
  • सुवर्ण योजनांतून महिलांना आर्थिक सुरक्षा लाभेल, असे पंतप्रधान म्हणाले. चालू वर्षात भारतात तब्बल टन सोन्याची विक्री झाली.
  • भारताने सोने विक्रीमध्ये चीनलाही मागे टाकले असल्याचे मोदी यांनी सांगितले.
  • सुवर्ण बचत योजनेमध्ये ग्राहकांना सुवर्ण बचत खात्यावर अडीच टक्के व्याज मिळणार आहे.
  • तरसुवर्ण रोख्यांवर (गोल्ड बॉंड) २.७५ टक्के व्याजदर निश्‍चित करण्यात आला आहे.
  • नोव्हेंबरपर्यंत गोल्ड बॉंड खरेदी करता येतील. सुवर्ण नाणी पाच आणि दहा ग्रॅममध्ये उपलब्ध असून, एमएमटीसीच्या देशभरातील कार्यालयांमध्ये ही नाणी खरेदी करता येणार आहेत.

  कॅनडाच्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या चार सदस्यांचा समावेश

  • कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टीन ट्रुड्यू यांनी आपल्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या चार सदस्यांचा समावेश केला आहे.
  • पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रुड्यू यांनी आपले मंत्रिमंडळ जाहीर केले.
  • कॅनडाच्या मंत्रिमंडळात प्रथमच इतक्‍या संख्येने भारतीय वंशाच्या नागरिकांचा समावेश झाला आहे.
  • महिला आणि पुरुषांना समान संधी देत १५ महिला आणि १५ पुरुषांना मंत्रिमंडळात स्थान दिले गेले आहे.
  • यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला सदस्य भारतीय वंशाचे नागरिक आहेत.
  • कॅनडामध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये एकूण भारतीय वंशाचे उमेदवार निवडून आले.
  • मध्ये हर्ब धालिवाल यांना प्रथम मंत्रिमंडळात स्थान मिळाले होते.
  • कॅनडाच्या लष्करी सेवेतून निवृत्त झालेले आणि अनेक लष्करी सन्मान मिळविलेले हरजित सज्जन यांना कॅनडाचे संरक्षण मंत्रिपद देण्यात आले आहे.
  • त्यांच्याशिवाय बार्दिश छग्गर (लघू व्यापार आणि पर्यटन), अमरजित सोही (पायाभूत सुविधा आणि दळणवळण) आणि नवदीप बेन्स (विज्ञान आणि आर्थिक विकास) यांना मंत्रिपदे मिळाली आहेत.

  लेखिका अरुंधती रॉय पुरस्कार परत करण्याचा निर्णय

  • मानवाधिकार क्षेत्रातील सुप्रसिद्ध विचारवंत, लेखिका अरुंधती रॉय यांनीही देशातील वाढत्या असहिष्णुतेविरोधात सरकारला पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • रॉय यांना मध्ये सर्वोत्तम पटकथेकरिता मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार त्या परत करणार आहेत.

  फेसबुक न्यूज' हे नवीन अॅप्लिकेशन सादर करणार

  • जगातील अग्रगण्य सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ फेसबुक आठवडाभरातफेसबुक न्यूज हे एक नवीन अॅप्लिकेशन सादर करणार आहे.
  • अनेक मीडिया ग्रुप्सने या अॅपला रिअल टाईम बातम्या देण्याचा करार केल्याचे सांगण्यात येत आहे.
  • वॉशिंग्टन पोस्ट, वोग यासारखे मोठे मीडिया ग्रुप या अॅपचे भागीदार आहेत.
  • युझर्सना कोणत्याही न्यूज पब्लिशर्सच्या न्यूज फीड आणि त्याच्याशी संबंधित नोटिफिकेशन सबस्क्राईब करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.
  • 'इन्स्टंट आर्टिकल सर्व्हिस' ही सेवादेखील फेसबुकने सुरू केली आहे.
  • या सेवेतून वृत्तसंस्था आपल्या बातम्या थेट यामध्ये प्रसिद्धकरू शकणार आहेत.
  • यासाठीही जगभरातील मोठ्या पब्लिशर्सनी फेसबुकशी करार केला आहे.
  • ब्रेकिंग न्यूजसाठीही फेसबुक एक अॅप बनविणार आहे असे मागील महिन्यात सांगण्यात आले होते.

  चीनमधील सिचुआन प्रांतातील संशोधन

  • प्राणी मुके असतात पण तरी त्यांची आवाजाची वेगळी भाषा असते ती समजली तर त्यांचे सगळे विस्मयकारक जग आपल्यापुढे खुले होऊ शकते.
  • अलीकडेच चीनमध्ये आढळून येणाऱ्या पांडा या प्राण्याची भाषा उलगडण्यात वैज्ञानिकांना यश आले असून त्यामुळे एरवी बाहेरच्या जगापासून अलिप्त असलेल्या या प्राण्यांच्या खासगी जीवनावर त्यामुळे प्रकाश पडणार आहे.
  • द चायना कन्झर्वेशन अँड रीसर्च सेंटर फॉर द जायंट पांडा या चीनच्या सिचुआन प्रांतातील संस्थेने २०१० पासून पांडा भाषा प्रकल्प राबवला होता.
  • त्यांनी प्रथम पांडा या प्राण्याच्या प्रजनन केंद्रात जाऊन ध्वनिमुद्रण केले होते त्यात त्यांचे बछडे व प्रौढ पांडांचे आवाज होते.
  • अन्न सेवन, मीलन, सुश्रुषा, भांडण व इतर प्रसंगात त्यांचे आवाज टिपण्यात आले व त्यावरून त्यांच्या भाषेचा अर्थ लावण्यात आला असे या संस्थेचे प्रमुख झांग हेमिन यांनी सांगितले.
  • पांडांचे आवाज व कृती यांचेही ध्वनिमुद्रण करण्यात आले आहेत.
  • पांडांच्या भाषेचा उलगडा केला आहे व ती अतिशय आश्चर्यकारक भाषा आहे असे सांगून झांग म्हणाले की, पांडाचे बछडे बोलू शकत नाहीत पण ते गी-गी> असा आवाज काढतात तेव्हा भूक लागल्याचे सांगत असतात, वॉ-वॉ असा आवाज करतात तेव्हा आपण दु:खी आहोत असे सांगत असतात.कू-कू असा आवाज करतात तेव्हा सुखात असल्याचे सांगतात.
  • प्रौढ पांडा हे मातेकडून भाषा शिकतात. गर्जना, भुंकण्यासाखा आवाज, ओरडणे, चित्कारणेयासारख्या आविष्कारातून ते संदेश देत असतात.
  • पांडाची आई पक्ष्याप्रमाणे आवाज काढत असेल तर ती बछडय़ांवर चिडली आहे असे समजावे.
  • जर ती जोराने भुंकण्याचा आवाज काढत असेल तर कुणीतरी अनाहुत जवळ आला आहे असे समजावे.
  • तसेच येथून चालते व्हा असा संदेश त्या अनाहुताला त्या देत असतात. पांडा हे प्रेमात असतात तेव्हा कोकराप्रमाणे नम्र असतात.
  • नर पांडा बा असा आवाज काढतात तेव्हा ते प्रणयाराधन करीत असतात. मादी पांडा त्याला पक्ष्यासारखा आवाज काढून प्रतिसाद देतात.

  रशियाने सिरियाला विमानभेदी क्षेपणास्त्रे पाठवली

  • रशियाकडून सिरियातील बंडखोरांच्या विरोधात करण्यात येत असलेल्या हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करता यावे यासाठी रशियाने सिरियाला विमानभेदी क्षेपणास्त्रे पाठवली आहेत अशी माहिती रशियन हवाईदलाच्या अधिकाऱ्याने दिली.
  • रशियाने सप्टेंबरमध्ये सिरियाचे राष्ट्रपती बशर असाद यांच्या विनंतीवरून सिरियातील आयसिसच्या दहशतवाद्यांवर हवाईहल्ले करण्याचा निर्णय घेतला होता.
  • रशियाचा सिरियातील हस्तक्षेप केवळ हवाई हल्ल्यापुरताच मर्यादित असल्याचेही रशियन अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
  • कर्नल जनरल व्हिक्टर बोंडारेव्ह म्हणाले की, विमानभेदी क्षेपणास्त्रांमुळे रशियाच्या लढाऊ विमानांना मदतच होणार आहे.
  • आयसिस दहशतवाद्यांनी हल्ला केल्यास आणिबाणीच्या परिस्थितीत या क्षेपणास्त्रांमुळे रशियाला मदत मिळेल.
  • बोंडारेव्ह यांनी रशियाकडून पाठविण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचा प्रकार स्पष्ट केला नाही.

  Thursday, November 05, 2015

  चालू घडामोडी - ०५ नोव्हेंबर २०१५ [Current Affairs - November 05, 2015]

  "पवनहंस" कंपनीचे हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले

  • अंधारात उतरण्याचा सराव सुरू असताना "पवनहंस" कंपनीचे हेलिकॉप्टर अरबी समुद्रात कोसळले.
  • हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिक आहेत.
  • जुहू येथील एअरोड्रमहून हेलिकॉप्टरने उड्डाण केले.
  • खवळलेल्या समुद्रात अंधारात लॅन्डिंगचा सराव करण्याचा प्रयत्न सुरू असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि हेलिकॉप्टर कोसळले.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या स्थानावर

  • फोर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या जगातील सर्वाधिक शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी नवव्या स्थानावर आहेत.
  • गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांचा क्रमांक 15वा होता.
  • मासिकाने 2015 सालासाठी जाहीर केलेल्या यादीत रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर असून, जर्मनीच्या चान्सलर अँजेला मार्केल यांनी तीन स्थानांनी प्रगती करत दुसरे स्थान मिळवले आहे.
  • अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची एका स्थानाने घसरण होऊन तिसऱ्या स्थानी पोचले आहेत, तर मोदींनी आघाडीच्या दहा नेत्यांमध्ये स्थान मिळविले.
  • अन्य राजकीय व्यक्तींमध्ये चीनचे पंतप्रधान शी जिनपिंग पाचव्या आणि ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन आठव्या स्थानी आहेत.
  • अन्य व्यक्तींमध्ये पोप फ्रान्सिस चौथ्या आणि मायक्रोसॉफ्टस्‌चे बिल गेट्‌स सहाव्या स्थानावर आहेत.

  संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू

  • संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या 23 नोव्हेंबरपासून सुरू होऊन ते 23 डिसेंबरपर्यंत चालेल, असे संकेत एका वरिष्ठ भाजप नेत्याने आज दिल्लीत दिले.
  • संसद अधिवेशनाच्या तारखा ठरविण्याबाबत मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीची (सीसीपीए) बैठक मागच्या महिन्यात झाली व तीत अधिवेशनाच्या तारखाही निश्‍चित झाल्या.

  मालदीवचे अध्यक्ष यांची आणीबाणी लागू करण्याची घोषणा

  • देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे कारण देत मालदीवचे अध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी 30 दिवसांसाठी आणीबाणी लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली.
  • मालेतील अध्यक्षांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर स्फोटके आणि शस्त्रसाठा आढळून आला होता. त्यानंतर लष्कराला सर्वाधिकार देत आणीबाणी लागू करण्यात आली आहे.
  • देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असल्याचे कारण पुढे करत मालदीवमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली असल्याचेही प्रवक्‍त्याने सांगितले.

  याच महिन्यात मॅगीची किरकोळ विक्री सुरू होणार

  • मॅगी नूडल्स आरोग्यासाठी सुरक्षित असल्याचा कौल सरकारी प्रयोगशाळांनी दिला असून याच महिन्यात मॅगीची किरकोळ विक्री सुरू होणार असल्याची माहिती नेस्ले कंपनीकडून देण्यात आली आहे.
  • कंपनीच्या नांजनगुड (कर्नाटक), मोगा (पंजाब) व बिचोलिम (गोवा) येथील प्रकल्पातून तयार करण्यात आलेल्या मॅगी नूडल्स मसालाची मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारी प्रयोगशाळांमध्ये चाचणी झाली आहे.
  • या प्रयोगशाळांनी मॅगी सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिले आहे, असे कंपनीने सांगितले आहे.
  • आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन पुर्ण झाल्याने आम्ही या महिन्यात पुन्हा एकदा मॅगीची विक्री सुरू करणार आहोत.
  • तसेच ज्या राज्यांमध्ये परवानगीची गरज लागेल तेथेही त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील, असे नेस्लेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
  • त्याशिवाय नेस्ले ताहलीवाल व पंतनगर येथील प्रकल्पांमधून मॅगी नूडल्सचे उत्पादन सुरू करणार आहे.
  • नेस्ले इंडियाने मॅगी नूडल्सच्या 20 कोटी पॅकेट्सच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रयोगशाळांमध्ये तब्बल 3,5000 चाचण्या केल्या असून सर्व चाचण्यांमध्ये मॅगी सुरक्षित आढळून आल्याचे कंपनीने सांगितले आहे.

  भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. टी. एस. ठाकूर यांची निवड

  • भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या. टी. एस. ठाकूर यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
  • न्या. ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश असून ते विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्याकडून 2 डिसेंबर रोजी पदभार स्वीकारणार आहेत.
  • सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी न्या. ठाकूर यांच्या नावाची शिफारस केली.
  • विधी मंत्रालयाने न्या. ठाकूर यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील दाखविल्यानंतर त्याबाबतची फाइल पंतप्रधानांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
  • त्यानंतर राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर त्याबाबतचा आदेश जारी केला जाणार आहे.
  • न्या. ठाकूर हे भारताचे 43 वे सरन्यायाधीश असतील.
  • न्या. ठाकूर यांचा जन्म 4 जानेवारी 1952 रोजी झाला.
  • त्यांनी जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात आपली कारकीर्द सुरू केली आणि दिवाणी, फौजदारी, करविषयक आदी सर्व प्रकारचे खटले लढविले.
  • न्या. ठाकूर यांची 17 नोव्हेंबर 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

  फ्लोरिडा विद्यापीठाचे संशोधन

  • वैज्ञानिकांनी नासातील दुर्बिणींच्या मदतीने मोठा दीर्घिकासमूह शोधून काढला असून तो 8.5 अब्ज प्रकाशवर्षे दूर आहे.
  • एवढय़ा लांब अंतरावर इतक्या जास्त वस्तुमानाचा असा समूह सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • दीर्घिकासमूह हे हजारो दीर्घिका गुरुत्वीय बलाने बांधल्या गेल्याने तयार होत असतात.
  • त्यात अब्जावधी तारे असतात व दीर्घिका समूह कालांतराने मोठे होत जातात व कारण त्यात आणखी दीर्घिकांची भर पडत जाते.
  • बऱ्याच काळात तयार झालेले हे दीर्घिकासमूह अब्जावधी वर्षांपूर्वी होते तसे दिसत आहेत.
  • आपले विश्व तरुण असतानाचा तो काळ होता.
  • प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचण्यास वेळ लागत असल्याने या दीर्घिकासमूहांकडून फार वर्षांपूर्वी निघालेला प्रकाश आता आपल्याला दिसतो. म्हणजे तेव्हाची स्थिती आता आपल्याला दिसत आहे.
  • नवीन दीर्घिकासमूह मासिव्ह ओव्हरडेन्स ऑब्जेक्ट जे 1942 प्लस 1527 या नावाने ओळखला जातो व तो 8.5 अब्ज वर्षांपूर्वीचा आहे म्हणजे पृथ्वीच्या जन्माच्या खूप आधीचा आहे.
  • दूरस्थ दीर्घिकांचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत असतो व येताना त्याची तरंगलांबी अवरक्त किरणांसारखी वाढते.नासाच्या स्पिटझर व वाइड फिल्ड इन्फ्रारेड सव्‍‌र्हे एक्सप्लोरर (वाइज) या दुर्बिणींनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे संशोधन करण्यात आले आहे.
  • वैज्ञानिकांनी प्रथम वाइजच्या नोंदणीतील दीर्घिकांची छाननी केली.
  • वाइजच्या नोंदणीत 2010 ते 2011 या काळात घेतलेल्या प्रतिमांच्या स्वरूपात लाखो अवकाशीय पदार्थाची नोंद आहे.
  • नंतर त्यांनी स्पिटझर दुर्बिणीच्या माध्यमातून 200 पदार्थावर लक्ष केंद्रित केले.
  • त्या प्रकल्पाचे नाव 'मॅसिव्ह अँड डिस्टंट क्लस्टर्स ऑफ वाइज सव्‍‌र्हे' असे होते.
  • स्पिटझर व वाइज यांच्या संयुक्त वापराने अवकाशातील अनेक दीर्घिकासमूह शोधण्यात आले, असे फ्लोरिडा विद्यापीठाचे अँथनी गोन्झालेझ यांनी सांगितले.
  • हवाई बेटांवरील मौना किया येथील डब्लूएम केक व जेमिनी वेधशाळेने या दीर्घिकासमूहाचे अंतर 8.5 अब्ज प्रकाशवर्षे असल्याचे सांगितले.
  • आताचा दीíघकासमूह हा त्या काळातील पाच मोठय़ा समूहांपैकी एक आहे.
  • येत्या वर्षांत 1700 दीर्घिकासमूहांचे अभ्यास स्पिटझर दुर्बिणीच्या मदतीने करणार आहे.
  • 'अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स' या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
   दिनविशेष : 
  • जागतिक रंगभूमी दिन
  • 1945 : कोलंबीया संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील
  • 2007 : चायनाचा प्रथम चंद्र उपग्रह चंद्राभोवतीच्या कक्षेत स्थापीत
  • 2013 : मार्स ऑर्बिटर मिशन उर्फ मंगळयानचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी उड्डाण